आरे रे रे.!! महसुलमंत्री विखे पा. उमेदवाराला फक्त एक मत, आ. थोरांतांकडून विखेंचा आख्खा गट चारीमुंड्या चित!
- सुशांत पावसे
सार्वभौम (संगमनेर) :-
संगमनेर तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत कोण बाजी मारते याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. कारण, माजी महसुलमंत्री आ. बाळासाहेब थोरात विरुद्ध विद्यमान महसुलमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी एकास एक उमेदवार उभा केला होता. मात्र, आ. बाळासाहेब थोरात यांनी ह्या निवडणूकीत बाजी मारून ना. विखे गटाला चारीमुंड्या चितपट केले आहे. आ. थोरातांनी विरोधकांचे डिपॉझिट जप्त करून अठराच्या अठरा जागेवर विजय मिळवुन भाजप पुरस्कृत पॅनलचा सुपडासाफ केला आहे. त्यामुळे, आ. थोरातांपुढे विखेगटाचा ठाव ठिकाणा देखील लागलेला नाही. इतकेच काय.! विखे गटाच्या एका उमेदवाराला तर अवघे एक मत पडले आहे. त्यामुळे, इतके बळ देऊनही येथील स्थानिक कार्यकर्त्यांच्या कार्यपद्धतीवर ना. विखे पाटलांनी नाराजी व्यक्त केल्याचे बोलले जात आहे.
खरंतर, जसे ना. विखे पाटील मंत्री झाले आणि पालकमंत्री म्हणुन जिल्ह्यात वर्णी लागली तेव्हापासून त्यांनी संगमनेर तालुका आपल्या निशाण्यावर धरला. कार्यकर्त्यांच्या मागणी नुसार अधिकाऱ्यांची उचलबांगडी केली. संगमनेरात जिल्हा नियोजनातून भरगोस निधी दिला. काही अधिकाऱ्यांचे अधिकार देखील काढले. काहींना खडेबोल सुनावले मात्र, कार्यकर्त्यांकडुन ना. विखे पाटलांना रिझल्ट "शून्य" आला. कारण, ज्या फरकाने बाजार समितीती उमेदवार पडले. तेथुन भाजपाचा रिझल्ट आणण्यासाठी ना. विखे पाटलांना फार पराकाष्टा करावी लागेल हेच वास्तव आहे. विरोधकांची आपापसातील गटबाजी, तक्रारी, ऐन वेळेस तालुका अध्यक्षांची माघार, एकमेकांच्या विरुद्ध कुरघोडी हे सर्व कारणे पराभवाला कारणीभूत ठरले आहेत. तर, संगमनेर बाजार समितीमध्ये विखे पाटील पुरस्कृत भाजपाला जनतेने पुर्णपणे नाकारले हे देखील नाकारुन चालणार नाही. ना. विखे, खा. विखे, खा. लोखंडे अशा अनेकांनी बाजार समितीत कंबर कसली. मात्र, "सौ-शेर" एक "सव्वा-शेर" अशी परिस्थिती संगमनेरातील बाजार समितीत दिसून आली. आजही जनता आ. बाळासाहेब थोरातांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे हे पुन्हा एकदा दिसुन आले.
