काही भ्रृण गर्भात राहिले.! डॉक्टरांच्या चुकीने महिलाचा मृत्यु? मृत्युपुर्वी छेडछाड.! चौकशी सुरू.!
सार्वभौम (अकोले) :-
डॉक्टरांनी ऍबॉर्शनच्या गोळ्या चुकीच्या पद्धतीने दिल्याने महिलेच्या अंगाहून जाऊ लागले. गोळ्या खाल्ल्यानंतर देखील गर्भात अवशेष शिल्लक राहिले आणि पुन्हा रक्तस्त्राव होऊ लागला. त्यामुळे, महिलेचा झोपेतच मृत्यु झाला. ही घटना अकोले तालुक्यातील शेणीत येथे घडली. यात सिताबाई संदिप तळपे (रा. शेणीत) यांचा मृत्यु झाला असून याप्रकरणी राजूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. तर, या घटनेनंतर राजूर पोलीस अधिकार्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे चौकशी करण्याची कागदोपत्री प्रोसेस सुरू केली आहे. तर, यात जो कोणी दोषी आढळेल त्याच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल केला जाईल अशी माहिती गणेश इंगळे यांनी दिली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी. की, सिताबाई हिचा विवाह गेल्या काही वर्षापुर्वी संदिप तळपे याच्याशी गावातल्या गावात झाला होता. त्यानंतर यांना एक आपत्य झाले होते. गेल्या महिन्यात सिताबाई यांना दिवस गेले असता मुल ठेवायचे की नाही यावर त्यांच्या कुटूंबात चर्चा झाली होती. जेव्हा गर्भ ठेवायची नाही असे ठरले तेव्हा यांनी एका स्थानिक बीएएमएस डॉक्टरांकडे जाऊन त्यांच्याशी चर्चा केली. गर्भ नको म्हटल्यानंतर या डॉक्टर महाशयांनी त्यांना अधिकार नसताना गर्भपाताच्या गोळ्या दिल्या. मुळात याबाबत महिलेस पुर्ण माहिते देणे, पहिली सोनोग्राफी करणे, किती आठवडे झाले ते तपासणे, गोळ्या कधी व कशा घेणे याची माहिती देणे आणि हे सर्व झाल्यानंतर शेवटी पुन्हा सोनोग्राफी करणे अशी प्रोसेस असते.
दरम्यान, डॉक्टरांनी सिताबाई यांना गोळ्या दिल्या आणि त्यानंतर घरी पाठवून दिले. दुर्दैवाने गोळ्या घेऊन देखील हवा तसा गर्भ बाहेर पडला नाही. जे काही भृ्रण गर्भात होते ते काही अंशी गर्भातच राहिले आणि महिलेला प्रचंड त्रास होऊ लागला. महिना होत आला तरी देखील पोट दुखतच होते म्हणून अन्य काही गोळ्या देखील खाण्याचे काम सुरू होते. दरम्यान, काल फारच त्रास होऊ लागल्याने रात्री सिताबाई झोपी गेल्या होत्या. त्यानंतर झोपेतच त्यांना मृत्यु आला अशा प्रकारची माहिती नातेवाईकांनी दिली आहे. रात्री मयत महिलेला राजूर रुग्णालयात दाखल केले असता त्यांनी सांगितले. की, सिताबाई यांचा मृत्यु अतिरक्तस्त्राव झाल्याने झाला आहे.
दरम्यान, आता कायदेशीर गोष्ट लक्षात घेता मयत झालेल्या सिताबाई यांचा मृत्यु खरोखर नैसर्गिक की घातपात असा प्रश्न निर्माण होतो. तर, त्यांचा गर्भ हा किती महिन्यांचा होता? तो गर्भपात कायदेशीर होता का? याहून महत्वाचे म्हणजे ज्या डॉक्टरांनी हा कारभार केला आहे. त्यांना अशा प्रकारच्या गोळ्या देण्याचा अधिकार आहे का? असे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. तर, यात कायदा म्हणून राजूर पोलिसांची भुमीका फार महत्वाची आहे. यात पोलिसांनी व्हीसीआर राखून ठेवला असून त्याचा रिपोर्ट नाशिक येथून येणार आहे. तसेच केमीकल ऍनॅलिसीस (सीए) रिपोर्ट देखील तपासला जाणार आहे. तसेच आता संबंधित मृत्यु आणि डॉक्टरांचे अधिकार याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक यांना लेख पत्र देऊन अभिप्राय मागविण्यात येणार आहे. त्यामुळे, मयत व्यक्तीचा न्याय हा आता कागदी घोड्यांवर अवलंबून असल्याचे एकंदर दिसते आहे. तर, या पलिकडे संबंधित महिला ही मयत होण्यापुर्वी तिच्याशी काही छेडछाड झाल्याचे देखील बोलले जाते. मात्र, त्याबाबत कोणत्याही प्रकारचे पुरावे नसून हा कड काढण्याचा प्रयत्न तर नाही ना ? किंवा यात काही वास्तव आहे का याची चौकशी पोलीस करीत आहेत.