महसुलमंत्र्यांच्या कटाक्षातही तलाठी दलाल ठेऊन करतोय लाचखोरी.! संगमनेरात दोघांना अटक, स्वतंत्र सातबारा करण्यासाठी 36 हजार घेताना बेड्या ठोकल्या.!

 


सार्वभौम (संगमनेर) :- 

                  मंगळापूर येथील जमिन वाटपाची नोंद करण्यासाठी व ती 11 जणांचे नाव करण्यासाठी तलाठी व एजंटने आशा दोघांनी 36 हजार रुपयांची लाच घेतल्याचा धक्कादायक प्रकार आज शुक्रवार दि. 21 एप्रिल 2023 रोजी 5:30 वाजण्याच्या सुमारास घडला. यात तलाठी धनराज नरसिंग राठोड(रा. इंदिरागल्ली, ता. संगमनेर), योगेश विठ्ठल काशीद (रा. घुलेवाडी फाटा,ता. संगमनेर)या दोघांना नाशिक लाचलुचपत विभागाने बेड्या ठोकल्या आहेत. लाचखोर राठोड याने ही रक्कम स्वीकारली आहे. तर ही रक्कम तलाठी याची असल्याचे एजंटने सांगितले आहे. त्यामुळे, ज्या महसूलमंत्र्यांनी अगदी करडी नजर या संगमनेरात ठेवली त्यांच्या काळात असा भ्रष्टाचार बोकाळला आहे का? हा चर्चेचा विषय ठरला आहे. याप्रकरणी आता दोघांना ताब्यात घेतले असुन त्यांची संपत्ती, बँकखाते, घरझडती,ऑफीसची झडतीसुरू केली आहे. यासाठी पुढील प्रक्रीया सुरू केली आहे. यात दोघांवर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तर जेव्हापासून पोलीस निरीक्षक साधना इंगळे, गायत्री जाधव यांनी नाशिक लाचलुचपत विभागाचा चार्ज घेतला आहे. तेव्हापासून भल्याभल्या लाचखोर भ्रष्ट अधिकाऱ्यांना त्यांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यामुळे, नाशिक लाचलुचपत विभाग भ्रष्टाचाराचा कर्दनकाळ म्हणुन त्यांची ख्याती झाली आहे.

              याबाबत सविस्तर माहिती अशी की, मंगळापूर परिसरात एक प्लॉट खरेदी विक्रीच्या उद्देशाने शेतीचा प्लॉट हा बिनशेती (तहसील एन. ए)करून स्वतंत्र सातबारा उतारा तयार करून देण्यासाठी तक्रारदार तलाठी ऑफीसला येत. त्यामुळे, तक्रारदार हा उताऱ्यावरील नावे कमी करण्यासाठी वारंवार तलाठ्याची भेट घेण्यासाठी येत. परंतु रोज नवे कारण सांगुन तलाठी राठोड या नोंद करण्यास टाळाटाळ करीत. उताऱ्यावर वेगवेगळ्या अकरा जणांचे नावे करण्यासाठी लाचखोर तलाठी धनराज राठोड यांनी चाळीस हजार रुपयांची मागणी तक्रादराकडे केली होती. मात्र, तक्रारदार म्हणाले की, शुल्लक कारणासाठी एवढी मोठी रक्कम कशासाठी द्यायची? मात्र, ऐकतील ते तलाठी कसले? त्यांनी चाळीस हजार रुपयांची मागणी केली. मात्र, तक्रारदार यांच्या वारंवार मागणीला वैतागल्याने त्यांनी थेट नाशिक लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर आज दुपारी त्यांनी थेट संगमनेर गाठले.

               दरम्यान, तक्रादार हे त्यांच्या मतावर ठाम होते. त्यामुळे, जसा लाचलुचपत विभागाने सापळा पडला असता एका एजंटची झाडाधडती घेतली असता त्याच्याकडे 36 हजार रुपये आढळुन आले. याची चौकशी केली असता तलाठी राठोड याना ताब्यात घेण्यात आले. यावेळी लाचखोर राठोड व एजंट यांच्या मागणीनुसार जे काही घडले. त्यानुसार सापळा रचुन या दोघांना लाचलुचपतच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. आज सायंकाळी या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू होती.यात आणखी कोण आहेत का? यांनी यापुर्वी कोणाकडे अशा प्रकारची मागणी केली आहे का? यांच्या घरात तसेच बँकेत किती मालमत्ता आहे. आशा प्रकारची पुढील कारवाई सुरू झाली आहे. संगमनेर तालुक्यात किती भ्रष्टाचार बोकाळला आहे. याची प्रचिती आता येऊ लागली आहे. पोलीस खात्यात अधिकाऱ्यांपासुन ते कर्मचाऱ्यांपर्यंत लाजलुजपतचे छापे आपल्याला पाहायला मिळत आहेत. येथील हप्तेखोरीवर अनेकदा अधिकाऱ्यांकडे तक्रारी झाल्याचे पाहायला मिळत आहे. इतकेच काय! सर्कल पासुन ते तलाठी यांच्यावर  कितीवेळा ट्रॅप होताना दिसत आहे.

दरम्यान, जेव्हापासून पोलीस निरीक्षक साधना इंगळे, गायत्री जाधव यांनी नाशिक लाचलुचपत विभागाचा चार्ज घेतला आहे. तेव्हापासून खऱ्या अर्थाने लाचलुचपत या विभागास उर्जीत अवस्था आली आहे. त्यांच्या काळात सामान्य लोकांचा लाचलुचपत विभागावरील विश्वास वाढला आहे. लोक निर्भिडपणे तक्रारी घेऊन पुढे येत आहेत. खरंतर, अधिकारी हे आपल्या सेवेसाठी असतात. मात्र, शुल्लक कामांचे लाखो रुपये घेऊन लोकांना वेठीस धरले जाते. त्यामुळे, कोणीही अशा प्रकारे लाच न देता. थेट लाचलुपचपत विभागाकडे तक्रार केली पाहिजे. जे कोणी अशा पद्धतीने पुढे येतात त्यांचे पोलीस निरीक्षक साधना इंगळे व गायत्री जाधव यांनी कौतूक केले असून लाच देऊ नका, थेट तक्रार करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.