शिवसेनेत अवहेलना झालेले मारुती मेंगाळ राष्ट्रवादीत दाखल.! पुन्हा एकास एकसाठी अजित दादांची पहिली खेळी.!
- सागर शिंदे
सार्वभौम (अकोले) :-
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे वारे वाहण्यापुर्वी अकोले तालुक्यातील राजकारणाला रंग चढू लागला आहे. शिंदे गट शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर अकोल्यात राजकीय खळबळ उडेल असे वाटले होते. मात्र, तालुक्यात एक टक्का देखील त्याचा फरक पडला नाही. या सगळ्या प्रक्रियेत सध्या लोकप्रिय होऊ पहात असलेले मा. उपसभापती मारुती मेंगाळ हे शिवसेनेतून बाहेर पडतील आणि शिंदे गटात सामिल होतील असे वाटत होते. मात्र, त्यांनी स्वत:चे राजकीय करिअर संपविण्यापेक्षा थांबून घेणे पसंत केले. त्यानंतर बबनराव घोलप यांच्याकडून मेंगाळ यांना सन्मान मिळत गेला. मात्र, घोलप यांच्या निवडी मातोश्रीहून रद्द झाल्याने त्यांच्या शब्दाला किती वजन आहे याची चर्चा सर्वत्र होऊ लागली. एकीकडे राज्यात शिवसेना वाढत असताना अकोल्यात शिवसेनेचे गटतट आणि नाराजीनाट्य थांबले नाही. उलट, घोलपांच्या पोष्टवरील फोटोचे चपलाने तोेंड झोडून पक्षादेश पायदळी तुडविण्यात आला. त्यामुळे, मोरे आणि धुमाळ या एकाच नाण्याच्या दोन बाजु तरी नाणं खोटं निघालं. यांच्यामुळे, पक्षात नवचैतन्य निर्माण होण्याऐवजी संघटन विखुलरं आणि पक्षात सर्वात जास्त सक्रिय असणारे मारुती मेंगाळ यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ हाती घालण्यात स्वारस्य मानले. त्यांचे अजित दादा पवार यांनी वेलकम केले असून पुन्हा एकाच एकची पहिली पायरी अजित दादांनी रचल्याचे पहायला मिळाले आहे.
२०१९ साली विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि पवार पॅटर्ण अकोल्यात यशस्वि ठरला. त्यानंतर वर्षे सहा महिने डॉ. लहामटे यांना जनतेचे फोन घेणे न घेणे, कार्यकर्ते संभाळणे, नेत्यांची मनधरणी करण्यात गेले. त्यानंतर मात्र त्यांनी पुढार्यांच्या नादी न लागता थेट जनता आणि कामांवर धडाका धरला. पाचशे कोटींची कामे आली खरी. मात्र, सक्षम तथा एकनिष्ठ कार्यकर्त्यांची फळी उभी करणे आणि पक्ष संघटन यात मात्र त्यांना आजही मार्क कमी पडतात. जेव्हा पक्षाचे धोरनात्मक कार्यक्रम होतात तेव्हा रिकाम्या खुर्च्या सर्व काही सांगून जातात. मात्र, इतका सामान्य आणि १८ तास पळणारा आमदार जनतेला मिळणे नाही.! हे देखील जनता मान्यच करते. मात्र, अशोकराव भांगरे यांनी २०१९ साली राष्ट्रवादीच्या रथाचे सारथ्य केले. त्यामुळे, २०२४ ला ते करतील का? आणि त्यांनीच ते का करावं? त्यांच्या १९५२ पासून ते अगदी २०१९ पर्यंत जो वारसा आहे. त्यात १९८० पासून त्यांना विधानसभेत कधीच संधी मिळाली नाही. त्यामुळे, २०२४ साली त्यांनी अपेक्षा का करु नये? हे नैतिकतेला धरुन आहे. मात्र, येणारा काळ अधिक गुंतागुंतीचा ठरू पाहत आहे. कारण, हा तालुका भाजपाला माननारा नाही. त्यामुळे, आमदार व्हायचे असेल तर राष्ट्रवादी पक्षातच.! त्यामुळे, इकडे भाऊगर्दी वाढू लागली आहे.
