12 वीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थीवर आत्याचार, गोंडस मुलास जन्म दिला फालतू मुलावर प्रेम झालं, गावातल्या तरुणावर गुन्हा.!
सार्वभौम (अकोले) :-
अवघ्या 17 वर्षाच्या शालेय मुलीवर अत्याचार झाला. त्यातून ती गर्भवती राहिली आणि तिने एका गोंडस मुलास जन्म दिला. ही धक्कादायक घटना अकोेले तालुक्यातील वाघापूर येथे 2022 ते 16 एप्रिल 2023 या दरम्यान घडली. हा प्रकार पीडित मुलीच्या घरी माहित नव्हता. मात्र, अचानक पोट दुखू लागले आणि नंतर दवाखान्यात दाखल केले असता हा प्रकार उघड झाला. मात्र, अन्य काही गोष्टी करण्यासाठी वेळ निघुण गेला होता. त्यानंतर साडेआठ महिने पुर्ण झाले असता आळेफाटा (जि. पुणे, ग्रामीण) येथे पीडितेची प्रसुती करण्यात आली. यात तिने फार गोंडस मुलास जन्म दिला आहे. हा सर्व प्रकार घडल्यानंतर जेव्हा पीडित मुलीची मानसिकता ठिक झाली. तेव्हा तिने थेट पोलीस ठाणे गाठले. याप्रकरणी अमोल भागवत लुकारी ( रा. वाघापूर, ता. अकोले) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सुमारे दीड वर्षापुर्वी पीडित मुलगी आणि तिच्या गावातील अमोल भागवत लुकारी याचे सोबत ओळख झाली होती. कधी भेटणे तर कधी मोबाईलवर बोलणे यातून त्यांच्या ओळखीचे रुपांतर प्रेम झाले. दोघांना भेटी अनावर होत असल्यामुळे ते घरच्यांना न सांगता लपुन बोलत व भेटत असे. त्यानंतर एप्रिल 2022 या महिन्यात पीडित मुलगी घरी एकटी होती. तेव्हा, अमोल लुकारी हा तिच्या घरी गेला होता. तेव्हा तो म्हणाला. की, माझे तुझ्यावर खुप प्रेम आहे. आपण एकमेंकासोबत लग्न करु. मात्र, या गोष्टीला तिने विरोध केला. तरी देखील त्याने अल्पवयीन मुलीच्या नासमझपणाचा फायदा घेत तिला वेगवेगळी अश्वासने दिली. तिला आणखी विश्वासात घेऊन अमोल याने पीडितेवर अत्याचार केले.
दरम्यान, हा प्रकार एकदाच नव्हे.! तर, जेव्हा- जेव्हा पीडितेच्या घरी कुणी नसे. तेव्हा-तेव्हा अमोल हा पीडितेच्या घरी येवुन तिच्या सोबत वेळोवेळी शरीर संबंध करत असे. या प्रकारामुळे काही दिवसांनी पीडितेला दिवस गेल्याचे लक्षात आले. तेव्हा तिने आरोपी अमोल लुकारी यास सांगितले. मात्र, त्याच्याकडून कोणताही रिप्लाय आला नाही. वारंवार संपर्क केल्यानंतर त्याने तिला सांगितले की, तु कुणाला काही एक सांगु नको. हा प्रश्न आपण व्यवस्थित सॉल करु आणि त्यानंतर आपण दोघे लग्न करु. त्याच्यावर विश्वास टाकून तिने घडला प्रकार कोणाला सांगितला नाही. असे असताना देखील पीडित मुलगी तिच्या स्कुटीवर कॉलेजला जात असे.
दरम्यान, हा प्रकार फार दिवस झाकण्यासारखा नव्हता. त्यामुळे, दोघेही चिंतेत होते. गावाकडे वैद्यकीय सुविधा नसल्याने पीडितेचे पोट जास्तच दुखू लागले होते. त्यामुळे, ती आरोपी अमोल यास त्याबाबत वारंवार सांगत होती. परंतु तो पाहु, काहीतरी करु, असे म्हणत दुर्लक्ष करीत होता. दरम्यानच्या काळात जास्तच त्रास होऊ लागल्याने पीडित तरुणीने दि. 15 जानेवारी 2023 रोजी तिच्या आईस काही गोष्टी सांगितले. त्यानंतर आईच्या लक्षात आले. की, आपल्या मुलीस दिवस गेले आहे. त्यानंतर आईने व लहीत येथील नातेवाई यांना सांगितले. त्यांनी तत्काळ पीडित मुलीस आळेफाटा येथील श्री. हॉस्पिटलमध्ये नेले. त्यावेळी डॉक्टरांनी सांगितले. की, ही मुलगी साडेआठ महिन्याची गर्भवती आहे. वेळ कमी असल्यामुळे तिला डॉक्टरांनी दाखल करुन घेतले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दि. 16 जानेवारी 2023 रोजी पहाटे पीडितेची डिलीवरी झाली. त्यानंतर पीडित मुलगी शुध्दीत आल्यानंतर तिला आईने सांगितले. की, मुलगा झाला आहे. हा सर्व भयानक प्रकार असला तरी पीडितेस घडल्या प्रकाराची माहिती विचारली असता तिने अमोल लुकारी याचे नाव सांगितले. त्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.