पिचड-पिता पुत्रांचा पुन्हा दारुन पराभव.! भाजपाला ०२ तर महाविकास आघाडीला ११ जागा.! कॉंग्रेस नगरसेवक भाजपासोबत.!
- सागर शिंदे
सार्वभौम (अकोले) :-
अकोले तालुक्यातील बंद पडलेल्या खरेदी विक्री संघाची निवडणुक आज पार पडली. यात भाजपाचा दारुन पराभव झाला असून त्यांच्या फक्त दोन जागा निवडून आल्या आहेत. तर महाविकास आघाडीच्या ११ जागांवर विजय झाल्याने कार्यकर्ते व नेत्यांनी एकच जल्लोष केला आहे. या निवडणुकीत पुन्हा एक चित्र लक्षात आले. की, जर सर्व विरोधक एकत्र आले. तरच पिचड पिता पुत्रांचा पराभव होऊ शकतो. त्यामुळे, आपण कायम एकत्र होऊन निवडणुका कढल्या तर पिचडांच्या अंगावर कधीच गुलाल पडणार नाही. अशा प्रकारचे मत ऍड. वसंत मनकर यांनी व्यक्त केले. तर, या विजयाचे शिल्पकार म्हणून सिताराम पा. गायकर यांना देण्यात आले.
खरंतर, २०१९ च्या निवडणुकीनंतर तालुक्यातील सर्वच निवडणुकीत खांदेपालट झाल्याचे आपल्याला पहायला मिळाले आहे. विशेष म्हणजे मतदारांनी बंद पडण्याच्या मार्गावर असणार्या सर्व संस्था महाविकास आघाडीच्या पारड्यात टाकल्या असून त्यांना विश्वास आहे. की, याची उर्नभरण कोण करु शकते. तर, आमदार डॉ. लहामटे आणि सिताराम पा. गायकर, त्यामुळे, आमदारकी आली आणि त्यानंतर लगेच नगरपंचायत महाविकास आघाडीकडून गेली. त्यानंतर कठीण परिस्थितीतील कारखाना आला आणि दुधसंघ पुन्हा भाजपाकडे गेला. त्या पाठोपाठ बंद पडलेला खरेदी विक्री संघ महाविकास आघाडीकडे आला आणि आता मार्केट कमीटीत भाजपाचे तीन उमेदवार आधिच विजयी झालेले आहेत. त्यामुळे, या खांदेपालटाला महाविकास आघाडी खंड पाडेल का? हे पाहणे फार महत्वाचे आहे.
खरंतर दुधसंघ आणि त्यानंतर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सिताराम पाटील गायकर यांची भाजपाकडून प्रचंड बदनामी करण्यात आली. त्यामुळे, शंकेचे कोलीत घेऊन त्यांच्याच पक्षातील नेते - कार्यकर्त्यांनी आखं रान पेटविले. मात्र, त्यावर उत्तर न देता नरो वा कुंजरो अशी भुमीका त्यांनी घेतली. आज मात्र, डॉ. किरण लहामटे यांना स्वत: सभेत सांगितले. की, या विजयाचे शिल्पकार गायकर साहेब आहेत. आम्हाला सहकार काहीच काळत नाही, आम्ही गायकर साहेबांच्या बोटाला सहकारात चाललो आहोत. अशा प्रकारे अनेकांनी त्यांना या विजयाचे शिल्पकार म्हणून संबोधित केले. त्यामुळे, गायकर यांनी देखील त्यांच्या भाषणात सांगितले. की, संयम फार मोठा बलवान असतो. तो फक्त वेळेला उत्तर देतो. मला कितीही बदनाम केले तरी कोणत्याही निवडणुकीत कधी बंड केले नाही आणि पक्ष सोडून जाण्याचा विचार केला नाही. आज खरेदी विक्री संघ जिंकला उद्या मार्केट कमीटी देखील जिंकून दाखवु असे म्हणत त्यांनी पुढील गुलाल तयार ठेवा असा विश्वास व्यक्त केला.
खरंतर, माजी आमदार वैभव पिचड यांचे व त्यांच्या काही कार्यकर्त्यांचे कौतुक केले पाहिजे. कारण, एकीकडे पाच ते सहा पक्ष आणि दुसरीकडे त्यांच्याकडून दोनतीन पक्ष असे असताना देखील त्यांनी चांगली लढत दिली. मतांची गोळाबेरीज पाहिली. तर, अगदी चार सहा मतांनी भाजपाचे उमेदवार पडले आहेत. त्यामुळे, त्यांचा विश्वास १३ पैकी १३ असला तरी तो काही गैर नव्हता. मात्र, या दरम्यान, भाजपाचे काही नेते व कार्यकर्ते फारच हवेत होते. त्यांच्यातील आत्मविश्वास पाहिला किंवा त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर इतके अतिशयोक्ती बोलणे होते. की, असल्या ऊताविळ कार्यकर्त्यांमुळेच भाजपाला भविष्यात कधी यश मिळते काही नाही देव जाणे अशा प्रकारची चर्चा सुरू होती. यात आणखी एक विशेष म्हणजे, कॉंग्रेसचे नगरसेवक प्रदिप नाईकवाडी यांना निवडून आणण्यासाठी महाविकास आघाडीतील कसोशीने प्रचार केला होता. मात्र, आज प्रदिप नाईकावाडी हे भाजपाच्या गोटात सामिल झाल्याचे पहायला मिळाले. त्यामुळे, भर सभेत तो एक मुद्दा चर्चेचा ठरला होता. मात्र, माधुभाऊ नवले, विक्रम नवले, दादापाटील वाकचौरे, नेहे यांसह अनेकांचे या विजयात फार मोठे योगदान असल्याचे अनेकांनी नमुद केले. तर, कॉंग्रेसमधील कार्यकर्त्यांच्या असल्या वागण्याने महाविकास आघाडी आणि आमदारांनी प्रचंड नाराजी व्यक्त केला. त्यांनी साथ दिली असती तर आज १३ च्या १३ उमेदवार निवडून आले असते. मात्र, पराभूत झालेल्या आवारी आणि फापाळे या दोन्ही व्यक्तींना स्विकृत संचालक म्हणून काम करण्याची संधी देण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला आहे.
हे आहेत विजयी उमेदवार..!
कासार भाऊसाहेब कारभारी (४५) (भाजपा), नाईकवाडी नानासाहेब मारुती (४३) (भाजपा), बाकी सर्व महाविकास आघाडीचे विजयी उमेदवार - कोटकर दत्तात्रय माधव (४६), तळेकर निलेश चंद्रभान (४६), नवले साईनाथ भाऊसाहेब (५०), नाईकवाडी प्रकाश संपत (४८), कुमकर विठ्ठल श्रीपत (१५७), डोंगरे दगडू केशव (१३३), नाईकवाडी मंदाकिनी सुरेश (१८६), पोखरकर कुमोदीनी सदाशिवराव (२०६), बांडे चंदर भाऊ (२०८), तिटमे माधव बाबुराव (२३९), बिन्नर मधुकर निवृत्ती (२३२) अशी १३ उमेदवार निवडून आले आहेत. यात ०२ भाजपाचे असून ११ हे महाविकास आघाडीचे आहेत. यात एकूण ९३ ठराव सोसायटी मतदार संघातून होते. त्यापैकी ९२ मतदारांनी मतदान केले आहे. व्यक्तीगत २६१ मतदान होते. त्यापैकी २५० जणांनी मतदान केले आहेत. दोन्ही मिळून ३४२ जणांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. तर एकूण ९७ टक्के मतदान झाले आहे.