कारखान्याभोवती आतृप्त आत्म्यांचा पहारा, आडकाठी नेमकी कोणाची, खरंच अगस्ति जप्त होणार का, पेमेन्ट का थकलय.!
सार्वभौम (अकोले) :-
अगस्ति सहकारी साखर कारखान्यात २०२२ साली परिवर्तन काय झाले आणि अनेकांची पोटदुखी झाली. उट सुट कारखान्यात आडवा खुटा घालयाचा, दिवस रात्र कधी चेअरमन तर कधी संचालक मंडळाला वेठीस धरायचे. अर्थात कारखाना ही अनेकांचीखुटखुटी मुळीच नाही. पण, गायकर साहेबांना टार्गेट केलं म्हणजे आपण फेमस होतो. त्यांचा कोठे रस्ता आडवायचा, त्यांना कोठे सोशल मीडियात बदनाम करायचे, कोणाचे खादाड धंदे बंद केले की त्यांनी बोंबा ठोकायच्या. मग फक्त वैयक्तीक बोलता येत नाही म्हणून प्रश्न कारखान्यावर नेवून ठेवायचा. शेतकर्यांचे पेमेंट ढाल करायची आणि व्यक्तीद्वेशाने वार करायचे. असली घानेरडी निती आजकाल अवलंबली जात आहे. वास्तवत: मायबाप शेतकर्याने यापुर्वी देखील पाच वेळा अशा प्रकारे महिनाभर पेमेंन्ट उशिरा घेतले आहे. तेव्हा शेतकरी राजाच्या नावावर राजकारण करणार्यांच्या दातखिळी बसल्या होत्या का? विशेष म्हणजे कारखान्याचा आत्मा म्हणजे कर्मचारी आहेत. त्यांचे यापुर्वी ३४ महिन्यांचे पेमेंन्ट थकलेले होते. तरी देखील प्रचंड सहकार्य त्यांनी केले आहे. तर, आजवर प्रति महिना पेमेंन्ट होते. मात्र, गेल्या काही दिवसांपुर्वी थकीत असलेले चार महिन्यांचे पेमेन्ट बाकी आहे. ते कोणाच्या काळातील आहे याचा अभ्यास पोळी भाजणार्यांनी केला पाहिजे. यातील आणखी विशेष बाब म्हणजे जेव्हा कारखान्याची निवडणुक लागली होती. तेव्हा दोन वेळा आदरणीय पिचड साहेबांच्या नावे कारखाना जप्तीची इन्टीमेशन नोटीस आली होती. मात्र, त्यावर कोणी काही बोलले नाही. मात्र, आता काही नतद्रष्ट सो कॉल्ड स्वयंघोषीत कार्यकर्ते या नोटीसा सोशल मीडियावर फिरवून आफवा पसरवू लागले आहेत. मात्र, तुम्हा शेतकरी बांधवांना माहिती म्हणून सांगावे वाटते. की, कारखान्याकडे ५० कोटी रुपयांची साखर सध्या उपलब्ध आहे. काही व्यक्तींच्या कुरघोड्या सुरु आहेत. म्हणून.! पण, येणार्या पाच दिवसात सगळे प्रश्न सुटतील. काही झालं तरी जे चित्र दाखविले जात आहे. ते वास्तव नसून कारखाना कधीच बंद पडणार नाही. अशी शाश्वती सिताराम पा. गायकर यांनी दिली आहे.
नोटीसची भानगड काय आहे?
अगस्ति कारखान्यात आदरणीय पिचड साहेब २०१८ मध्ये चेअरमन होते. तेव्हा युनियन बँकेकडून १५ कोटी रुपये कर्ज घेतले होते. त्याचे हाप्ते म्हणून साडेतीन कोटी रुपये भरले देखील होते. मात्र, नंतर कोविडचा काळ आला आणि कारखानाच काय.! देश आडचणीत आला होता. त्यानंतर २०२२ मध्ये अगस्ति कारखान्याच्या निवडणुका लागल्या तेव्हा दोन वेळा पिचड साहेबांच्या नावे शो कॉझ नेटीसा आल्या होत्या. मात्र, सगळेच निवडणुकीत दंग होते. २०२३ मध्ये कारखाना चालु होईपर्यंत २०१८ ते २३ पर्यंत हे कर्ज १८ कोटी ८३ लाख झाले. त्यानंतर बँकेने प्रतिकात्मक ताबा म्हणून नोटीस पाठविली आहे. हे जुने दुखणे उकरून विद्यमान बॅडीवर चिखलफेक सुरू आहे. मात्र, तरी देखील याचे बँकेकडून हाप्ते पाडून घेतले जाणार आहेत. कारखाना शंभर टक्के अडचणीत आहेत. मात्र, तरी देखील तो बंद पडेल असे म्हणून संचालक मंडळाचे खच्चीकरण करणे, अविश्वास दाखविणे अशा प्रकारचे कृत्य काही व्यक्तीद्वेशी लोकांकडून केले जात आहे. तर, चौकशा, बदनामी, कोर्ट-कचेर्या याचे हेलपाटे लावून कारखान्याकडे चेअरमनचे दुर्लक्ष कसे होईल आणि कारखाना अडचणीत कसा येईल यासाठी अनेकांचे कसोशीने प्रयत्न सुरु आहे. मात्र, तरी देखील यावर मात करुन मी कारखाना बंद पडू देणार नाही. शेतकर्यांनी टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असे वक्तव्य गायकर यांनी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी कारखान्यावर केले.
