अल्पवयीन मुलगी बाळांत झाली, बाळ पोटातच मयत झाले. चुलत भावाकडून बहिनिवर अत्याचार, आरोपीस ठेकल्या बेड्या.!
सार्वभौम (संगमनेर) :-
संगमनेर तालुक्यातील मनोली परिसरात नात्याला काळीमा फासणारी खळबळजनक घटना समोर आली आहे. चक्क 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 20 वर्षाच्या तरुणाने वेळोवेळी संभोग केला. त्यातुन अल्पवयीन मुलगी साडेसात महीन्यांची गरोदर असल्याचे समजले तेव्हा हे सर्व बिंग फुटले. त्यानंतर घडलेला प्रकार समोर आला. ही घटना मनोली परिसरातील डोंगर परिसरात ऑक्टोबर 2022 च्या दरम्यान घडली. याप्रकरणी पिडीत मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार 20 वर्षीय पिडीत मुलीच्या चुलत भावावर संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल सानप करत आहे.
खरंतर, संगमनेर शहरासह तालुक्यात महिला अत्याचारासह शाळेतील अल्पवयीन मुलींवर देखील अत्याचार वाढत आहे. यामध्ये पोक्सो सारखे गंभीर गुन्हे वारंवार घडत आहेत. त्यामुळे, इथे शाळा, कॉलेज, वाडी-वस्तीवर सामाजिक कार्यकर्त्यांनी, लोकप्रतिनिधीनी, महिला आयोगाने जन जागृती करणे गरजेचे आहे. त्यामुळे, संगमनेर तालुका जितका विकसित होत चालेला आहे. तितके येथे अल्पवयीन मुली-महिला यांची असुरक्षितता वाढत आहे का? असा प्रश्न संगमनेरातील सुज्ञ नागरिकांनी उपस्थित केला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मनोली परिसरात एक छोटे कुटुंब आहे. त्यांना तीन मुली व एक मुलगा असे छोटे कुटुंब आहे. त्यांचा मोलमजुरीवर उदरनिर्वाह चालतो. पिडीत मुलगी ही कोरोनाकाळात लॉकडाऊन पासुन शाळेत जात नसुन ती घरीच होती. पिडीत मुलगी शाळेत जात नसल्याने मंदिर परिसरात खेळण्यासाठी व दर्शनासाठी जात असे. पिडीत मुलीचे आई वडील मोल मजुरूरीसाठी जात होते. पीडित मुलीच्या आजीचा खुबा मोडलेला असल्याने त्या घरीच राहते. त्यामुळे या पिडीत मुलगीकडे फारसे लक्ष देण्यासाठी कोणी नाही. दि.8 मार्च 2023 रोजी पिडीत मुलीचे आई वडील हे गावातील परिसरात गहु सोंगण्यासाठी गेले होते. सायंकाळी सहा-सातच्या सुमारास गहु सोंगुण घरी आले. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास जेवण केले. त्यावेळी पिडीत मुलीच्या पोटात चमक निघत आहे असे आई वडिलांना सांगितले. त्यानंतर पिडीत मुलीच्या आई वडिलांनी पिडीत मुलीला आश्वी परिसरातील खाजगी हॉस्पिटलमध्ये नेले परंतु तो दवाखाना बंद असल्याने रात्री उशिरा लोणी येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये गेले.
दरम्यान, पिडीत मुलीला लोणी येथे दाखल करून घेतले. पिडीत मुलीची डॉक्टरांनी तपासणी केली असता ती साडेसात महिन्यांची गरोदर असल्याचे समजले. त्यानंतर पिडीत मुलीचे पोट अधिक दुखत असल्याने तिला पुढील उपचारासाठी ऍडमिट करून घेतले. मात्र, पिडीत मुलीची पहाटे प्रसुती झाली असता पोटातील बाळ मयत झाले आहे. हा सर्वघटनाक्रम पिडीत मुलीच्या आईने आपल्या डोळ्यासमोर पाहताच तिचा पारा सरकला. त्यांना राग अनावर झाला. त्यांची तळपायाची आग मस्तकापर्यंत गेली. त्यांनी नातेवाईक आरोपीला पाठीशी न घालता थेट पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक ढुमणे यांनी तात्काळ या घटनेची दखल घेतली. तालुका पोलिसांनी तात्काळ या 20 वर्षीय आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीला आज शनिवार दि.11 मार्च रोजी दुपारी अडीच वाजता कोर्टासमोर हजर केले असता कोर्टाने आरोपीला पाच दिवसांची पोलीस कस्टडी सुनावली आहे याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल सानप करत आहे.