आता राष्ट्रवादीत विद्यमान आमदार डॉ. किरण लहामटे आणि अशोकराव भांगरे तथा अमितराव भांगरे यांच्यात कोणी नाही म्हटले. तरी, अंतर्गत तु की मी हा गुप्त कलह तेव्हा निर्माण होणारच आहे. मात्र, अशात मारुती मेंगाळ यांनी अजित दादांची भेट घेऊन दोघांचे भांडण तिसर्याचा लाभ.! अशी कळवंड केली आहे. खरंतर मेंगाळ हे अगदी सामान्य नव्हे.! अतिसामान्य कुटुंबातून आलेले व्यक्तीमत्व आहे. त्यांची शिवसेनेत असताना जितकी अवहेलना केली गेली, तितकी तर त्यांच्या आयुष्याने देखील केली नसेल. का? तर बंड पुकारले म्हणून. मग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तर शिवसेनाच संपविण्याचा प्रयत्न केला आहे. मग? त्यांचे काय झाले? म्हणजे, येथील प्रस्तापिताच्या बुडाखाली खुर्च्या हव्यात, त्यांचेच पाहुणे रावळे सत्तेत बसले पाहिजे म्हणून पक्षाला दुय्यम स्थान देणार्यांनी मारुती मेंगाळ यांचे राजकारण संपुष्टात आणू पाहिले. मात्र, नियतीने त्यांना न्याय दिला आणि सहा वर्षे शिवसेनेत अवहेलना सहन करणार्या मेंगाळ यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. दुर्दैव इतकेच.! की, डॉ. मोरे यांचे पद कायम राहिले असते. तर, आज मेंगाळ भगव्या झेंड्याखाली तालुकाभर फिरले असते. मात्र, वेळी निघुण गेली आहे.
खरंतर, मेंगाळ यांचे राजकीय भविष्य तेव्हाच उज्वल ठरले. जेव्हा त्यांनी परिवर्तनाच्या नावाखाली पिचड साहेबांना साथ देणार्या टोळीतून बाहेर पडणे पसंत केले. त्यानंतर सिताराम पाटील गायकर यांच्या सोबत आल्यानंतर मेंगाळ यांची भुमिका फार मोलाची ठरली. त्यानंतर शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांकडून होणारी अवहेलना, बबन घोलप हे नव्या आशेचा किरण दिसत असताना त्यांनी नियुक्ती केलेली पदे मातोश्रीने रद्द करणे, पक्षातून न मिळणारी संधी आणि स्थानिक नेतृत्व यामुळे वैतागलेल्या मारुती यांनी थेट मंत्रालयाकडे झेप घेतली आणि राष्ट्रवादीत स्थिर होण्याचा निर्णय घेतला. खरंतर, यासाठी त्यांना आ.निलेश लंके, आ.अतुल बेनके, आ.माणिकराव कोकाटे यांच्यासह अन्य काही आमदार आणि सिताराम पा. गायकर यांची मध्यस्ती कामी पडली आहे. त्यामुळे, तालुक्यात कोणाला माहित नसताना मेंगाळ यांनी मुंबई गाठली आणि दादांची भेट घेऊन काही गोष्टींवर चर्चा केली आहे. दादांकडून ग्रिन सिग्नल मिळाल्यानंतर मेंगाळ यांनी शिवबंधन सोडून हाती घड्याळ बांधण्याचा निर्णय घेतल्याचे दिसते आहे.
आता मेंगाळ यांच्या प्रवेशाने नेमकी काय होऊ शकते? तर, कदाचित त्यांना आमदारकीचे डोहाळे लागले असावेत असे अनेकांचे मत आहे. आता ते खरे असले तरी विद्यमान आमदार आणि भांगरे साहेब यांच्यातून त्यांना संधी मिळेल का? हा फार मोठा प्रश्न आहे.! असे असले तरी ते अशक्य नाही. मात्र, तरी देखील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यात जिल्ह्यात राष्ट्रवादीच मेंगाळ यांना संधी देऊ शकते हे देखील तितकेच वास्तव आहे. त्यामुळे, काल शुन्य ओळख असणारा तरुण आज तालुक्यातील घराघरात पोहचला आहे. उद्या जिल्ह्यात पोहचेल आणि नंतर राज्यात..! त्यामुळे, मेंगाळ यांनी पक्षबदलाचा निर्णय घेतला आहे. त्यावर अनेकांनी समाधान व्यक्त केले आहे. मेंगाळ हे नाव केवळ आदिवासी आणि ठाकर बांधवांपुरते मर्यादीत राहीले नसून संबंध अन्यत्र समाजात देखील मोठे झाले आहे. येणार्या काळात सतिश भांगरे आणि मारुती मेंगाळ हे चांगले तरुण कार्यकर्ते आपण गमविल्याचा पश्चाताप शिवसेनेला झाल्याशिवार राहणार नाही.!!