शेतकरी-कामगार कारखान्याच्या पाठीशी.!
मायबाप शेतकर्यांनी कोणत्याही कारखान्यात चौकशी करावी. शेतकर्यांचे पंधरा दिवसांचे पेमेंन्ट कारखान्याकडे शक्यतो ठेवल्याचे पहायला मिळते. तर, डिसेंबर अखेर आणि जानेवारी असे महिनाभराचे पेमेन्ट कारखान्याकडे पेंडींग आहे. खरंतर, कारखान्याच्या इतिहासात शेतकरी राजावर असे पाच वेळा संकट ओढवले आहे. मात्र, त्याला शेतकरी राजाने संकट नव्हे तर सहकार्य करुन कारखाना टिकाला पाहिजे या भावनेतून ब्र शब्द सुद्धा काढला नाही. मात्र, शेतकर्यांच्या नावाखाली काही स्वयंघोषित नेते आंदोलन करु, मोर्चे काढू, उपोषणे करु असे म्हणून वातावरण दुषीत करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, संचालक जसे स्वत:च्या मालमत्तेवर कर्ज काढून कारखान्याला सहकार्य करतात. असे एकदा तरी कोणी शेतकरी पुत्र गेलाय का? सहकार्य करायला? सोशल मीडियावर कागाळी करणारे सो कॉल्ड चंगू-मंगू चार आण्याची कोंबडी घेऊन बारा आण्याचा मसाला मागत सुटले आहे. मात्र, खरा शेतकरी अद्याप सहकार्याच्या भुमिकेत आहे. तर, कामगारांचे खरोखर आभार मानले पाहिजे. त्यांनी कधी असहकार न पुकारता व्यक्तीद्वेषाने पछाडलेल्या चारदोन डोक्यांच्या नादाला न लागता दिवसरात्र सहकार्य सुरूच ठेवले आहे.
नेमकी झालय काय?
जिल्हा बँक आणि त्यातून होणारी मदत यावर कारखाना चालु आहे. मात्र, राष्ट्रवादीकडून असलेले जिल्हा बँकेचे चेअरमन शेळके साहेब हे सध्या आजारी असल्यामुळे कॉंग्रेसच्या व्हा. चेअरमनकडे बँकेचा कारभार आहे. जेव्हा जिल्हा बँक सिताराम पाटील गायकर यांच्या ताब्यात होती. तेव्हा त्यांनी कठीण काळात प्रत्येक कारखान्यांचा सहकार्य केले. मात्र, सख्खा शेजारी पक्का वैरी झाल्यासारखे वाटू लागले आहे. कारखान्याकडे १ लाख ६० हजार रुपयांपेक्षा जास्त साखर शिल्लक आहे. म्हणजे सरासरी ५० कोटी रुपयांची मालमत्ता म्हणावी लागेल. मात्र, तरी देखील केवळ आडमुठी भुमिका म्हणा किंवा अशा पद्धतीने कर्ज देण्याचे धाडस केले जात नाही. यापुर्वी पोती घेऊन अशा प्रकारची मदत कित्तेक वेळा केली आहे. मात्र, अगस्तिला मदत होऊ नये, कारखाना अडचणीत यावा, त्यास उचल मिळणार नाही यासाठी विशेष काही व्यक्तींचे प्रयत्न सुरू आहे. तरी देखील यावर राज्याचे विरोधीपक्षनेते अजित दादा यांनी लक्ष घातले असून त्यावर देखील तोडगा निघेल आणि हा प्रश्न मार्गी लागेल.
आतृप्त आत्मे कारखान्यात फिरतात..!!
अगस्ति कारखाना चालु झाल्यापासून अगदी बोटावर मोजता येतील इतक्याच दिवस त्याला गृहण नव्हते. मात्र, नंतरच्या काळात तो चालतो की नाही अशी वल्गना होऊ लागली होती. परंतु, २००२ पर्यंत तो सुखरुप चालला आणि नंतर स्वत:चे राजकीय अस्थित्व सिद्ध करण्यासाठी तो बंद देखील पाडला. त्यानंतर देखील आज उद्या करुन अगदी २०२२ ची निवडणुक होईपर्यंत कडेलोट असे शब्दप्रयोग होत होते. परंतु, आजही कारखाना उभा आणि चालु आहे. आता हे अपप्रचार आणि आव्वाच्या सव्वा चर्चा करतय कोण? तर, ज्यांना संचालक होता आले नाही, ज्यांना टेंडर मिळाले नाही, ज्यांना गायकरांनी जवळ उभे केले नाही, ज्यांना नोकर्या दिल्या नाही. ज्यांनी ब्लॅकमेल करुन देखील त्यांनी थारा दिला नाही अशा प्रकारचे सो कॉल्ड आतृप्त आत्मे आता कारखान्यात फिरु लागले आहेत. व्यक्तीद्वेशाने कारखान्याची बदनामी करु लागले आहेत. वाट्टेल त्या पद्धतीने बदनामी आणि ब्लॅकमेल करु पहात आहेत. का? तर, त्यांचे नाव घेऊन बोलले की माणूस मोठा होतो आणि प्रसिद्ध मिळते. मात्र, ज्यांच्या तोतया अफवेने अगस्ति महाराजांच्या नावे उभा झालेला कारखान कितीही संघर्ष करण्याचे बळ देईल. मात्र, तो बंद पडणार नाही. इतकी शेतकर्यांची श्रद्धा आहे.