छी.! घाणेरडा सरपंच म्हणाला, तिला जयंतीत नागडं नाचवा, रेकॉर्डींग झाली व्हायरल, शिवसैनिक आक्रमक, सरपंचावर गुन्हा दाखल.! राजिनाम्याची मागणी.!
सार्वभौम (अकोले) :-
सन २०१७ मध्ये नगर शहरात श्रीपाद छिंदम या भाजपाच्या नगरसेवकाने राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत अपशब्द वापरले आणि संपुर्ण राज्यात निषेध नोंदविला गेला. त्यानंतर असे प्रकार वारंवार झाले. मात्र, त्यास कोणी क्षमा केली नाही. अगदी तसाच काहीसा प्रकार अकोले तालुक्यातील लिंगदेव येथे घडला आहे. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करायची होती. तेव्हा डिजे लावण्याहून वाद झाले होते. सोशल मीडियावरील छत्रपती युवा प्रतिष्ठाण या गृपवर चर्चा सुरु झाली आणि सरपंच महोदय भलतेच आक्रमक झाले. ज्यांनी- ज्यांनी विरोध केला त्यांना आश्लिल भाषेत शिविगाळ करुन महिलांना नग्न करुन नाचव अशा प्रकारची भाषा वापरली. ही लज्जास्पद घटना दि. 20 फेब्रुवारी 2023 रोजी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी अमित राणू धोमल (रा. लिंगदेव, ता. अकोले, जि. अ.नगर) याच्यावर अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
... याबाबत सविस्तर माहिती अशी. की, महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती लिंगदेव येथे साजरी केली जाणार होणार होती. त्यासाठी गावात डिजे देखील वाजविला जाणार होता. यापुर्वी डिजेहून त्याच गावात किरकोळ वाद झाला होता. त्यामुळे, एका व्यक्तींने सरपंच यांना विचारले. की, कोणता डिजे गावात वाजविला जाणार आहे.? अशा प्रकारची चर्चा छत्रपती युवा प्रतिष्ठाण या गृपवर सुरु होती. यावर अनेकजण मतमतांतरे सुरु होती. तेव्हा संदिप फापाळे यांनी मत मांडले. की, डिजे वाजवून ध्वनी प्रदुषण करण्यापेक्षा पारंपारीक वाद्य वाजवून जयंती साजरी करा. त्याचा राग सरपंच महोदय यांना आला. ते तेथे काही बोलले नाही. मात्र, त्यांनी गावातील देविदास या व्यक्तीला फोन करुन अतिशय गलिच्छ भाषेत शिविगाळ सुरु केली. मी गावात काही करेल, पण ज्याने मला विरोध केला त्याला मी जयंतीनंतर पाहुण घेईल असे म्हणून अप्रत्यक्ष धमकाविण्याचा प्रयत्न केला. मात्र, ज्या व्यक्तीजवळ सरपंच बोलला. त्या व्यक्तीला त्यांचे असले बोलणे पटले नाही. एव्हाना ते कोणालाच पटू शकत नाही. त्यामुळे, त्यांने संबंधित व्यक्तीला ही माहिती कळविली.
दरम्यान, सरपंच धोमल म्हणाला. की, आता यावर चर्चा करायची नाही. डिजे कोणाचाही असला तरी बोलायचं नाही. त्या गोप्याच्या पोराला म्हणावं तुझ्याई तिकडून घाल, तेथे महिला नग्न नाचव, यापेक्षा घाणेरडे बोलुन सरपंच आया बहिनिहून शिविगाळ करत अगदी खालच्या पातळीवर गेले. तर, तुझा देखील पोपट करतो असे म्हणून धमकी दिली. कारण यापुर्वी पोपट यास मारहाण करण्यात आली होती. तसे यांना देखील मारहाण करणार करु असा अप्रत्यक्ष शब्दप्रयोग केला. हे सर्व होत असताना देविदास हे सरपंच महोदय यांना अगदी शांतपणे समजून सांगत होते. मात्र, सरपंचांचा पारा वरचड झाला होता. महोदय पुढे म्हणाले. की, त्याला आता माझा कचक्या शिवजयंतीत दाखवतो, असे म्हणून अगदी गलिच्छ शिविगाळ केली. समजून सांगून देखील ते ऐकण्यास तयार नव्हते. त्यानंतर फोन कट करुन टाकला.
दरम्यान, कोणत्याही प्रकारचा वाद नको म्हणून संदिप फापाळे हे शांत बसले. मात्र, त्यांना त्या शिव्या आणि सरपंच यांची व्हायरल झालेली रेकॉर्डींग अस्वस्थ करत होती. जयंती झाल्यानंतर त्यांनी घडलेला प्रकार आपल्या पत्नीस सांगितला. त्यानंतर, पीडित महिलेने थेट काही समाजसेवक ते महिला आयोग यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर, हा वाद अकोले पोलीस ठाण्यात आला आणि महिलेच्या फिर्यादीनुसार कलम 507 आणि 509 प्रमाणे सरपंच अमित धोमल याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, एखाद्या जबाबदार व्यक्तीने, जो गावाचा प्रथम नागरिक आहे. ज्याच्यावर गावच्या विकासची जबाबदारी आहे. अशा व्यक्तीने असे आया बहिनिंच्या बाबत बोलावे का? तो ही एक शिवसैनिक असून जयंतीत अशा प्रकारचे वक्तव्य हे अशोभनिय आहे. त्यामुळे, प्रशासनाने त्याचा राजिनामा घ्यावा आणि गावकऱ्यांनी देखील यात लक्षा घालून त्याची पदाहून हाकालपट्टी करावी अशी मागणी आता जोर धरु लगली आहे. तर, राज्यातील काही संघटना देखील या व्हायरल रेकॉर्डींग बाबत माहिती घेत असून सैनिक आक्रमक भुमिका घेताना दिसत आहेत.