त्या अधिक्षकांवर गुन्हा दाखल आणि निलंबन सुद्धा.! विद्यार्थ्यांना जळत्या लाकडाने मारहाण करणे महागात पडले.! आता बडतर्फ.!
अकोले तालुक्यातील शिरपुंजे येथील आदिवासी वसतीगृहावर एका अधिक्षकाने सहा विद्यार्थ्यांना जळत्या लाकडांनी मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर हा प्रकार राज्यभर गाजला आणि त्यावर आमदार डॉ. किरण लहामटे यांच्यासह काही संघटांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. त्याची दखल घेऊन आदिवासी विभागाचे अप्पर आयुक्त संदिप गोलाईत यांनी संबंधित अधिक्षक अश्वीनकुमार अर्जुनराव पाईक याला निलंबित केले आहे. तर, त्याला मुख्यालय सोडून जाता येणार नाही आणि अन्य दुसरे काम सुद्ध करता येणार नाही अशा प्रकारचे आदेश काढले असून येणार्या काळात त्याच्यावर बडतर्फीची देखील कारवाई होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, विद्यार्थ्यांवर हकनाक तावतुगारी करणार्या शिक्षक, शिपाई आणि अधिक्षक यांना चाप बसणार आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि.३ डिसेंबर २०२२ रोजी सायंकाळी शिरपुंजे आश्रमशाळेत मुलांनी काही कचरा जमा केला होता. थंडीचे दिवस असल्यामुळे तो मुलांनी पेटविला. हा प्रकार तेथील अधिक्षक अश्वीनकुमार अर्जुनराव पाईक याने पाहिले व तेथे जी काही लाकडे जळत होती ती उचलली आणि थेट मुलांना मारहाण करण्यास सुरूवात केली. तेथे असणारी सहा मुले घाबरुन गेले आणि ते पळत सुटले. काही पाल्यांनी आपल्या पालकाशी संपर्क केला आणि घडला प्रकार त्यांना सांगितला. त्यानंतर पालकांनी मुलांना राजुर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते.
अधिक्षकावर गुन्हा सुद्धा दाखल.!
दि.३ डिसेंबर २०२२ रोजी सायंकाळी शिरपुंजे आश्रमशाळेत मुलांना लाकडी दांड्याने मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर, मुलांच्या आंगावर वळ उठले होते. पालकांनी मुलांना राजुर रुग्णालयात दाखल केले होते. २४ तास उलटून देखील रूग्णालयातील डॉक्टरांनी पोलीस ठाण्यात साधी एमएलसी सुद्धा दाखल केली नव्हती. यावर रोखठोक सार्वभौमने निर्भिडपणे लिखाण केले होते. त्यानंतर दुसर्या दिवशी सायंकाळी ५ वाजता राजुर पोलीस ठाण्यात एमएलसी दाखल झाली आणि भाऊ शिवराम धादवड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अधिक्षक अश्वीनकुमार अर्जुनराव पाईकराव याच्यावर राजूर पोलीस ठाण्यात गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता निलंबन, गुन्हा आणि नंतर बडतर्फी अशा कठोर कारवाया झाल्या तर येणार्या काळात हकनाक कोणी विद्यार्थ्यांवर अन्याय करण्याची धाडस करणार नाही.
मी असे खपवून घेणार नाही.!
विद्यार्थी आदिवासी असो वा तालुक्यातील कोणताही विद्यार्थी असो. त्याच्यावर अशा पद्धतीने हात उचलणे चुक आहे. माझ्या काळात तरी मी असे कृत्य सहन करुन घेणार नाही. यापुर्वी कोणी काय केले हे सगळ्यांना माहित आहे. त्यावर मला काही बोलयचे नाही. मात्र, यानंतर अशा पद्धतीच्या कृत्यांना मी पाठीशी घालणार नाही. आज एका व्यक्तीला कायदेशिर शिक्षा झाली आहे. त्यासाठी मी स्वत: अधिकार्यांशी बोललो होतो. तसेच आजवर मी अनेक आश्रमशाळांना भेटी दिल्या आहेत. तेथे काही ठिकाणी चांगली गुणवत्ता आहे तर काही ठिकाणी प्रचंड बिकट परिस्थिती दिसते आहे. जेवणा संदर्भात तर अनेक तक्रारी येतात. त्यासाठी देखील अधिकार्यांशी बोलुन मार्ग काढण्याचे आदेश दिले आहेत.
- डॉ. किरण लहामटे (विधानसभा सदस्य)
आश्रमशाळांचे तुरूंग व शिक्षक जेेलर.!
शासन आदिवासी मुलांसाठी कोट्यावधी रुपयांचा खर्च करत असते. मात्र, दुर्दैवाने त्यांची उन्नती झाल्याचे दिसत नाही. प्रकल्प कार्यालयाकडे अधिकारी आणि शिक्षक हे देखील केवळ एक अर्थिक उत्पन्नाचा सोर्स म्हणून पाहतात. तर, बहुतांशी लोक फक्त पाट्या टाकण्याचे काम करीत आहे. विद्यार्थी हे केवळ तुरूंगात टाकल्यासारखे असून शिक्षक हे जेलरची भुमिका घेताना दिसत आहेत. आश्रमशाळा या कोंडवाडे झाले असून मुलांचे आरोग्य, शिक्षण याकडे पुर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. आदिवासी बाधव हे सुशिक्षित नसल्यामुळे त्याचा फायदा सगळेच घेताना दिसत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या हेतुने ज्या सुविधा देण्याचा प्रयत्न केला. त्याची प्रॉपर आंमलबजावणी देखील यांना करता येत नाही. हेच सर्वात मोठे दुर्दैव आहे. डॉ. किरण लहामटे हे याकडे गांभिर्याने पाहतील अशी आम्हाला आशा आहे.
- विजय वाकचौरे (राज्यसचिव रिपाई)