दारु पिवून शिक्षकाचा शाळेत घानेरडा प्रकार, शिकवायचे सोडून स्वयंपाक घरात घुसला.! सरपंचबाईंच्या पतीची धडपड अपयशी.! गुन्हा दाखल
सार्वभौम (अकोले) :-
अकोले तालुक्यातील राजूर परिसरात असणार्या जिल्हा परिषदेच्या शाळेत एक शिक्षक दारु ढोसून शाळेत आला होता. एकीकडे वर्ग सुरू असताना दुसरीकडे याच्या अंगात वेगळीच नशा संचारली होती. त्याने शाळेत स्वयंपाकासाठी नव्याने आलेल्या महिलेकडे पाहिले आणि त्याची नियत फिरली. भर दिवसा शिक्षकाने शाळेच्या स्वयंपाक घरात प्रवेश केला आणि महिलेस कडकडून मिठी मारली. तर तिला लज्जा उत्पन्न होईल असे घानेरडे कृत्य केले. ही घटना दि. १८ जानेवारी २०२३ रोजी दुपारी १:१५ वाजण्याच्या सुमारास घडली. मात्र, असा अन्याय झाल्यानंतर जेव्हा पीडित महिला पोलीस ठाण्याकडे निघाली. तेव्हा एका महिला सरपंचाच्या पतीने शिक्षक महोदयांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला. तर, गुन्हा दाखल होणार नाही. यासाठी आटापिटा केला, परंतु हरिश्चंद्राच्या नगरीत असल्या घानेरड्या कृत्यांना अभय घालणार्या व्यक्तीला सामुहिक चोप देण्याची मागणी आता राजुरकर करीत आहेत. तरी देखील जे माझ्याबाबत झाले ते उद्या विद्यार्थ्यांच्या किंवा अन्य कोणाच्या बाबत होऊ नये. म्हणून संबंधित पीडित महिलेने थेट पोलीस ठाणे गाठले आणि मोठ्या धैर्याने पुढे येऊन गुन्हा दाखल केला आहे. ज्ञानदेव उगले (रा. पाडाळणे, ता. अकोले. जि. अ.नगर) असे आरोपीचे नाव आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, राजूर परिसरात असणार्या जिल्हा परिषदेच्या एका शाळेत जी मुलांना स्वयंपाक तयार करणारी महिला होती. त्या महिलेच्या घरी वर्षश्राद्धाचा विधी होता. त्यामुळे, तिने एका मुलांची गैरसोय होऊ नये यासाठी आपल्या वरिष्ठांना कळवून पर्यायी महिलेची सोय करुन दिली होती. अर्थात अडिनडीला सहकार्य म्हणून ही माऊली देखील तेथे स्वयंपाक करण्यासाठी तयार झाली होती. मात्र, नव्या व्यक्तीला पाहून संबंधित शिक्षक महोदयांनी त्यांच्या भावना अनावर झाल्या आणि त्यांनी वर्ग सोडून भलतेच धडे गिरविण्याचा प्रयत्न त्या ज्ञानमंदिरात केला.
दरम्यान, दि. १८ जानेवारी २०२३ रोजी दुपारी १:१५ वाजण्याच्या सुमारास पीडित महिला स्वयंकाप घरात अन्न शिजविण्याचे काम करीत होती. तेव्हा ज्ञानदेव उगले हा झोकांड्या खात थेट स्वयंपाक घरात घुसला त्याने आज नव्याने कामावर नव्हे तर सहकार्य करण्यासाठी आलेल्या महिलेला पाहिले आणि मागून जाऊन मिठी मारली. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे पीडित महिला घाबरली आणि तिने मोठ्याने आरडाओरड केली. मात्र, तोवर याने अनेक निर्लज्जपणाचे कृत्य केले होते. पीडित महिलेचा आवाज ऐकल्यानंतर तेथे असणारी एक महिला शिक्षक आणि सर यांनी स्वयंपाक खोलीकडे धाव घेतली. तेव्हा हे महाशय नको त्या आवस्थेत दिसून आले. उपस्थित शिक्षकांनी आपल्या सहकार्यास समजून सांगितले आणि स्वयंपाक खोलीतून बाहेर काढले.
दरम्यान, जेव्हा आपला मशगुलपणा पकडला गेला. तेव्हा, तोंड लपविण्यासाठी यांनी माफीसत्र सुरु केले. मात्र, जे भर दिवसा या शाळेत घडले. ते एखाद्या शिक्षिकेसोबत किंवा विद्यार्थ्यांसोबत का घडू शकत नाही. त्यामुळे, हा प्रश्न दडपण्यापेक्षा याला धडा शिकविला पाहिजे. म्हणून पीडितेने पुढाकार घेतला. मात्र, एक सरपंच महिलेचे पती हे विनयभंग करणार्या शिक्षकाच्या दिमतीला धावून आले. झाले असेल चुकून, तो पुन्हा असे करणार नाही, एकदा घडले तर माफ करा अशा भंपक वल्गना करुन शिक्षकाला पाठीशी घालु लागला. मात्र, पीडित महिला गुन्हा दाखल करण्यावर ठाम होती. दुर्दैवाने ज्यांना जनतेने विश्वासाने निवडून दिले. त्यांनी असल्या घानेरड्या कृत्यांची मध्यस्ती करावी. हे असेल प्रकार हरिश्चंद्राच्या नगरीत चालतात हे फार दुर्दैव असल्याची खंत अनेकांनी व्यक्त केली आहे.
यात खरंतर जे आपल्याबाबत झाले ते दुसर्यांच्या बाबत किंवा चिमुकल्यांसोबत होऊ नये म्हणून ठाम भुमिका घेणार्या पीडितेचे अनेकांनी आभार मानले आहे. कारण, अन्य करणार्यापेक्षा तो सहन करणारा जास्त दोषी असतो असे म्हणतात. यात आणखी एक गोष्ट लक्षात आली. की, शाळेचे मुख्याध्यापक करतात तरी काय? शिक्षक शाळेत दारु पिऊन येतात, शाळेत असले घानेरडे कृत्य करतात याला दोषी कोण? म्हणून तर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा बंद होण्याच्या मार्गावर आल्या आहेत. गटशिक्षण अधिकारी महोदयांनी यात लक्ष घालावे अन्यथा शिक्षण विभागाला टाळे ठोकले जाईल असा इशाला सामाजिक संघटनांनी दिला आहे.
पोलिसांची भुमिका संशयास्पद.!
गुन्हे दाखल करताना एक जरी संदिग्ध चुक झाली. तरी त्या एफआयआरचा अर्थ पुर्णत: बदलुन जातो. विशेष म्हणजे आरोपीचे नाव देखील एकीकडे ज्ञानदेव आणि दुसरीकडे नामदेव अशा पद्धतीने घेण्यात आले आहे. त्यामुळे, दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर पहिला युक्तीवाद आणि आक्षेप नावाच्या वादाहुन होणार आहे. तर, दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आरोपी हा दारु पिलेला होता. त्याला पोलिसांनी तत्काळ अटक केली असती तर त्याचे मेडिकल करता आले असते. त्यात अल्कहोल संसर्भात रिपोर्ट मिळाले असते. त्यातून त्याच्यावर अधिक गुन्हा निष्पत्ती करता आली असती. मात्र, कोठे पाणी मुरले असेल हे काही नव्याने सांगण्याची गरज नाही. त्यामुळे, गुन्हापासून ते तपासापर्यंत साशंकता निर्माण होत आहे.