विकास शेटे हे कारखान्याचे संचालक शोभत नाही.! गावच्या तरुणाने मांडला सारंश.! सातत्याने डावलला गेलेला हा कर्तुत्वान तरुण.!

 


- ज्ञानेश पुंडे 

सार्वभौम (अकोले) :-

         कर्तुत्वाच्या उतुंग सिमा असणारे व्यक्तीमत्व अगदी कोळशाच्या खाणीत जरी दडविले तरी हिर्‍याप्रमाणे प्रखर दिसतात. त्यांना कोणाच्या प्रकाशाची गरज नसते ना कोणाच्या आधाराची. असेच एक व्यक्तीमत्व म्हणजे विकासराव होय.! कॉलेज जिवणापासून नेतृत्व आणि संघटन यात निष्णात असणारा तरुण. शांत, संयमी, नितळ आणि निर्मळ व्यक्तीमत्व बोलबोल करता अनेकांच्या मनावर अधिराज्य गाजवून गेले. उभी हयात मानसे जोडण्यात गेली. पण, नेतृत्वाकडून कधी मोक्याची संधी मिळाली नाही. सातत्याने तोंडात आलेला घास हिसकावून घेण्यात आला. त्यामुळे, पात्रता असून देखील वयाची चाळीशी ओलंडली तरीसुद्धा हा तरुण योग्य वेळेची वाट पाहत राहिला. बंड पुकारणे हे रक्तात नसल्यामुळे ज्याला कृष्णा मानले त्याच्या इशार्‍यावर हा अर्जुन आपल्या आयुष्याचे राजकीय युद्ध लढत राहिला. मात्र, संयमाचे फळ उशीरा का होईना त्यांच्या पदरी पडले आणि विकासराव अगस्ति सहकारी साखर कारखान्याचे संचालक झाले. मात्र, हे पद त्यांना शोभत नसून त्यांनी संधी मिळाल्यास येथे राजिनामा देऊन जिल्हा परिषदेचे नेतृत्व करावे असे अनेकांना वाटते आहे. ते जगासाठी काय आहेत ही एक महत्वाची बाजू असली तरी ते आमच्या गावच्या विकासाचे प्रतिबिंब आहेत.!

ढोकरी गावचे मार्गदर्शक कचरुपाटील शेटे (दादा) यांचे चौथे सुपुत्र विकासराव. मुलीच्या अपेक्षेने झालेला मुलगा म्हणून दादा आणि आक्का त्या प्रसंगी थोडेसे नाराज झाले होते. परंतु सुशिक्षित असल्याने तत्कालिन परिस्थितीचा त्यांनी आनंदाने स्विकार केला. त्या तान्हुल्याचे अगदी लाडाकोडात राजा असे नाव ठेवले. आईवडील आज्जी आजोबा चुलत्याकाका अशा एकत्रित कुटुंबात राजाबाळ वाढला. म्हणतात ना.! बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. अगदी तसाच, राजा लहानपणापासून इतका दिलदार होता. की, सहज कोणाच्याही काळजाचा ठाव घेत होता. आमच्या अंगणवाडीतील पवारताईंचा तर अगदी लाडका होता. मराठी शाळेत पहिलीत गेलेला हा राजा नंतर धांडे मास्तरांचा आवडता झाला आणि त्यांनी राज हे नाव बदलून त्याचे विकास नाव ठेवले. का कुणास ठाऊन त्या सरांना देखील माहित झाले असावे.! हा तरुण उद्या गावच्या विकासाचे प्रतिबिंब ठरले.

