बाबो.! तिघांनी ५१ गाड्या चोरल्या.! अकोले संगमनेरसह ३० ठिकाणी चोरी.! तुमची गाडी घेऊन जा.!
सार्वभौम (संगमनेर) :-
संगमनेर शहरासह जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी रोज एक ते दोन दुचाकी वाहनांची चोरी होत होती. मात्र, तत्कालिन अधिकारी केवळ गुन्हा दाखल करण्यात धन्यता मानत होते. त्यानंतर मात्र, नव्याने आलेले पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी वाहन चोरांच्या मुसक्या आवळल्या आहेत. संगमनेर येथील तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून तब्बल ५१ वाहनांची रिकव्हरी केली आहे. यात अक्षय सावन तामचिकर, सुरजित दिलीपसिंग तामचिकर (रा. भाटनगर, घुलेवाडी, ता. संगमनेर) ही दोघे आणि आणखी एक अल्पवयीन मुलाचा सामावेश असून त्यांनी आपल्या गुन्हाची कबुली दिली आहे. यांच्याकडून हस्तगत करण्यात आलेल्या गाड्या ह्या शिर्डी, आश्वी, घारगाव, बोटा, राजूर, अकोले, कोपरगाव, श्रीरामपूर, नेवासा, वावी, नांदुर शिंगोटे, नाशिक, देवळाली, एमआयडीसी सिन्नर अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून चोरी केल्या आहेत. तर, ज्यांच्या गाड्या चोरी गेल्या आहेत. त्यांची आवश्यक कागदपत्रे घेऊन यावेत आणि आपली गाडी कायदेशिर मार्गाने घेऊन जावी असे आवाहन पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली सविस्तर माहिती अशी की, संगमनेर शहरातून सर्वाधिक वाहने चोरी जाण्याचे गुन्हे दाखल होते. त्यामुळे, पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी पोलीस उपअधीक्षक संजय सातव सह पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांना यात लक्ष घालण्याचे आदेश केले होते. यात एक विशेष पथकाची नेमणुक केली. शहरातील कोणकोणत्या भागातून वाहन चोर्या होतात याची चौकशी केली. तसेच त्या दृष्टीने कधी पेट्रोलिंग तर कधी सीसीटीव्हीच्या माध्यमातून या चोरट्यांवर पाळत ठेवण्यात आली होती. जेव्हा या प्रकरणात एक विधीसंघर्ष बालक (अल्पवयीन) मिळून आला. तेव्हा त्याच्याकडे कसुन चौकशी करण्यात आली होती. तेव्हा त्याने पहिले नाव अक्षय सावन तामचिकर (घुलेवाडी) याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर देखील लक्ष ठेवले आणि त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यानंतर सुरजित दिलीपसिंग तामचिकर (रा. भाटनगर) याचे नाव पुढे आले.
दरम्यान, या तिघांकडे कसुन चौकशी केली असता त्यांनी काही गाड्यांची कबुली दिली. तर, या गाड्या त्यांनी शिर्डी, आश्वी, घारगाव, बोटा, राजूर, अकोले, कोपरगाव, श्रीरामपूर, नेवासा, वावी, नांदुर शिंगोटे, नाशिक, देवळाली, एमआयडीसी अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून आणि वेगवेगळ्या तालुका जिल्ह्यातून चोरल्याचे सांगितले. त्यात सिन्नर येथून २२, ओझर येथून ०२, सायखेडा येथून ०२, इगतपुरी येथून ०३, पुणे ग्रामीण येथून ०४, नाशिक शहरातून ०१, संभाजीनगर येथून ०१, मालेगाव येथून ०२, मध्यप्रदेश येथून ०१ अशा ५१ गाड्या पोलिसांनी संबंधित ठिकाणी जाऊन ताब्यात घेतल्या आहेत. यात दोघ आरोपींना अटक करण्यात आली असून एक अल्पवयीन मुलास त्याच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. तर, ज्या गाड्या ताब्यात आहेत. त्या मालकांशी पोलीस संपर्क करीत आहेत. ज्यांची गाडी चोरी गेली आहे. त्यांनी संगमनेर पोलिसांशी संपर्क साधावा तसेच नागरिकांनी आपल्या गाड्यांना लॉक लावून त्या सुरक्षित जागी पार्क करण्याचे आवाहन पोलीस अधिक्षक यांनी केले आहे.
