आम्ही जेलमध्ये गेलो तर एकटे जाणार नाही, त्यांनाही घेऊन जाऊ.! आम्ही घाबरत नाही, गायकर आक्रमक झाले.!


-  सागर शिंदे 

सार्वभौम (अकोले) :- 

                      अगस्ति सहकारी साखर कारखाना चालविण्यासाठी आम्ही प्रचंड मेहनत करतो आहे. जर ते समृद्धी विकास मंडळाच्या ताब्यात आला नसता. तर, तो चालु होण्याच्या आत बंद पडला असता. आज आम्ही स्वत:च्या नावे कोटी-कोटी रुपये कर्ज काढून 15 ते 20 कोटी रुपये पतसंस्थांच्या माध्यमातून काढले आहेत. अन त्याच पतसंस्थांच्या चौकशा लावून आम्हाला जेलमध्ये टाकण्याच्या भाषा हे करत आहेत. जे लोक आमच्या सोबत आहेत त्यांच्या संस्था, पतसंस्था यांच्या चौकशा लावण्याच्या धमक्या देऊन त्यांच्यावर दबाव टाकत आहेत. म्हणजे सत्तेसाठी इकते गलिच्छ राजकारण आम्ही आजवर कधी पाहिले नाही. मात्र, कारखाना आणि येथील संस्था टिकविण्यासाठी आम्हाला जेलमध्ये जायची वेळ आली तरी काहीच हरकत नाही. पण, आम्ही जेलमध्ये, गेलो तरी एकटे जाणार नाही, त्यांनाही घेऊन जाऊ, आम्ही त्यालाही घाबरत नाही असे म्हणत अगस्ति कारखान्याचे चेअरमन सिताराम पा. गायकर यांनी विरोधकांवर शब्दशस्त्रांनी मारा केला. फार कमी वेळा संयमी गायकर पा. आक्रमक झाल्याचे पहायला मिळते. त्यात आजची एक सभा अशा प्रकारच्या भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. ते कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आज दि. 24 एप्रिल 2023 रोजी राजूर येथील सभेत बोलत होते.


            ते पुढे म्हणाले. की, माझ्या राजकीय कार्यकिर्दीत मला पहिल्यांदा असे आठवतेय की, काल झालेली खरेदी विक्री संघाची निवडणुक इतक्या चुरशीची का झाली? याचे चिंतन मी रात्रभर करत होतो. झोप लागली नाही अन उत्तरही मिळाले नाही. मात्र, एक प्रश्न मला पडला. की, ज्यांनी हा खरेदीविक्री संघ बंद पाडला.  त्यांनी हा आटापिटा कशासाठी केला असावा? आम्ही चालु करण्यासाठी प्रयत्न करत आहोत तर यांना तो बंदच का ठेवायचा आहे.? ते ही गणित उलगडले नाही. खरंतर आम्ही तेथे काम केले आहे. मात्र, आमचे नेतृत्व माजी मंत्री करीत होते, गेली कित्तेक दशकं तुम्ही सत्तेत होता. मग, तुम्ही आम्हाला बळ का दिले नाही. उलट नेतृत्व करीत असताना संस्था अडचणीत आणून ठेवल्या आणि आता त्या आम्हाला उर्जीत अवस्थेत आणताना नाकीनव येऊ लागले आहे. अशी अनेक प्रश्न कधीकधी सहज मनाला खातात. मात्र, उत्तर मिळत नाही. परंतु आता हा खरेदी विक्री संघ आम्ही चालु करुन दाखविणार आहोत. आता देखील जिल्हा बॅंकेत काम करताना शेतकऱ्यांच्या हितासाठी आमचा आग्रह असतो. जिल्हा बॅंकेकडून पुर्वी दोन गायी मिळत होत्या, त्याची मर्यादा आता चार असणार आहे. म्हणजे जोडधंद्यासाठी हा फार मोठा निर्णय ठरणार आहे. गेल्या काही काळात सोसायची सचिवांचे पगारवाढ करण्याचे काम आम्ही केले आहे. सोसायट्यांना बळ देण्याचे काम आम्ही केले आहे. त्यामुळे, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सचिव ते चेअरमन - व्हा चेअरमन तसेच सभासद आम्हाला मदत करतील यात शंकाच नाही. तर, आमदार डॉ. किरण लहामटे यांचे बऱ्याच गावांमध्ये कामे चालु आहेत. त्यामुळे, ग्रामपंचायत सदस्य देखील समृद्धी मंडळाला मदत करतील.