दरम्यान, गेली अनेक वर्षे संगमनेरची कृषी उत्पन्न बाजार समिती ही बिनविरोध होत होती. मात्र, अनेक वर्षांनंतर संगमनेर बाजार समितीची अठरा सदस्यांसाठी रणशिंगण फुंकले होते. यामध्ये अनेक भाजपाचे मातब्बर नेते उभे राहिले. मात्र, त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. भाजपाचे माजी तालुका अध्यक्ष डॉ. अशोक इथापे, विद्यमान शहराध्यक्ष श्रीराम गणपुले,शिवसेनेचे माजी तालुकाध्यक्ष जनार्दन आहेर सरपंच संदिप देशमुख, संजय पावसे आशा दिग्गज नेत्यांचा पराभव झाला. यामध्ये जनार्दन आहेर यांना समाधानकारक मते मिळाली. खरंतर, आता कुठेतरी प्रस्तापितांचा विरोध पाहायला मिळतोय अशी भावना जनतेतून व्यक्त होत आहे. कारण, अनेक वर्षे ही पॅनल तयार करण्यात गेली. संपूर्ण पॅनल उभा राहिला तर विरोधकांना मतदानाची आकडेवारी दिसेना. त्यामुळे, वर्षानुवर्षे इथे भाजपाने कधी लक्ष घातले नाही. संगमनेर मतदार संघात आजही भाजपाचे सॉफ्ट कॉर्नर आहे का? असा प्रश्न जनकारांना पडला आहे. कारण, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नगर जिल्ह्याचे पक्ष निरीक्षक आहे. त्यांनी कधी आ. थोरतांना डिवचले नाही. मात्र, तालुक्यात कधी संघटन देखील बांधले नाही. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी पदाधिकाऱ्यांची तात्पुरती झाडाझडती घेतली. त्यानंतर कधी संगमनेरात संघटनेला ताकद दिली नाही. तर, थोरात हे धुतल्या तांदळासारखे शुद्ध आहेत. असे भाजपाचे ज्येष्ठ नेते म्हणाले होते. त्यामुळे, आजतागायत संगमनेरात कधीच विरोधकांच्या नशिबी विजय पाहायला मिळाला नाही. एकही स्थानिक स्वराज्य संस्थेला विरोधकांना शह देता आला नाही. निवडणुकीत फक्त वल्गना करायची, नंतर दिसेनासे व्हायचे हा इतिहास आता विरोधकांना पुसावा लागेल.
दरम्यान, आ.थोरातांना हरवणे आपल्याला काही अप्रुप नाही अशीच काहीशी परिस्थिती संगमनेर मधील विरोधकांकडुन वारंवार दिसुन येत आहे. थोडक्यात उदा. सहकारी साखर कारखाना निवडणुकीत विरोधकांनी टाकलेली नांगी. विरोधकांनी निवडणूक न लढवता सेटलमेंट करण्यास इच्छा दर्शवली व चर्चेतुन तडजोडी अंती एक तज्ञ संचालक घेण्यास आपले भाग्यच मानू लागले. विरोधकांनी कारखान्याची आपली विरोधाची तलवार म्यान करीत निवडणुक बिनविरोध सोडून दिली. आजपर्यंत एकही संचालक निवडून आला नाही, एक येतो तो पदरात पाडुन घेऊ असे विरोधकांनी ठरविले. त्यामुळे, विरोधकांनी आपले सहा अर्ज माघारी घेतले. सौ.जयश्री शिंदे यांनी बैठकीत तज्ञ संचालक म्हणुन गुलाल उधळला. मात्र, सौ. जयश्री शिंदे यांना ते संचालक पद दिले नाही. त्यामुळे, आ. थोरात हे विरोधकांच्या डोक्यात अगदी सहज टपली मारून राजकारण करतात हेच वास्तव आहे. संगमनेरातील विरोधकांकडून बुळगा विरोध होताना दिसतो. तो भाजपच्या वरिष्ठांनी लक्ष घालुन संघटनेवर कसे भर देऊन नवीन चेहरे रणांगणात उतरावा लागतील यावर भाजपला आत्मचिंतनाची गरज आहे.
संघर्ष सुरूच राहील- अमोल खताळ
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत जनसेवा मंडळाच्या उमेदवारांनी केलेली राजकीय लढाई धाक दडपशाहीच्या विरोधात होती. झालेल्या पराभवाने खचून न जाता भविष्यातही सामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी लढाई सुरूच राहील आशी प्रतिक्रीया जनसेवा मंडळाच्या वतीने अमोल खताळ यांनी दिली. ते म्हणले आहे की बाजार समित्याच्या निवडणुकीत सताधारी गटाचा विजय कसा झाला हे जनतेन पाहील आहे.कोणतीही संस्था कर्मचारी आणि पैसा नसलेले सामान्य कुटूबांतील उमेदवार विचारांची लढाई करण्यासाठी निवडणुकीत उतरले होते.या उमेदवारांना पडलेली मत लक्षात घेता प्रस्थापितांना तालुक्यात विरोध आहे हे सिध्द झाले आहे.