संगमनेरात वेश्या व्यवसायावर छापा.! ४१ हजारांचा मुद्देमाल, महिलेसह तिघांवर गुन्हा दाखल, स्थानिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्‍नचिन्ह.!

 

     

सार्वभौम (संगमनेर) :-

          संगमनेर तालुक्यात वडगाव पान येथे श्रीरामपूर पोलीस उपाधिक्षक संदिप मिटके यांच्या पथकाने हॉटेल विशाल गार्डनच्या पाठीमागे साईमाया लॉज येथे सुरू असणार्‍या वेश्या व्यावसायावर छापा टाकला. यात एका महिलेची सुटका करण्यात आली असून तेथून तब्बल  ४१ हजार २० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. यात प्रतिक बाळासाहेब चत्तर (रा. वडगाव पान), पुनम उर्फ सुजाता संजय आगरे (रा. संगमनेर) आणि खेमराज कृष्णाराज उपाध्याय (रा. वडगाव पान, ता. संगमनेर) अशा तिघांना आरोपी करण्यात आले आहे. आरोपी हे पीडित महिलेला डांबून ठेऊन बळजबरी तिच्याकडून वेश्या व्यावसाय करुन घेत होते. तर, त्यापासून जी काही रक्कम मिळत होती. त्यावर स्वत:ची उपजिविका करीत होते अशा प्रकारची फिर्याद संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात विष्णु आहेर यांनी दिली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, संगमनेर तालुका आजकाल वेश्या व्यावसायासाठी फेमस होत चालला आहे. त्यासाठी कोण खतपाणी घालत आहे हे नव्याने सांगण्याची गरज नाही. त्यामुळे, येथील नागरिक आता स्थानिक पोलिसांवर विश्‍वास ठेवण्यापेक्षा थेट डॉशिंग व पारदर्शी अधिकारी म्हणून ज्यांची ओळख आहे त्या संदिप मिटके साहेब यांच्याशी संपर्क करतात. त्यानुसार त्यांना गोपनिय माहिती मिळाली आणि त्यांच्या पथकाने थेट संगमनेर गाठले. येथे आल्यानंतर पथकाने वडगाव पान शिवारात सापळा रचला. मात्र, येथे छापा टाकायचा आहे अशी जरा देखील चुनूक संगमनेर तालुका पोलिसांना लागु दिली नाही. याचे कारण सर्वश्रुत आहे. त्यामुळे, प्रथमत: कारवाई करताना पोलीस उपाधिक्षक यांच्या पथकाची धवपळ झाली. नंतरच्या काळात स्थानिक अधिकार्‍यांची मदत घेण्यात आली.

दरम्यान, स्थानिक पोलिस आल्यानंतर कारवाईत संदिग्धता येऊ लागल्याची चर्चा रंगली. त्यामुळे, सोशल मीडियात तसे मेसेज येऊ लागले. त्यानंतर मात्र पोलीस उपाधिक्षक संदिप मिटके यांनी थेट पथकाला आदेश दिले. कारवाई कायदेशीर पद्धतीनेच करण्यात यावी. त्यानुसार एका महिलेस ताब्यात घेऊन तिची वेश्या व्यावसायातून सुटका करण्यात आली. तर, साईमाया लॉज येथून देहविक्री व्यावसायास लागणार्‍या काही वस्तू तेथे मिळून आल्या. तर, यात प्रतिक बाळासाहेब चत्तर, पुनम उर्फ सुजाता संजय आगरे आणि खेमराज कृष्णाराज उपाध्याय (रा. वडगाव पान, ता. संगमनेर) अशा तिघांना आरोपी करण्यात आले. या कारवाईनंतर पोलीस उपाधिक्षक संदिप मिटके यांच्यामुळे, पारदर्शकता आल्याचे बोलले जात आहे. परंतु, ग्रामीण भागात अशा प्रकारचे व्यावसाय सुरू असताना थेट बाहेरच्या अधिकार्‍यांना येऊन कारवाई करावी लागते तर स्थानिक अधिकारी काय करतात? असा प्रश्‍न संगमनेरकर उपस्थित करीत आहेत. 

साहेब.! बिटवाल्याची माया तपासा.!