मनाचा राजा माणून बुद्धीमत्तेत देखील राजाच होता. त्यामुळे, दादांनी विकासला भोसला मिलिटरी स्कुल नाशिक येथे दाखल केले. तेथे नगर, नाशिकसह अन्य जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी शिक्षण घेत होते. तेथेच विकासरावांच्या पुढच्या वर्गात अकोले तालुक्याचे माजी आमदार वैभवराव पिचड हे देखील शिक्षण घेत होते. दहावी पर्यंतचे शिक्षण पुर्ण करुन विकासराव कॉलेज करण्यासाठी अकोल्यात आले. तेव्हापासून वैभव आणि विकास ही एकाच नान्याच्या दोन बाजु झाल्या. इतकी मैत्री आणि इतके समाजकारण, त्यामुळे, नकळत त्यांच्यावर राजकीय संस्कार होत गेले. त्यावेळी देशात व राज्यात कॉंग्रेस आयचा बोलबाला होता. त्यात कॉंग्रेस पुरस्कृत एसएफआय विद्यार्थी संघटनेत विकासराव अध्यक्ष झाले. समता, बंधुता, साम्यवादी व लोकवादी लोकशाहीचा मुळ विचार येथे त्यांच्यात रुजला गेला. पुढे शरदचंद्र पवार यांनी कॉंग्रेस पक्ष सोडून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष स्थापन केला. त्या नव्या पक्षाच अकोले तालुका राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस अध्यक्ष विकासराव कचरुपाटील शेटे यांना करण्यात आले. माजी मंत्री मधुकरराव पिचड साहेब माजी गृहमंत्री स्व. आर आर. पाटील व सिताराम पाटील गायकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्यातून विकासराव यांनी राष्ट्रवादी व पवार साहेबांच्या विचारांचे हजारो कार्यकर्ते तयार केले. बघता-बघता तालुक्यात तरुणांच जाळ तयार झाल. आढळा, मुळा, प्रवरा असे विभागवार दौरे, बैठका घेऊन राष्ट्रवादी पक्षाची पताका खांद्यावर घेऊन तरूण वर्गात पक्षप्रेम वाढविले. 

काम इतके प्रामाणिक आणि पारदर्शी होते. की, त्यांच्यावर सहज कोणाचाही विश्‍वास बसत होता. विकास म्हटलं की शंकाशुन्य काम होत होते. तालुक्यात स्वत:ला झोकून देऊन काम केल्यामुळे शासन-प्रशासन हे खूपच जवळून अभ्यासायला मिळत होते. जर विचारांचे बीज पेरायचे असेल तर पहिली सुरुवात आपल्या घरातून आणि नंतर गावातून करावी लागेल. याची शाश्‍वत प्रचिती त्यांना झाली. आपण आपल्या गावासाठी काहीतरी केले पाहिजे. तालुक्यातील राजकारण आणि ओळखी यांचा फायदा आपल्या मातीसाठी केला पाहिजे ही तळमळ त्यांच्या उरी होती. म्हणून वयाच्या विसाव्या वर्षी विकासराव ग्रामपंचायतमध्ये गेले. सरपंच ते सदस्य असा २० वर्षीचा दिर्घकाळ त्यांनी गावासाठी खर्ची केला. आपण हिवरे बाजार, राळेगणसिद्धी आणि पाटोदा यांची उदाहरणे देतो. मात्र, कोणीतरी आमचे ढोकरी गाव सुद्धा येऊन पाहिले पाहिजे. प्रसिद्ध मिळाली असती तर देशाने आदर्श घ्यावा असे काम विकासरावांनी केले आहे. असे म्हणतात, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले.! विकास बोलला माझ्या नावाला मी सार्थकी लावेल आणि त्याने तसे केले सुद्धा. एक आदर्श आणि सधन गाव निर्माण झालेे. आमच्या गावाला पन्नासहून अधिक पुरस्कार मिळविले आहेत. म्हणून ढोकरी गावचे प्रतिबिंब म्हणजे विकास असे म्हणताना कदाचित व्यक्तीद्वेष असणार्‍यांची जीभ थरथरेल. मात्र, गावातील सुज्ञ नागरिकांची मुळीच नाही.!! 

