राष्ट्रवादी कॉंग्रेसला घराचा आहेर.! जिल्हाउपाध्यक्ष भाजपात सामिल, म्हणजे माकडांचा हाती आता तलवारी देऊ नका.!

- सागर शिंदे     

सार्वभौम (अकोले) :- 

अकोले तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती आणि बंद पडलेल्या खरेदी विक्रि संघाची निवडणुक आता चांगलीच रंगू लागली आहे. या रणधुमाळीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष सुरेश खांडगे यांनी राष्ट्रवादी पक्ष आणि लोकप्रतिनिधी यांच्यावर चांगलीच तोफ डागली आहे. ते म्हणाले की, राजाने माकडाच्या हाती तलवार दिली असून तो झोपी गेला. जबाबदारीचे भान सोडून माकडाने तलवार गरगर फिरविली अन एक वेळ अशी आली. की, माकडाने माशी मारण्याच्या नादात राजाचे नाक छाटून टाकले. त्यामुळे, जे झाले ते झाले. आता मात्र, आपल्याला येणार्‍या निवडणुकीत स्वत:चे नाक छाटून घ्यायचे नाही. असे म्हणत खांडगे यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना घराचा आहेर दिला. विशेष म्हणजे खांडगे यांनी उभी हयात (१९९३ पासून) पिचड कुटुंबियांच्या विरोधात काम केले आहे. २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांची भुमीका महत्वाची होती. त्यामुळे त्यांना जिल्हाउपाध्यक्ष म्हणून नेमण्यात आले होते. तर, त्यांनी सोशल मीडियावर राजिनामा दिल्याचे बोलले जाते. मात्र, वरिष्ठांनी त्यांचा राजिनामा मंजूर केला असल्याचे देखील बोलले जात आहे. त्यामुळे, येणार्‍या काळात राष्ट्रवादीतून २०१९ मध्ये पक्षासोबत नेटाने लढणारा मोठा गट भाजपाला जाऊन मिळणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे.

सन २०१९ साली पिचड साहेबांसह अनेकांनी राष्ट्रवादी सोडली. मात्र, एक निष्टावान गट पक्षात कायम होता. मोठ्या कठीण परिस्थितीत त्यांनी पक्षाचा झेंडा नेटाने फडकवत ठेवला. मात्र, नंतर झाले काय? सुरेश खांडगे, संपत नाईकवाडी, संदीप शेणकर, राजेंद्र कुमकर यांच्यासह कित्तेक नावे घेता येतील ज्यांना पक्षात फार सन्मान मिळाला नाही. आमदार महोदयांकडून हवी तशी वागणूक मिळाली नाही. त्यामुळे, नेत्यांच्या मनातून वारंवार खदखद बाहेर पडत होती. पक्षाशी निष्ठा मात्र व्यक्तीरोषातून अनेकांनी हाताची घडी तोंडावर बोट ठेवले होते. मात्र, ही खदखद फार काळ टिकणारी नव्हती, म्हणून तर उभी हयात ज्या सुरेश खांडगे यांनी पिचड परिवाराशी राजकीय झुंज दिली. आज ते पिचड साहेबांसाठी मते मागताना दिसले. याचे आत्मचिंतन राष्ट्रवादी पक्षाने करणे गरजेचे आहे. हेच उदाहरण भिमाजीकृष्णाजी सदगिर आणि त्याचा मुलगा चक्रधर सदगिर यांच्याबाबत सांगण्यात येत आहेत. त्यामुळे, एक-एक नेता-कार्यकर्ता असा सुटत राहिला, तर प्रत्येक वेळी २०१९ ची पुनरावृत्ती होणार नाही. याची नोंद राष्ट्रवादी पक्षाने घेणे गरजेचे आहे.

म्हणजे, कालपर्यंत जिल्हाउपाध्यक्ष म्हणून हिरारीने काम करणार्‍या खांडगे सरांच्या मनात आज अचानक कमळ फुलले असे काही नाही. त्यासाठी पक्षाची धेय्यधोरणे आणि आमदारांच्या अनेक वागणुकींचा इतिहास दडलेला आहे. फुकट माकडे तलवारी फिरवू शकत नाही. याचे आत्मचिंतन करणे गरजेचे आहे. ही गोष्ट कथन करताना खांडगे सर म्हणाले. एका माकडावर खुश होऊन राजाने त्याला आपला अंगरक्षक नेमले. प्रधान ओरडून सांगत होते, महाराज असे करु नका. मात्र, अंधप्रेमापोटी राजा कोणाचे काही एकत नव्हता. त्याने आपल्या संरक्षणाची जबाबदारी माकडावर नेमली आणि त्याच्या हाती तलवार दिली. माकड खुश झाले आणि तलवार गरगरा फिरु लागले. एकदा राजा गाढ झोपी गेला आणि माकड आवती भोवती फिरत होते. दुर्दैवाने राजाच्या नाकावर माशी बसली आणि तोच माकडाने तिला मारण्यासाठी तलवार फिरविली. त्या क्षणी राजाचे नाक काटले गेले. त्यामुळे, आता माकडांच्या नादी लागून आपले नाक आपल्याला काटून घ्यायचे नाही. असे म्हणत खांडगे यांनी एका दगडात अनेक पक्षी मारले. तर, चांगल्या कार्यकर्त्यांच्या हाती तलवारी देऊन मागील चुका सुधारायच्या आहेत. राष्ट्रवादीने एकटा जीव सदाशिव हा पिक्चर काढला आता आपण (भाजपाने) त्यांच्यावर येड्यांची हा पिक्चर काढायचा अशी टिका केली. तसेच माकडांच्या हाती घड दिला तर आपल्या हाती काय केळं येतील का? असे म्हणत त्यांनी राष्ट्रवादीच्या लोकप्रतिनिधींचे नाव न घेता टोलेबाजी केली.

आवाका पाहून ड्रवड्राव करा.! 

आजी आमदार यांनी डॉ. किरण लहामटे यांच्यावर टक्केवारीहून टिका केली. त्यावर उत्तर देताना लहामटे म्हणाले भाड्याच्या खोलीतून आले आणि सात पिढ्या बसून खातील अशी संपत्ती कशी मिळविली याची महिती त्यांनी वडिलांना विचारावी. मी टक्केवारी घेत नाही तुम्ही तरी दुधातून टक्केवारी खातात अन नसेल खात तर मी माझ्या लेकरांच्या डोक्यावर हाथ ठेवतो त्यांनी देखील ठेवून दाखवावा. कारखाना माझ्या ताब्यात दिला आता मार्केट कमिटी आणि खरेदी विक्रीसंघ ताब्यात द्या. की तो उर्जीत आवस्थेत आणतो. माजी आमदार यांना २०१४ ही फार दुर आहे. याच निवडणुकीत पहा मी यांचे कसे हाल करतो. तुम्ही नगरपंचायत माझ्या ताब्यात दिली नाही. त्यामुळे, अजून काहीच कामे झाली नाही. उलट मी १५ ते १६ कोटींची कामे करत आहे. त्यामुळे, बेडकाने त्याचा आवाका पाहून ड्रवड्राव केले पाहिजे असा घनाघात डॉ. लहामटे यांनी माजी लोकप्रतिनिधी यांच्यावर केला.