खरंतर वेश्या व्यावसाय चालविण्याची धाडस अशीच कोणाची होऊ शकत नाही. त्यासाठी संबंधित बिट वाल्यांचे सहकार्य असल्याशिवाय होऊच शकत नाही. स्थानिक काही व्यक्तींच्या म्हणण्यानुसार या पाडित महिलेच्या जीवावर फक्त आरोपींचाच उदरनिर्वाह होत नव्हता. तर, तिच्याकडून आणखी कोणाला आहेर मिळत होता याची चौकशी करणे गरजेचे आहे. नावे देवाची ठेवायची आणि कृत्य सैतानाची करायची अशा प्रकारची प्रवृत्ती आपल्याला वर्दीत दिसून येते. त्यामुळे, पोलीस उपाधिक्षक आणि पोलीस अधिक्षक यांनी यात चौकशी करुन हा व्यावसाय कोणाच्या आशिर्वादाने सुरू होता हे लक्षात येईल. विशेष म्हणजे वडगाव पानमध्ये काही हा एकच अवैध व्यावसाय नाही. हे गावा आता गुन्हेगारांचे व्हॉटस्पॉट बनु लागले आहे. येथे रस्तालुट, दरोडे, चोर्‍या आणि खुन अशा घटना अनेकदा घडल्या आहेत. विशेष म्हणजे गाड्यांना हात करुन त्यात बसायचे आणि गळ्याला चाकु लावायचा ह्या अनेक घटना अगदी राजरोस घडतात. त्यातील एकही गुन्हा पोलिसांना ओपन होत नाही. मात्र, तालुका हाद्दीत राजरोस वेश्या व्यावसाय चालतात त्यावर देखील कोणाकोणाच्या उपजिविका चालतात. या चौकशीची मागणी आताहोऊ लागली आहे.

बातमीनंतर जाग आली.!

या हॉटेलवर सायंकाळी ७ वाजेच्या दरम्यान पोलिसांनी छापा टाकला होता. कसा छापा टाकला, काय अर्थपुणर्र् तडजोडी होतात, स्थानिक पोलिसांचा यात काय रोल होता. यावर थेट सोशल मीडियावर चर्चा चालु होती. विशेष म्हणजे सात ते ११ असे चार तास होऊन गेले. त्यात पोलिसांना माहिती विचारली असता त्यांच्याकडून संदिग्ध प्रतिक्रिया येत होत्या. यात आरोपी कोणाला केले नाही. एक महिला सापडली आहे. कोणाला आरोपी करायचे हे निष्पन्न केले जाईल. यापेक्षा न पटणारी उत्तरे मिळत होती. मात्र, याबाबत पोलीस उपाधिक संदिप मिटके यांनी थेट श्रीरामपूर येथून लक्ष घातले आणि कोणत्याही प्रकारचा हालगर्जीपणा चालणार नाही. जे असेल ती कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर गुन्ह्यात ४१ हजारांचा मुद्देमाल, एक महिलेची सुटका आणि तीन जणांना आरोपी करण्यात आले. अर्थात रोखठोक सार्वभौमच्या बातमीनंतर अधिकार्‍यांना वास्तव घटना समजली. मात्र, स्थानिक व्यक्ती आणि त्यांच्यातील अर्थपुर्ण तडजोडी अधिकार्‍यांनी उधळुन लावल्याची चर्चा तालुक्यात रंगली होती.   

संगमनेर पोलीस करतात तरी काय?

दरम्यान संगमनेर शहरात आणि तालुक्यात फार मोठ्या प्रमाणावर देहविक्री व्यावसाय सुरु असून त्यात भल्याभल्या नेत्यांची भागिदारी असल्याचे बोलले जात आहे. शहरात कोठे-कोठे काय-काय उद्योग चालतात हे वर्दीवाल्यांना माहित असून देखील त्याकडे मलिद्यापोटी कानाडोळा केला जात आहे. यापुर्वी देखील श्रीरामपूर पोलीस उपाधिक्षक संदिप मिटके यांच्या पथकानेच गोमांसवर कारवाई केली होती. तसेच गेल्या महिन्यात चंदनापुरी घाटात चालणार्‍या वेश्या व्यावसायावर कारवाई केली होती. म्हणजे, श्रीरामपुरमध्ये राहुन तेथे त्यांना माहिती मिळते पण स्थानिक पोलिसांना मिळत नाही. हे म्हणजे नवल वाटण्याजोगे आहे. तर, दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे स्थानिक पोलिसांवर संगमनेरकरांचा विश्‍वास राहिला नाही की काय? म्हणून ते श्रीरामपूरच्या मिटके साहेबांपर्यंत जाऊन तक्रारी करतात. त्यामुळे, संगमनेर पोलिसांनी आपली विश्‍वासहार्यता गमविली आहे की काय? असे प्रश्‍नचिन्हा निर्माण होऊ लागले आहेत.