             गायकर म्हणाले की, कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या काही वर्षात जे काम होणे अपेक्षित होते. ते काही झाले नाही. मात्र, गेल्या पाच वर्षात किमान कृषी उत्पन्न बाजार समिती जीवंत ठेवण्याचे काम आम्ही केले आहे. विरोधकांकडे सत्ता होती, पावर होती तर यांनी राजुरला उपबाजार का उभा केला नाही .? ब्राम्हणवाडा येथे उपबाजार का उभे केले नाही? येथे भाजीपाला लिलाव का नाही ? अशा अनेक ठिकाणी काम करता आले असते. मात्र, तसे झाले नाही. येणाऱ्या काळात राजूर येथे उपबाजार, एखादी राईस मिल, भाजीपाला मार्केट वैगरे कामे करण्यासारखी आहेत. त्यामुळे, मला विश्वास आहे. शेतकरी बांधवांनी जसा अगस्ति कारखाना आणि खरेदी विक्री संघात आमच्यावर विश्वास टाकला. तसा कृषी उत्पन्न बाजार समितीत देखील टाकतील आणि आमच्या सर्व उमेदवारांना कप बशी चिन्हाचे बटन दाबून विजयी करतील. मात्र, या दरम्यान एक गोष्ट लक्षात ठेवा. पुन्हा गायकरांना बदनाम करण्याचे सुर येतील, पुन्हा रात्री आर्थपुर्ण उलाढाली होतील, पुन्हा मते फोडाफोडी होईल मात्र त्याला कोणी बळी पडायचे नाही. सर्वांना एकोप्याने लढायचं आणि कोणत्याही प्रकारे क्रॉस मतदान न  करता पॅनल टू पॅनल मतदान करुन सर्व उमेदवारांना निवडून आणायचे आहे. अशा प्रकारचा निर्धार आपल्याला करायचा आहे. असे गायकर पा. म्हणाले.

मार्केट कमिटीचा गुलाल आमचाच.!!

माझ्या आमदारकीच्या काळात दोन वर्षे कोविड होता. तरी मी झटून काम करीत होतो. नंतर दिड वर्षे सत्तेत असताना हजारो कोटी रुपयांचा निधी आणून तालुक्यात कामे चालु आहेत. ४० गाव डांगाण परिसरात प्रत्येक गावात विकासकामे सुरु आहेत. त्यामुळे, ग्रामपंचायतीत असणारे सरपंच, उपसरपंच आणि सदस्य यांची मला साथ लाभणार आहे. तसेही बऱ्यापैकी ग्रामपंचायत ह्या महाविकास आघाडीच्या ताब्यात आहेत. त्यामुळे, भलेही विरोधकांचे तीन उमेदवार बिनविरोध झालेले असेल. तरी, १५ जागांवर आम्ही निर्विवाद वर्चस्वात राहणार आहे. शेतकरी मायबाप आणि सभासदांनी अगस्ति कारखान्यात आम्हाला जो कौल दिला. तो आम्ही सार्थक ठरविला आहे. काल देखील बंद पडलेला खरेदी विक्री संघ कोण उर्जित आवस्थेत आणू शकतो. तर, मतदारांना माहित होते. महाविकास आघाडीच हे काम करु शकते. त्यामुळे, ११- ०२ असा आमचा विजय झाला. त्यामुळे, कृषी उत्पन्न बाजार समितीत देखील आम्ही गुलाल घेऊ अशी मला खात्री आहे.

      डॉ. किरण लहामटे (आमदार, अकोले)