नवरा गेल्यानंतर, पिडितेकडे घाणेरडी मागणी केली, २४ तास तिच्यावर नजर ठेऊन पाठलाग केला, चौघांवर गुन्हे दाखल.!
सार्वभौम (संगमनेर) :-
संगमनेर तालुक्यात पठारभागातील हिवरगाव पठार परिसरात एक व्यक्ती हृदयविकाराच्या झटक्याने मयत झाला. त्यानंतर त्याच्या जवळच्या लोकांची नजर मयत व्यक्तीच्या पत्नीवर पडली. जवळचे लोक या पिडीत महिलेच्या मुलांना धमकवतात व पिडीत महिलेविषयी विचारणा करतात. या पिडीत महिलेवर देखील अगदी करडी नजर ठेऊन भेटेल तिथे शरीर सुखाची मागणी करतात. आता हा सर्व घृणास्पद प्रकार समोर आला आहे. ही धक्कादायक घटना पिडीत महिलेचा पती मयत झाल्यापासून दोन वर्षादरम्यान वेळोवेळी झाल्याचे पिडीताच्या सांगण्यावरून लक्षात आले आहे. याप्रकरणी खुद्द पिडीतीने जवळच्या लोकांना पाठीशी न घालता शनिवार दि.28 जानेवारी 2023 रोजी घारगाव पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी आरोपी संदिप भिकाजी वणवे, संजय भिकाजी वणवे, बिरु राधु चितळकर, बिरु तोंडे (सर्व रा. हिवरगाव पठार) यांच्यावर विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास पोलीस नाईक खैरे करत आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, हिवरगाव पठार परिसरात एक छोटंसं कुटुंब होतं. त्यांना एक मुलगा एक मुलगी आहे. त्यांचा शेतीवर उदरनिर्वाह चालायचा. दोन वर्षांपूर्वी पिडीत महिलेचा पती हृदयविकाराच्या झटक्याने मयत झाला आहे. पिडीत महिलेच्या पतीच्या मृत्यूनंतर काही जवळचे लोक संदिप वणवे, संजय वणवे, बिरु चितळकर, बिरु तोंडे यांनी पिडीत महिलेला त्रास देण्यास सुरुवात केली. ते कधी घरावर रात्रीच्या वेळी खडे मारत तर कधी घराचे दार वाजवत. तर मध्येच पिडीत महिलेला दोन घास सुखाने खाऊ देत नसत. पिडीत महिला शेतात किंवा बाजारात साकुरला गेली. की, आरोपी संदिप वणवे, संजय वणवे, बिरु चितळकर, बिरु तोंडे हे पिडीत महिलेचा पाठलाग करत असतात. पिडीत महिला कुठे जाते त्याचे सर्व व्हिडीओ आहे. तु आमच्या म्हणण्याप्रमाणे वाग, आम्ही तुला काही त्रास देणार नाही आशा धमक्या देत असत, आणि पिडीत महिलेकडे शरीर सुखाची मागणी करत असत. तसेच पिडीत महिलेने घरात काही वस्तु आणल्यावर किंवा भावाकडून काही मदत घेतल्यावर आरोपी पिडीत महिलेच्या चारित्र्यावर संशय घेऊन घालुन पाडून बोलणे, हिनवणे किंवा वाईट शिवीगाळ देत असत.
दरम्यान, याबाबत काही गावातील प्रतिष्ठित व्यक्ती व नातेवाईकांनी समजावून सांगितल्यावर चार-आठ दिवस व्यवस्थित राहतात. पण नंतर यांचा पुन्हा तोच तडाखा चालु. त्यामुळे, ऐकतील ते आरोपी कसले.! त्यांना समझ दिली की काही दिवसात पुन्हा त्रास देण्यास सुरुवात केली समजा..!! दि. 24 जानेवारी 2023 रोजी रात्री सात वाजण्याच्या सुमारास पिडीत महिला घरी असताना आरोपी बिरु चितळकर व बिरु तोंडे हे पिडीत महिलेच्या घरासमोर आले व पिडीत महिलेला शिवीगाळ करू लागले. तु आमच्याकडे ये नाहीतर तुला बघुन घेतो. तुला मारायला महिला पाठवणार आहे असे म्हणाले. त्यानंतर पिडीत महिलेने त्यांना समजून सांगितले, येथे गोंधळ करु नका. मला त्रास देऊ नका. पण, यांना राडा सुरुच ठेवला. त्यानंतर पिडितेने विचारले की, मला कोण मारायला येणार आहे, त्यांची नावे सांगा. मात्र, त्यांनी सांगितले नाही.
त्यानंतर पिडीत महिला कुठे जाते. कुठे काय उद्योग करते याकरीता वेगळी माणसे नेमले आहे असे म्हणून तिला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. तर, आरोपी संदिप वणवे, संजय वणवे, बिरु चितळकर, बिरु तोंडे यांनी पिडीत महिलेकडे वेळोवेळी शरीर सुखाची मागणी करून पिडीत महिलेचा पाठलाग केला. तसेच पिडीत महिलेच्या चरित्र्यावर संशय घेऊन शिवीगाळ करून पिडीत महिलेच्या मुलांना व पिडीत महिलेला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यामुळे, पिडीत महिलेला राग अनावर झाला आणि तिने थेट घारगाव पोलीस ठाणे गाठले. तेथे घडलेली कैफियत पोलीस ठाण्यात सांगितली त्यानंतर घारगाव पोलीस ठाण्यात विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. याचा पुढील तपास पोलीस नाईक खैरे करत आहेत.