पती कामावर गेला अन हा आत घुसला, तू मला फार आवडते म्हणत स्वयंपाक घरात महिलेला घट्ट मिठी मारली, गुन्हा दाखल, आरोपी अटक.!

 

सार्वभौम (संगमनेर) :- 

                     संगमनेर तालुक्यातील पठारभागावरील कार्जुले पठार परिसरात एका 28 वर्षीय तरुणाने महिलेशी गैरवर्तन केल्याची धक्कादायक घटना सोमवार दि. 13 मार्च रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास घडली. 31 वर्षीय महिला ही स्वयंपाक करीत असताना हा 28 वर्षीय तरुण पिडीत महिलेच्या घरात गेला आणि त्याने महिलेला मिठी मारली. जेव्हा त्याचा गलिच्छ हेतु समोर आला तेव्हा महिलेने एकच आरडा ओरडा केला. ही आरडाओरड झाल्याने 28 वर्षीय तरुणाने घरातुन धुम ठोकली. तु जर कोणाला सांगितले तर तुझ्या मुलीला व तुला जिवंत सोडणार नाही. अशी धमकी देऊन तो बहाद्दर पसार झाला. मात्र, घाबरलेल्या या महिलेने मोठ्या धाडसाने घडला प्रकार आपल्या नातेवाईकांना सांगितला आणि 31 वर्षीय पिडीत महिलेने थेट पोलीस ठाणे गाठले. पिडीत महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल होताच आरोपी तुषार विजय पानसरे (रा. कार्जुले पठार, ता. संगमनेर) याला अटक करून आज न्यायालयापुढे हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याचा पुढील तपास ए.आर. गांधले करत आहे.

          याबाबत सविस्तर माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील कार्जुले पठार परिसरात एक छोटे कुटुंब आहे. 31 वर्षीय पिडीत महिलेचे पती गुजरातला कामानिमित्त राहतात. त्यांना लहान मुलगी आहे. 31 वर्षीय पिडीत महिला घरी एकटीच असल्याने घरी शेतीवर उदरनिर्वाह करते. 31वर्षीय महिलेचे पती कामानिमित्त गुजरातला असल्याने ते अधुन-मधुन घरी येत जात असतात. 15 दिवसांपूर्वीच 31 वर्षीय पिडीत महिलेचे पती घरी येऊन पुन्हा गुजरातला कामानिमित्त गेले. दि. 13 मार्च 2023 रोजी पिडीत महिला घरी एकटीच असताना दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास 31 वर्षीय पिडीत महिलेच्या घरी आरोपी तुषार पानसरे हा आला व पिडीत महिलेला म्हणाला की, मला पाणी प्यायचे आहे मला पाणी द्या. त्यानंतर पिडीत महिलेने आरोपी तुषार पानसरे याला पाणी पिण्यास दिले. त्यानंतर आरोपी तुषार पानसरे याने पिडीत महिलेला विचारले की तुमचा पती कुठे आहे. त्यावेळी पिडीत महिला म्हणाली की, ते कामानिमित्त बाहेर आहे. असे म्हणल्यावर आरोपी तुषार पानसरे हा तेथुन निघुन गेला. पण, त्याची वाईट नजर 31 वर्षीय पिडीत महिलेवर पडली होती.

            दरम्यान, 31 वर्षीय पिडीत महिला रात्री आठ वाजता घरात स्वयंपाक करत होती. तर, त्याच वेळी आरोपी तुषार पानसरे हा गुपचुप घरात घुसला. पिडीत महिला कामात व्यस्त असताना आरोपी तुषार पानसरे याने लगट करण्याचा प्रयत्न केला. तु मला खुप आवडते असे म्हणुन त्याने अचानक पिडीत महिलेला मिठी मारली. अचानक झालेल्या प्रकरामुळे पिडीत महिला घाबरुन गेली. त्यामुळे, पिडीत महिलेने आरडाओरड सुरू केला. मात्र, आरोपीला घाम फुटला आणि त्याने तु जर कोणाला सांगितले तर तुझ्या मुलीला व तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. मात्र, पिडीत महिलेला चुकीच्या उद्देशाने लावलेला हात लगेच लक्षात आला. आणि पिडीत महिलेने आरोपी तुषार पानसरे याला विरोध केला. लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य संबंधीत महिलेला अनपेक्षित होते.  

आरडाओरड केल्यानंतर शेजारीच असलेले नातेवाईक पळत घरी आले पण, त्यांना देखील धक्काबुक्की करून आरोपी तुषार पानसरे पळुन गेला. पिडीत महिलेला राग अनावर झाला. त्यांनी 28 वर्षीय तरुण तुषार पानसरे याला धडा शिकवायचा निर्णय घेतला. पिडीत महिलेने थेट घारगाव पोलीस ठाणे गाठले आणि तेथे घडलेला प्रकार कथन केला. त्यानंतर पोलिसांनी फिर्यादीनुसार विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. आरोपी तुषार पानसरे याला पोलिसांनी तात्काळ बेड्या ठोकल्या याचा पुढील तपास ए.आर. गांधले करत आहे.