ग्रामपंचायत निवडणुकीत एका बुक्कीत उमेदवाराचा दात पाडला.! बळजबरी दारु तोंडात ओतून दोघांना मारहाण,जातीचा वाद, चौघांवर गुन्हा दाखल
भारत स्वातंत्र्य झाला. मात्र, येथे जाती-पातीत गणली गेलेली मानसे मात्र अद्याप उच्च जातीच्या गुलामगिरीत जखडलेली आहेत. छत्रपती शाहु महाराजांपासून ते महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापर्यत अनेकांनी उच्चवर्गाची मस्तकं सुधरविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या डोक्यातून जात आणि दुसर्यांना प्रतिनिधीत्व देण्याची मानसिकता काही होत नाही. याचीच प्रचिती खुद्द पुरोगामीत्वाचे झेंडे मिरविण्यार्या संगमनेरमध्ये पहायला मिळाली आहे. बौद्ध जातीच्या व्यक्तीने विरोधात उमेदवारी केली म्हणून काही व्यक्तींनी त्याच्या तोंडात बळजबरी दारु ओतली. तर, जातीयवाचक शिविगाळ करून तु उमेदवारी कसा करतो असे म्हणून चौघांनी बेदम मारहाण केली. यात उमेदवाराच्या तोंडावर बुक्का मारुन त्याचा दात पाडला. ही घटना दि. ११ डिसेंबर २०२२ रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी प्रकाश लिंबाजी खरात (रा. मालुंजे, ता. संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गावातील चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मालुंजे येथे ग्रामपंचायतीची निवडणुक लागली आहे. तेथील निवडणुक ही चांगलीच रंगतदार असून अनेकांनी जातीयतेचे राजकारण केल्याचे समोर येऊ लागले आहेत. दि. ११ डिसेंबर २०२२ रोजी प्रकाश खरात (उमेदवार) हे त्यांचा पुतण्या भाऊसाहेब खरात यांच्यासोबत संगमनेर येथे गेले होते. त्यांचे काम आटोपल्यानंतर रात्री ९:३० वाजण्याच्या सुमारास दोघे पुन्हा मालुंजे गावात गेले होते. त्यावेळी, मंदिरासमोर कट्यावर प्रदिप भाऊसाहेब घुगे, संदिप भाऊसाहेब घुगे, विजय बच्च्यु डोंगरे व दिपक सोमनाथ डोंगरे ही चौघे बसले होते. त्यावेळी प्रदिप घुगे याने खरात यांना आवाज दिला आणि जवळ बोलावून घेतले.
घुगे म्हणाला की, तु खालच्या जातीचा असून उमेदवारी करतो आहे. तुझ्यासारखा क्षुद्र जातीचा गावात प्रचार कसा करतो हेच मी पाहतो. तुम्ही खालच्या जातीचे लोक माजले असून तुमचा माज आम्ही जीरवतो असे म्हणून जातीवाचक शिविगाळ करुन दमदाटी सुरू केली. माझ्यावर अनेक केसेस आहेत. मी तडीपार होतो, मला काही होत नाही. मात्र, तु उमेदवारी करतोय ना.! तुझे तंगडेच तोडतो माझे कोणी काही वाकडे करू शकत नाही असा दम दिला. तर, पुतण्या भाऊसाहेब हा मध्ये पडला असता दिपक डोंगरे याच्यासह चौघांनी त्यास लाथाबुक्यांनी मारहाण करण्यास सुरूवात केली. तो ओरडत होता. मात्र, आमच्या नादाला कोणी लागले तर काय हाल होते असे म्हणून घुगे याने त्यांना सोडू नका असे म्हणून मारहाण सुरूच ठेवली.
दरम्यान, दोघांना या चौघांच्या ताब्यातून सुटण्याचा प्रयत्न केला. मात्र, तुम्हा खालच्या जातीचे लोक आता आम्ही तुम्हाला ठार मारुन टाकू असे म्हणून हिनवत राहिले. आरोपी यांनी खरात यांना बळजबरीने पकडून त्यांच्या तोंडात बळबळ दारुची बाटली कोंबली आणि त्यांना दारू पाजली. तर, हा राडा ऐकू आल्यानंतर गावातील संजय खरात, संतु खरात, गणेश डोंगरे, कल्पेश आव्हाड, रवी वाघ हे भांडण सोडविण्यासाठी आले. मात्र तरी देखील वाद मिटला नाही. उलट आरोपी यांनी खरात यांच्या तोडावर जोराचा बुक्का मारला असता त्यांचा एक दात अर्धवट तुटला आणि तोंडावर, पाठीवर जखम देखील झाली. दोन गटाच्या मानसांनी हा वाद सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोवर मारामार्या होऊन गेल्या होत्या.