जय श्रीराम पोष्टवरुन संगमनेरात तरुणावर गुन्हा दाखल, इन्स्टाग्रामचा गैरवापर, आरोपी अटक.!
सार्वभौम (संगमनेर) :-
मुस्लिम बांधवांचे मौलाना तथा धर्मगुरूंचा फोटोचा गैरवापर करुन काही अक्षेपहार्य विधान इन्स्टाग्रामवर एका तरुणाने आपलोड केले होते. हिंदु आणि मुस्लिम बांधव यांच्यात वाद निर्माण होईल अशा प्रकारची टिपण्णी केली. त्यामुळे, मुस्लिम बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या. त्यामुळे, मुजमील शकुर शेख (रा. लखमीपुरा, ता. संगमनेर) यांनी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी संबंधित इन्स्टाग्रामची चौकशी केली असता ते अकाऊन्ट ऋषिकेश शिंदे (रा. नविन नगर रोड, संगमनेर) याचे असल्याचे लक्षात आले. त्यानंतर काल दि. ९ एप्रिल २०२३ रोजी शेख यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा दाखल केला आहे. तर आरोपी अटक देखील केला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी. की, ऋषिकेश शिंदे याचे त्याच्या मोबाईलमध्ये इन्स्टाग्राम चालवितो. त्याने हिंदुत्वाशी संबंधित काही पोष्ट त्यावर शेअर केल्या होत्या. त्यात काही अक्षेपहार्य व्हिडिओ देखील टाकले होते. त्यातील काही व्हिडिओ हे एडिट केलेले असल्याचे लक्षात येते. त्यामुळे ते मुजमील शकुर शेख यांनी पाहिले. त्यात काही असे व्हिडिओ होते त्यातून मुस्लिम बांधवांच्या भावना दुखावतील अशा गोष्टी होत्या. याबाबत शेख यांनी चौकशी केली असता तो ऋषिकेश शिंदे असल्याचे लक्षात आले. त्यानंतर काही मुस्लिम बांधव एकत्र आले आणि त्यांनी संबंधित प्रकार पोलिसांना सांगितला.
दरम्यान, पोलिसांनी या प्रकाराची चौकशी केली असता काही आक्षेपहार्य गोष्टी लक्षात आल्या. तर, एक मुलगी गाडीहून जात असताना ती जय श्रीराम अशा प्रकारच्या घोषणा देते असे दाखविण्यात आले होते. तर काही गोष्टी मुस्लिम बांधवांच्या भावना दुखावतील अशा होत्या. त्यानंतर पोलिसांनी सायबर शाखेच्या माध्यतून पुढील कारवाई सुरू केली आहे. तर, संबंधित पुरावे देखील हाती घेतले आहेत. अशा घटना पुढे घडू नये किंवा शहरात या प्रकाराहून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी योग्यती कार्यवाही केली. संबंधित तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, अशा प्रकारे दोन समाजात तेढ निर्माण होईल अशा प्रकारचे कृत्य कोणी करु नये, किंवा सोशल मीडियात कोणाच्या भावना दुखावतील अशा प्रकारची पोष्ट करू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
गेल्या काही वर्षापासून राज्यात नव्हे तर देशात जाती धर्माचे राजकारण फारच रंगू लागले आहे. त्याचे पडसाद संगमनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर जाणवताना दिसत आहे. कधी लाव जिहाद म्हणून संगमनेर चर्चेत आले तर कधी हिंदु-मुस्लिम वादाने संगमनेर तालुका चर्चेत राहिला आहे. कोणी कितीही नाकारले तरी राजकारण्यांनी त्यांच्या सोईनुसार संगमनेरच्या नागरिकांना वापरुन घेण्याचे काम केले आहे. मात्र, दुर्दैवाने जातीसाठी असो वा मतांसाठी, राजकीय सुड ऊगविण्यासाठी असो वा एकमेकांची उणीधुणी काढण्यासाठी कायम जनतेचा वापर केला आहे. विशेषत: जातीय रंग फार वेळा दिसून आला आहे. किमान आता तरी नागरिकांनी माणूस धर्म म्हणून एकमेकांना समजून घेतले पाहिजे आणि सलोख्याने जगले पाहिजे.