होय.! त्याने कॉलेजला येऊन मला त्रास दिला, दोघांवर गुन्हा दाखल.! लव जिहाद संशयाने दोघांना मारहाण अन गुन्हा दाखल.!


सार्वभौम (संगमनेर) :- 

मित्राच्या वर्गात असणार्‍या मुलीचा पाठलाग करुन तिची वारंवार छेड काढण्यात आली. तिचा मोबाईल नंबर उपलब्ध करून तिला वाईट बोलणे, शिविगाळ दमदाटी करणे असले प्रकार होत होते. हा प्रकार जेव्हा वडिलांना समजला तेव्हा स्वत: वडिलांनी एक प्लॅन आखला आणि छेडछाड करणार्‍या तरुणाला चांगलाच धडा शिकविला. मुलगी जेव्हा एका कॅफेत गेली. आरोपी यांनी तिला बळजबरीने गाडीवर टाकून तिचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा वडिलांनी त्याचा चांगलाच समाचार घेतला. ही घटना दि. २५ मार्च २०२३ रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास डी. लाईट कॅफे मालदाड रोड संगमनेर येथे घडली. याप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मफाज मतिनखान पठाण (रा. कोल्हेवाडी रोड, संगमनेर) याच्यासह त्याच्या मित्रावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पालकांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, पीडित मुलगी ही नांदुर शिंगोटे परिसरातून रोज इंजिनियरींग कॉलेजला संगमनेरला ये जा करते. तिच्या वर्गात असणार्‍या एका मुलाला घेण्यासाठी रोज मफाज मतिनखान पठाण हा येत होता. तेव्हा याने पीडित मुलीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मैत्री करण्याच्या बहाण्याने तिचा कायम पाटलाग करणे, तिचा रस्ता आडविणे, तिचा मोबाईल नंबर मागणे असे कृत्य करत होता. पीडित विद्यार्थीनी कॉलेजहून बस स्थानकावर आली की तो तिच्या मागेमागे येत असे. त्याने पीडित मुलीचा मोबाईल नंबर देखील उपलब्ध केला होता.

दरम्यान, हा सर्व प्रकार पीडित मुलीने दि. २४ मार्च २०२३ रोजी आपल्या वडिलांना सांगितला होता. त्यामुळे, वडिल म्हणले. की, काळजी करु नको, घाबरु नको मी स्वत: येऊन पाहतो असे म्हणून त्यांनी दि. २५ रोजी मुलीस कॉलेजला पाठविले. नेहमीप्रमाणे कॉलेज सुटल्यानंतर दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास पीडित मुलगी डी. लाईट कॅफे मालदाड रोड संगमनेर येथे गेली. तेव्हा तिचे पालक त्याच कॅफेसमोर थांबले होते. त्यावेळी पीडित मुलगी डी. लाईट कॅफेमध्ये बसलेली असताना तेथे दोन तरुण आले. त्यांनी मुलीशी बोलणे सुरू केले. कालांतराने दोघांनी तिला एका गाडीवर टाकून नेण्याचा बळजबरी प्रयत्न केला. तेव्हा मुलीचे पालक पुढे झाले आणि तिने पालकांना सांगितले. की, हाच तो मुलगा आहे. जो मला गेल्या तीन महिन्यांपासून त्रास देतो आहे. माझा पाठलाग करीत आहे. त्यानंतर पीडित मुलीला तेथे उपस्थित असणार्‍या तरुणांनी आरोपीच्या ताब्यातून सोडविले आणि त्यानंतर ती घरी गेली. आज तिच्या पालकांनी दोघांवर अपहरण आणि विनंयभंग अशा गंभीर कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत.

तर, याप्रकरणी मफाज पठाण (रा. कोल्हेवाडी रोड, संगमनेर) यांने देखील फिर्याद दाखल केली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. की, मी नेटसेटची तयारी करीत असून माझा मित्र मसीहुर याच्या क्लासमध्ये असणार्‍या एका विद्यार्थीनिशी माझी मैत्री झाली होती. दि. २५ मार्च २०२३ रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास आम्ही संबंधित मुलीसोबत डी. लाईट कॅफे मालदाड रोड संगमनेर येथे बसले होते. तेव्हा कॅफेत काम करणारा रोशन गोर्डे याने मला फोन करुन सांगितले. की, कॅफेच्या बाहेर काही मुले जमा झाले आहेत. त्यामुळे, तुम्ही तेथून निघुन जा. दरम्यान, आम्ही बाहेर आलो तेव्हा तेथे ५ ते ६ तरुण उभे होते. त्यांनी आमचे नाव गाव विचारले. त्यानंतर तेथे जमा झालेल्या तरुणांनी आम्हाला दुचाकीवर बसविले आणि थेट विठ्ठलकडे येथील डोंगरावर नेले. 

तेथे मारहाण केल्यानंतर ते म्हणाले. की, तुम्ही लोक हिंदु मुलींना घेऊन कॅफेत बसता काय? त्यांच्याशी मैत्री करता काय? असे म्हणून त्यांनी बेदम मारहाण केली. तेव्हा तेथे आणखी १० ते १५ जण जमा झाले. त्यांनी देखील हिंदु मुलींना कॅफेत घेऊन बसता कशाला असे म्हणून बेल्ट, काठी आणि लोखंडी रॉडने मारहाण केली. तर, तेथे उपस्थित असणार्‍या एका व्यक्तीने माझा मोबाईल बळजबरीने काढून घेतला. तर हा जो काही प्रकार घडला आहे. तो कोणाला सांगितला तर तुला जीवंत सोडणार नाही. असे म्हणून शिविगाळ दमदाटी केली. त्यानंतर मी व माझ्या मित्राला पुन्हा सायंकाळी ६:३० वाजण्याच्या सुमारास पुन्हा मालदाड रोडला आणून सोडले. त्यानंतर उपचारासाठी मी एका खाजगी रुग्णालयात दाखल झालो. आज पोलीस जबाबानुसार संगमनेर शहर पोलीस ठाण्यात १५ जणांवर अपहरण आणि दरोडा यांसह गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी करण संपत गलांडे (वय 21, रा.अभंगमळा), सोहम शेखर नेवासकर (वय 22, रा. गणेशनगर), ओंकार राजेंद्र जोर्वेकर (वय 19, रा.अकोले नाका), विश्‍वास सीताराम मोहरीकर (वय 21, रा.नेहरु चौक), संकेत बाबासाहेब सोनवणे (वय 21), अजीत अंकुश भरते (वय 24, दोघेही रा.कुंभार आळा), निशांत नंदू अरगडे (वय 21, रा.अरगडे गल्ली) व विक्रम खडकसिंग लोहार (वय 22, रा.घुलेवाडी) या आठ जणांना अटक केली आहे. तर, यात आणखी पसार असलेल्या आरोपींचा शोध सुरु आहे.