यांच्या गाड्या सापडल्या आहेत.!
लक्ष्मण तुकाराम इगल (रा. मुंबई), शाहनवाज इकबाल शेख (रा. कुरणरोड, संगमनेर), मारुती ठका ढवळे (रा. सारोळे पठार, ता. संगमनेर), राजेंद्र महादु बुळकुंडे (रा. संगमनेर), इरफान युन्नुस मोमिन (रा. रेहमतनगर, संगमनेर), दत्तु गणपत चौधरी (रा. गुरवझाप, ता. अकोले), सोमनाथ शिवाजी गायकवाड (रा. वडगाव पान, ता. संगमनेर), आशिष ओमप्रकाश कलंतरी (रा. नवीन रोड, संगमनेर), नाना गोपाळ कासार (रा. मिठसागरे, ता. सिन्नर), हरदेवा मेलु (रा. राजस्थान), वसंत गोविंद मोकळ (रा. घुलेवाडी, ता. संगमनेर), संदिप नवनाथ पगारे (रा. घुलेवाडी, ता. संगमनेर), फिरोद राशिद मनियार (रा. कोतुळ, ता. अकोले).
भाऊसाहेब दत्तु शिंदे (रा. सुकेवाडी, ता. संगमनेर), रमेश पांडुरंग सातपुते (रा. घुलेवाडी), रामनाथ गोविंद नवले (रा. मालदाड), राजमहोंमद आबु शेख (रा. घुलेवाडी), महादेव पांडुरंग सानप (रा. घुलेवाडी), अजय संपत शेळके (रा. बोटा, ता. संगमनेर), गोरक्षनाथ रंगनाथ पाटोळे (रा. देवठाण, ता. अकोले), भाऊसाहेब निवृत्ती कोकणे (रा. झापवाडी, औरंगपूर, ता. अकोले), किरण किसन इंगळे (रा. श्रीरामपूर), संजय चांगदेव दहे (रा. दाऊच, कोपरगाव), आंबादास पुंजाबा फटांगरे (रा. कोकमठाण, कोपरगाव), सत्येंद्र कैलास राठोड (रा. शिर्डी), दिगंबर भाऊसाहेब पिसाळ (रा. हांडी निमगाव, ता. नेवासा), तन्वीर कुय्युम आत्तार (देवळाली, नाशिक), शोभा विष्णु जंत्रे (रा. नाशिक), संदिप बाबुराव कचरे (रा. पिंपळगाव गरुंडेश्वर, नाशिक), श्रद्धा विजय सुर्यवंशी (रा. कहांडळवाडी, सिन्नर), अशोक लक्ष्मण डुबे (रा. पेगमगिरी, ता. संगमनेर), विठोबा सुनिल नाथे (रा. गोंदेदुमाला, ता. इगतपुरी), किसन केरु शेळके (रा. नांदुर शिंगोटे, सिन्नर),.
संजय बन्सी भालेराव (रा. निपानी, निफाड), प्रदिप जयसिंग जाधव (रा. कल्याण ठाणे), एकनाथ रघुनाथ काकड (रा. देवठाण. ता. अकोले), देवराम लहुजी बिन्नर (रा. आडवाडी, ता. सिन्नर), पोपट गणपत बिन्नर (रा. पिंपळे, सिन्नर), सदाशिव शंकर रेवगडे (रा. झापवाडी, सिन्नर), सुर्यभान बस्तीराम वाघ (रा. भंडारदरा), शंकर जयराम रायकर (रा. धामनी, ता. इगतपुरी), अनिल श्रावन देवकर (रा. गुलवंच, ता. सिन्नर), पांडुरंग प्रल्हाद मातंगी (सिद्धार्थनगर, एकलहरे कॉलनी, नाशिक), दौलत रखमा आंधळे (रा. खंबाळे, ता. सिन्नर), रोशन उल्हास कदम (रा. विठ्ठलपार्वती निवास, पुणे) तर, यात अन्य सहा गाड्या अशा आहेत त्यात मालकांची नावे निश्चत नाहीत.