गाव तसा गट आणि गण म्हणून जनतेला विकास हवा होता. म्हणून देवठाण गटातील हजारो तरुणांनी विकासरावांना डोक्यावर घेतलं. तरुणच नव्हे.! तर फेट्यावाला देखील विकासरावाचा जीवलग मित्र झाला. नेतृत्व असावे तर असे, ज्याचा जगाला हेवा वाटला पाहिजे. अगदी तसेच नेतृत्व लोक यांच्यात शोधत होते. मात्र, निवडणुका आल्या. की, त्यांच्या हातातोंडाशी आलेली संधी अगदी जवळचेच लोक काढून घेत होते. आपलेच दात अन आपलेच ओठ.! कारण, काय? म्हणून सातत्याने या तरुणाला टाळले गेले. मात्र, संयम हा फार बलवान असतो. त्यामुळे, त्यांनी कधी बंडाचे निशाण हाती घेतले नाही. त्यानंतर त्यांना सहकारात संधी मिळाली. विकासराव अगस्ति सहकारी साखर कारखान्याचे संचालक झाले. मात्र, देवठाण गटातील लोकांना ते फारसे साजेसे वाटत नाही. आजही त्यांनी संधी आल्यास देवठाण गटाचे प्रतिनिधित्व करावे अशी वारंवार इच्छा व्यक्त केली जात आहे. विकासराव व्यक्तीगत जिवनात शिक्षण, आरोग्य या गोष्टींना प्राधान्य देतात. प्रसंग कोणताही असो.! कुणी आडल-नडल तर विकासराव मदतीला हजर असतात. कोरोना काळात तर त्यांनी अनेक गरजवंताना आपल्या परीने योगदान दिले आहे. समाजकारण आणि राजकारण करताना ते कुणाचाही द्वेष करत नाही किंवा कुणाला कमीही समजत नाही. सर्वगुणसंपन्न व्यक्तीमत्व आणि सर्वांस पोटास लावणे आहे. या छत्रपती शिवरायांच्या वचन नाम्याप्रमाणे वागल्याने त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे, त्यांना माननारा वर्ग देखील मोठा आहे. 

सहकार महर्षी सिताराम पाटील गायकर साहेब यांचे व त्यांचे कौंटुबिक ऋणानुबंध अगदी सर्वश्रुत आहे. राजकारणी वक्ता म्हणून त्यांचेकडे प्रभावी भाषणाची कला आहे. तर, समाजकारणी म्हणून अंगी फार संवेदनशिलता आहे. राजकारणात ज्या गोष्टी आवश्यक असतात अशा सर्व प्रकारच्या गोष्टींनी ते परिपुर्ण आहे. धर्म, रूढी, परंपरा यांचे जतन करुन त्यांचे संवर्धन करा.! परंतु हे करताना अंधश्रद्धा निर्मूलनही करावे असा त्यांचा आग्रह असतो. थोडक्यात सांगायचे झाले तर जर चांगली संधी मिळाली असती तर या देशाचे सर्वेच्च पद देखील अगदी सक्षमपणे पेलण्याचे सामर्थ्य आमच्या ढोकरी गावच्या ढाण्या वाघात आहे. मात्र, योग्यती संधी न मिळाल्याने ते आज सहकारात कर्तबगार हरहुन्नरी संचालक म्हणून तरी ते कार्यरत आहे यात देखील ते स्वत:ला समाधानी मानतात. आज जगाला शांततेचा संदेश देणारा येशू ख्रिस्त, भारतरत्न माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि रामदास आठवले अशा महान व्यक्तींचा जन्मदिन आहे. त्याच दिवशी विकासराव देखील जन्माला आले आहेत. हे त्यांचे महतभाग्य आहे. इतकीच उंची त्यांना लाभो हीच इच्छा मी व्यक्त करतो.

लेखन व शब्दांकन - कवी ज्ञानेश पुंडे ढोकरी