नवरा दारु पितो म्हणून प्रियकर केला, त्याने सुद्धा अत्याचार करुन दगा दिला.! अश्लिल व्हिडिओ काढून व्हायरल करण्याची धमकी दिली, गुन्हा दाखल.!

 

सार्वभौम (संगमनेर) :- 

                संगमनेर शहरातील 32 वर्षीय महिलेशी फोनवर गुलुगुलु बोलुन त्याने मैत्री केली. त्यानंतर मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. प्रेमात लग्नाची साद घालुन महिलेला वेगवेगळे आमिष दाखवून संगमनेरातील खांडगाव परिसरात  नेऊन तिच्यावर बलात्कार केला. असाच प्रकार निझारनेश्वर परिसरात देखील करण्यात आला. 32 वर्षीय महिलेला तुझी व्हिडीओ व फोटो माझ्याकडे आहे ते व्हायरल करण्याची धमकी देऊन वेळोवेळी पिडीत महिलेच्या इच्छेविरुद्ध बलात्कार केला. ही घटना नोव्हेंबर 2016 ते 6 फेब्रुवारी 2023 पर्यंत वेळोवेळी घडली. मात्र, तेव्हापासून तर आजवर आरोपी हा वेळोवेळी ब्लॅकमेल करीत होता. त्यामुळे, पिडीत महिलेने शनिवार दि. 1 एप्रिल 2023 रोजी संगमनेर शहर पोलीस ठाणे गाठले आणि आपली  तक्रार दाखल केली. त्यानंतर आरोपी शिवाजी बाबुराव नागरे (रा. शिबलापूर, ता. संगमनेर) याच्यावर बलात्कारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र पवार करत आहेत.

              याबाबत सविस्तर माहिती अशी की, 32 वर्षीय महिलेचे लग्न 2016 साली राहुरी येथे झाले होते. पिडीत महिलेचा नवरा दारूने व्यसनाधीन असल्याने पिडीत महिला एक ते दीड महिन्यात आपल्या आईकडे निघुन आली. त्यानंतर पिडीत महिलेला कामाची गरज असल्याने संगमनेर शहरात रहायला आली. लग्नाआधी पिडीत महिलेची ओळख आरोपी शिवाजी नागरे याच्याशी झाली होती. पिडीत महिला 2016 मध्ये संगमनेर शहरात रहायला आल्यावर आरोपी शिवाजी नागरे हा नेहमी पिडीत महिलेला फोन करत असे. त्यांची फोनवर मैत्री झाली. त्यानंतर आरोपी शिवाजी नागरे हा पिडीत महिला राहत असलेल्या ठिकाणी भेटायला येत असे. त्यांचे मैत्रीचे रूपांतर हळूहळू प्रेमात झाले. आरोपी शिवाजी नागरे हा नेहमी पिडीत महिलेला आमिष दाखवत. माझे शिबलापूरला दोन गाळे आहे. त्यातील एक गाळा तुझ्या नावावर करून देईल. संगमनेर शहरात तुला घर बांधुन देईल आपण दोघे लग्न करू असे आमिष दाखवून आरोपी शिवाजी नागरे याची पिडीत महिलेवर वाईट नजर होती.

             दरम्यान, आरोपी शिवाजी नागरे हा पिडीत महिलेला बाहेर फिरण्यासाठी नेत असे. त्यानंतर पिडीत महिलेला नोव्हेंबर 2016 मध्ये संध्याकाळच्या वेळेस खांडगाव परिसरात नेऊन पिडीत महिलेच्या इच्छेविरुद्ध संभोग करत असे. तसेच मे 2021 मध्ये निझर्नेश्वर व पोखरी हवेली परिसरात नेऊन शारीरिक संभोग केले. त्यानंतर पिडीत महिलेने नेहमी लग्न करण्याबाबत विचारणा केली असता आरोपी शिवाजी नागरे हा टाळाटाळ करत असे. पिडीत महिलेने गाळा नावावर कधी करणार व घर कधी बांधुन देणार हे विचारल्यावर आरोपी शिवाजी नागरे तो विषय टाळून न्यायचा. त्यानंतर पिडीत महिलेने लग्नाचा हट्ट धरला मात्र, आरोपी शिवाजी नागरे म्हणाला की, माझे लग्न झाले आहे. मला दोन मुले आहेत. मी तुझ्यासोबत लग्न करू शकत नाही. तुझे व माझे असेच संबंध राहुदे. आपल्या संबंधाबाबत कोणालाही एक सांगु नको. त्यानंतर पिडीत महिला म्हणाली की, तु मला यापुढे भेटायचे नाही.      

दरम्यान, आरोपी शिवाजी नागरे हा पुन्हा पिडीत महिलेकडे गेला व बळजबरीने गाडीवर बसुन खांडगाव परिसरात नेऊन पिडीत महिलेच्या इच्छेविरुद्ध जबरी संभोग केला. त्यानंतर पिडीत महिलेला धमकी देत असे तु जर आपल्या संबंधाबाबत कोठे वाच्यता केली तर मी तुला जीवे ठार मारील. शिवीगाळ करून आपल्या संबंधाबाबत माझ्याकडे व्हिडीओ क्लिप व फोटो असुन ती मी व्हायरल करील अशी धमकी देत. त्याच्या भीतीपोटी आरोपी नागरे हा पिडीत महिलेला त्रास देत होता. असल्या धमक्यांना पिडीत महिला वैतागली होती. त्यामुळे,पिडीत महिलेने हा सर्व खराखरा प्रकार जवळच्याना कथन केला आणि थेट पोलीस ठाणे गाठून आरोपी शिवाजी नागरे याच्यावर गुन्हा दाखल केला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र पवार करत आहे.