पहिल्या पतिच्या पैशावर, दुसऱ्या पतिची मौजमजा, बापाच्या मृत्युनंतर संपत्तीत हक्क सोडला म्हणून पत्नीस मारहाण, लोभी नवऱ्यामुळे तिने केली आत्महत्या, गुन्हा दाखल.!
सार्वभौम (संगमनेर) :-
पहिल्या पतिचे निधन झाल्यानंतर कपनीकडून पत्नीस लाखो पैसेही मिळाले. त्यानंतर सत्यशोधक पद्धतीनुसार तिने दुसरे लग्न केले. पण, त्याने देखील मिळालेला पैसा पाण्यासारखा उधळला. पैसे दिले नाही म्हणून शिविगाळ, दमदाटी आणि मारहाण केली. त्यानंतर जेव्हा पत्नीने भावाच्या संपत्तीत हक्क नाकारला तेव्हा मात्र या दुसऱ्या नवऱ्याचे पित्त खवळले. त्याने व त्याच्याकुटुंबाने तिला शारिरीक व मानसिक छळ सुरु केला. आयुष्यात पहिल्या पतीचा घडलेला वाईट प्रसंग आणि पुन्हा असले आभागी आयुष्य वाट्याला आल्यामुळे तिने स्वत:ला संपवून घेण्याचा निर्णय घेतला आणि गळफास घेऊन थेट जिवण संपवून टाकले. अर्थात ही काही फिल्मी किंवा एखाद्या मालिकेची स्टोरी नाही, तर खुद्द संगमनेर तालुक्यातील सोनगाव येथे दि. 14 एप्रिल 2023 रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास घडलेला हा प्रकार आहे. शालु सुदर्शन पठाडे असे मयत महिलेचे नाव असून हा प्रकार घडल्यानंतर अनिल अनाप (रा. सोनगाव सात्रळ, ता. राहुरी) यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार सुदर्शन पठाडे (रा. रहाणे मळा, मोरया रेसिडेन्सी, संगमनेर) याच्यासह अन्य काही व्यक्तींना यात आरोपी करण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी. की, शालु सुदर्शन पठाडे हिचे पहिले लग्न 2011 मध्ये अकोले तालुक्यातील उल्हास सुदाम शिंदे यांच्यासोबत झाले होते. मात्र, दुर्दैवाने त्यांचा 2015 मध्ये मृत्यु झाला. त्यामुळे, वारसदार म्हणून शालु हिला काही रुपये मिळाले होते. दरम्यान, पतीच्या निधनानंतर तिने किती दिवस तसेच रहायचे? म्हणून शालु यांचेच नातेवाईक एस.डी. मंडलिक यांनी शालुसाठी स्थळ आणले होते. हे पाहुणे संगमनेर येथील सुदर्शन पठाडे हे होते. त्यानंतर दि. 15 जून 2017 मध्ये सुदर्शन याच्याशी शालुताई यांचा विवाह पार पडला. ती लग्रानंतर सासरी संगमनेर येथील राहणे मळा, मोरया रेसिडेन्सि येथे नांदणेस गेली होती. सदरचे घर हे दुमजली असल्याने खाली तिचे दिर व सासु राहत होती तर शालू व सुदर्शन पठाडे हे वरच्या रुमध्ये स्वतंत्र राहत होते. लग्न झाल्यानंतर सुदर्शन पठाडे याने सुरवातीचे काही दिवस आपल्या पत्नीशी चांगली वागणूक ठेवली आणि तिच्या नावावर काय-काय मालमत्ता आहे, बॅंक खाते व अन्य चौकशी करुन घेतली.
