गृपवार बातम्या टाकतो म्हणून सरपंचसाहेब जाम तापले.
सार्वभौम (संगमनेर) :-
गावातील शिक्षक हा गावच्या गृपवार बातम्या टाकतो म्हणून सरपंचसाहेब जाम तापले. त्यांनी शिक्षकास वाटेत आडविले आणि त्यांना जाब विचारला. मला काय करायचे आणि काय नाही हा अधिकार संविधानाने दिला आहे. त्यामुळे, मी काही वावघे केले नाही असे समजून सांगत असताना सरपंच महोदय अधिकच तापले आणि अश्लिल शब्दात शिविगाळ करु लागले. साहेब.! शिव्या देऊ नका असे म्हणताच त्यांनी जवळ असणारी एक कुबडी उचलली आणि थेट शिक्षकावर भिरकविली. त्यात शिक्षकांचा डोळा थोड्याहून वाचला. मात्र, हा सर्व प्रकार दडपून न ठेवता शिक्षकाने थेट घारगाव पोलीस ठाणे गाठले आणि सरपंच रामकृष्ण नाथा पांडे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तर, यात संजय धोंडीबा कौठे (रा. जवळेबाळेश्वर, ता. संगमनेर) हे शिक्षक जखमी झाले आहेत.