६ वर्षे प्रेम केलं अन तिचं लग्न दुसरीकडे ठरलं.! पिल्लु काय करतेस मेसेज त्याने वाचला, प्रियकरावर गुन्हा ठोकला.!
सार्वभौम (संगमनेर) :-
इयत्ता १२ वीला असताना कॉलेजमध्ये मैत्री झाली, त्यानंतर फोनवर संपर्क वाढला आणि गोष्ट थेट लग्नापर्यंत गेली. मात्र, लग्न दुसर्याशीच ठरले आणि मोठा राडा झाला. प्रियकराने नवीन होणार्या नवरदेवाशी संपर्क केला आणि सगळी गोष्टी खुल्लमखुल्ला सांगून टाकल्या. इतकच काय.! तर, त्याला काही फोटो देखक्षल व्हाटसऍपवर सेंड केले. त्यामुळे, मुलीने रागाच्या भरात थेट पोलीस ठाणे गाठले आणि आपल्या जुन्या मित्रावर गुन्हा ठोकला. हा रंजक प्रकार हा संगमनेर तालुक्यातील आंबी खालसा परिसरात २०१७ ते २०२३ या दरम्यान घडला. याप्रकरणी दिपक बाळासाहेब औटी (रा. म्हसवंडी, ता. संगमनेर) याच्यावर घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, एक तरुणी बेल्हे परिसरात असणार्या एका कॉलेजात शिक्षण घेत होती. इयत्ता १२ वीत शिक्षण घेत असताना तिची ओळख आरोपी दिपक औटी याच्यासोबत झाली होती. तेव्हापासून ते मैत्री म्हणून एकमेकांशी फोनवर बोलत होते. दोघांमध्ये चर्चा सुरू असताना औटी याचे पीडित मुलीवर प्रेम जडले होते. त्यामुळे तो म्हणत होता. की, मी तुझ्यासोबत लग्न करणार आहे. मात्र, मुलगी त्यास नकार देत होती. लग्नाचा विषय निघाल्यानंतर बोलणे टाळत होती. त्यामुळे औटी तिला म्हणाला. की, जोवर तुझे लग्न होत नाही. तोवर तू माझ्याशी फोनवर बोलत जा. असा छोटासा शब्दकरार त्यांच्यात झाल्यामुळे, २०१७ ते २०२३ असे सहा वर्षे ते एकमेकांच्या संपर्कत होते.
दरम्यान, दि. ६ जानेवारी २०२३ रोजी पीडित मुलीचे लग्न एका धुमाळ नावाच्या मुलाशी जमले. तेव्हा तिने औटी यास सांगितले. की, आता माझे लग्न जमले आहे. त्यामुळे, तू मला फोन करु नको, मेसेज करु नको. ठरल्याप्रमाणे आपण वागायचे आहे. मात्र, तरी देखील औटी याला रहावले नाही. तो फोन करीत असे, जेवली का?, ऑनलाईन ये, काय करतेय पिल्लू असे म्हणून व्हाटसऍपवर मेसेज करत असे. मात्र, पीडितेकडून कोणताही रिप्लाय जात नव्हता. त्यामुळे, तो फोन करीत असे तर कधी ऑनलाईन फोन करीत असे. त्यामुळे, त्याच्या त्रासाला कंटाळून तिने त्याचा मोबाईल ब्लॅक करुन टाकला. आता पुन्हा याचा फोन आणि मेसेज येणार नाही या भावनेतून तिने याबाबत कोणाला फारसे सांगितले नाही.
दरम्यान, नंबर ब्लॅक केल्यामुळे औटी याचे मार्ग खुंटले आणि त्याने थेट ज्या मुलाशी लग्न ठरले होते. त्याचाच नंबर उपलब्ध केला आणि त्याच्याशी तो बोलु लागला. दि. ८ फेब्रुवारी २०२३ रोजी त्याने पीडितेच्या होणार्या पतीस सांगितले. की, तु तिच्याशी लग्न करु नको. मला तिच्याशी लग्न करायचे आहे. आमचे पाच वर्षापासून मैत्रीचे संबंध आहे. जर लग्न केलं तर तुला पाहुन घेतो. असे म्हटल्यानंतर देखील संबंधित व्यक्तीने औटी याच्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, औटी याने दुसर्या मोबाइलहून संपर्क करुन त्याला काही फोटो हे व्हाटसऍप माध्यामातून सेंड केले. त्यानंतर औटी यास समजून सांगण्यासाठी त्याच्या घरच्यांशी संपर्क केला. त्यांनी विश्वास दिला. की, यानंतर त्याचे फोन, मेसेज, किंवा कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. त्यानंतर प्रश्न मिटेल असे वाटत होते. मात्र, तसे झाले नाही. शेवटी पीडितेने पोलीस ठाणे गाठले आणि दिपक बाळासाहेब औटी (रा. म्हसवंडी, ता. संगमनेर) याच्यावर घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.