दरम्यान, ऑक्टोबर 2017 मध्ये शालु हिच वडिल हयात होते. तेव्हा ती त्यांचेकडे आली आणी म्हणाली. की, सुदर्शन पठाडे यास चारचाकी गाडी खरेदी करायची आहे. त्यासाठी त्यांना चार लाख रुपये हवे आहेत. तेव्हा वडिलांनी मुलीच्या प्रेमाखातर तथा संसाराकरिता 4 लाख रुपये दिले. पैसा दिल्यामुळे दोघांचा संसार बर्यापैकी चालु होता. या दरम्यान शालुला मुलगी झाली होती. मात्र, याचा डोळा शालुचे दागिणे आणि बॅंकेतील पैसा यावर कायम होता. त्यामुळे, तो शालुस घेऊन माहेरी तिच्या आईकडे जात असे. तर, सोन्याचे दागिने आणि पैशाची मागणी शालुकडे करीत असे. जेव्हा सुदर्शन हा सारखा पैसे व सोने मागतोय हे तिच्या लक्षात आले. तेव्हा सर्व गोष्टी तिने आपल्या आईच्या ताब्यात देऊन टाकल्या. याच्या असल्या हरकती शालुची आई तिच्या दुसऱ्या लेकीस सांगत होती. तर, सन 2020 मध्ये सुदर्शन पठाडे यास एक गाळा घ्यायचा होता. तेव्हा त्याने पुन्हा शालुकडे पैशांनी मागणी केली. त्यावेळी तिने वडिलांकडुन एक लाख रुपये रोख घेऊन त्यास दिले. असे फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान, पठाडे हा पैशांसाठी चांगलाच चटावला होता. हे शालु हिच्या लक्षात आले. तेव्हा तिने सर्व दागिने आईकडे दिले व आईने बँकेचे लॉकर मध्ये ठेवले आहेत ही गोष्ट सुदर्शन पठाडे यास माहिती झाल्यानंतर त्याने पत्नीस अधिक त्रास देण्यास सुरवात केली. आईकडे ठेवलेले दागिने हे माझ्याकडे घेवुन ये, ते आपण बँकेत ठेवु, त्यावर आपण लोन काढु असे तो तिला वारवार सांगुन त्रास देत होता. तर, घरातील सासू, नणंद सुदर्शनला भडकावून देत होत्या. त्यामुळे घरातील वातावरण हे कायम तणावाचे होत होते. त्यामुळे, सुदर्शन हा नेहमी शालुस मारहाण करीत होता असे ती आईला सांगत होती. या दरम्यानच्या काळात दि. 11 मे 2022 रोजी शालुचे वडिल मयत झाले होते. त्यांचे नावावर असलेले स्थावर व जंगम मालमत्ता यावर दोन बहिणी, आई, व आजी यांचे वारस म्हणुन नाव लावणेकरिता जुन 2022 मध्ये शालु त्यांचे मुळ गावी गेली होती. त्यावेळी शासकीय कार्यालयात सर्व वारसांच्या नावाची नोंद केली. तेव्हा सुदर्शन पठाडे यास वाटले की, शालुने तिच्या संपत्तीचा हक्क सोड केला आहे. तेव्हापासून त्याने पत्नीस शारिरीक व मानसिक त्रास देण्यास सुरवात केली. हा सर्व प्रकार तिला आता असहाय्य झाला होता. त्यामुळे, तिने संगमनेर पोलिस ठाणेस तक्रार दाखल केली होती. तसेच अहमदनगर भरोसा सेल येथे तक्रार देखील दाखल केलेली होती. सदर तक्रारीत पती सुदर्शन पठाडे, सासु-मिराबाई राधाकृष्ण पठाडे, ननद- सुषमा सुधाकर पुंड यांनी तिस पैशासाठी शाररिक व मानसिक त्रास देत असल्याचे तिने नमुद केले होते. मात्र, त्याची फार काही दखल प्रशासनाने घेतली नाही. त्यानंतर दि. 14 एप्रिल 2023 रोजी रात्री 10/00 वा. चे सुमारास शालु पठाडे हिने राहत्या घरी गळफास आत्महत्या केली.