संगमनेरात वेश्या व्यवसायावर छापा, दोन तरुणी ताब्यात भाबीला अटक.! लॉजवर विद्यार्थीनी.! अकोल्यात तरुणींची आयात.!

     

सार्वभौम (संगमनेर) :- 

                  संगमनेर तालुक्यातील घारगाव परिसरात पोखरी बाळेश्‍वर येथे चालु असणार्‍या हाय प्रोफाईल वेश्या व्यावसायावर श्रीरामपूर पोलीस उपाधिक्षक संदिप मिटके यांनी छापा टाकला. यात दोन तरुणींची सुटका करण्यात आली असून हा व्यावसाय थाटणार्‍या एका महिलेस पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ताब्यात घेतलेल्या दोन्ही मुलीस परप्रांतीय असून त्यांना त्यांच्या इच्छुक स्थळी सोडविण्यात येणार आहे. ही कारवाई बुधवार दि. ७ डिसेंबर २०२२ रोजी सायंकाळच्या सुमारास करण्यात आली. यापुर्वी संदिप मिटके यांनी संगमनेर शहरात कत्तलखान्यावर छापा टाकला होता. त्यात १ कोटी ५० लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला होता. त्यानंतर येथे प्रचंड मोठे भगवे वादळ निर्माण झाले होते. त्यामुळे, येणार्‍या काळात संगमनेरात अधिक मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी घाटच्या दरम्यान एक कच्च्या रस्त्याने पोखरी परिसरात एक रस्ता जातो. तेथे काही मिटर पुढे गेल्यानंतर एका पत्र्याच्या शेडमध्ये एक महिला हा उद्योग करत होती. पुर्वी एका तरुणीला हाताशी धरुन हा व्यावसाय सुरू करण्यात आला होता. नाममात्र शुल्क घेऊन त्या परिसरात असणार्‍या काही व्यक्तींना नादाला लावण्यात आले. कालांतराने येथे दोन तरुणी आणि नंतर चार तरुणी अशा पद्धतीने वेश्या व्यावसायात वाढ झाली. या गोष्टीची बोटा, घारगाव, चंदनापुरी, साकुर आणि संगमनेर शहरात चांगलीच चर्चा होऊ लागल्याने तेथे ग्राहकांची संख्या वाटत चालली होती.

दरम्यान, चंदनापुरी घाट हा दिवसेंदिवस रेड लाईट एरिया म्हणून पुढे येऊ लागला होता. कारण, परराज्यातील मोठी वाहणे आणि अन्य प्रवाशी यांना चंदनापुरी घाटात रात्री लाल लाईट लावून भुरळ टाकली जात होती. मात्र, नंतरच्या काळात येथे स्थानिक ग्राहक मोठ्या प्रमाणावर झाले आणि विशेेष म्हणजे रात्रीच्या वेळी येथे काही पुढारी देखील येत असल्याची माहिती हाती आली होती. त्यामुळे, दोन तरुणी कायम आणि पुढार्‍यांसाठी बाहेरुन काही व्यवस्था आणल्या जात होत्या. यातील विशेष म्हणजे व्यावसाय करणारी महिला काही तरुणींना बाहेर देखील पाठवत असल्याची माहिती पुढे येऊ लागली आहे. तर या ठिकाणी अनेक पुरुषांची लुटमार देखील झाली आहे. मात्र, करणार काय? झाकली मुठ सव्वा लाखाची..!! मात्र, हा प्रकार जेव्हा पोलीस अधिक्षक राकेश ओला यांच्या कानावर गेला. त्यानंतर त्यांनी विश्‍वासू म्हणून संदिप मिटके यांना संबंधित ठिकाणी छापा टाकायला सांगितला. त्यानंतर अप्पर पोलीस अधिक्षक स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली मिटके यांच्या पथकातील अरुण आव्हाड, ज्ञानेश्‍वर थोरात, पोलीस कर्मचारी मनोज पाटील, नितीन शिरसाठ, मंगल जाधव या पथकाने ही कारवाई केली.

आता संगमनेर शहरात नवघर गल्ली, शहरातील मेन रोडवर एका राहत्या घरात, बस स्थानक परिसरात, वडगाव पान, तळेगाव अशा अनेक ठिकाणी वेश्या व्यावसाय सुरू असल्याची चर्चा आहे. असे अनेक लॉज आहेत जेथे चक्क शालेय आणि कॉलेजच्या विद्यार्थीनी राजरोस येतात. तरी देखील लॉज चालक त्यांच्याकडून ओळखपत्र घेत नाहीत. तर, उलट तासाच्या हिशोबाने जास्तीत जास्त पैसे घेऊन अगदी अल्पवयीन मुलींचा आयुष्य तेथे उध्वस्त केले जात आहे. अर्थातच हे कोणाच्या आशिर्वादाने? तर अनेक ठिकाणचे मलिदे वर्दीला पोहच होत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे, संगमनेर शहर एकीकडे चांगले वाटत असेल तरी येथे अंतर्गत अनेक अवैध धंदे सुरु आहेत.

तर, अकोले तालुक्यात देखील असे काही लॉज आहेत. तेथे आठवड्यातून काही ठराविक दिवशी तरुणी आणल्या जातात. त्यापुर्वी काही तरुण मुले आणि राजकीय व्यक्ती व कार्यकर्ते ग्राहक म्हणून तयार केले जातात. गेल्या काही दिवसांपुर्वी गुरूवारच्या दिवशी भर दुपारी हा व्यावसाय चालु होता. सायंकाळी या तरुणी निघुण जात असे. मात्र, आता रात्री अपरात्री हा उद्योग सुरू असून प्रचंड गोपनिय पद्धतीने अकोल्यात देखील वेश्या व्यावसाय सुरू असून काही ठिकाणी बाहेरुन पार्सल आणले जाते. त्यामुळे, आता अकोल्यात देखील येणार्‍या काळात छापा पडण्याची शक्यता आहे. तर, संगमनेरात एका नगरात पोलिसांनी वेश्या व्यावसाय करणार्‍या दोन महिलांना ताब्यात घेतले होते. मात्र, त्या घटनेचे मुळ न शोधता दोन्ही महिलांना सोडून देण्यात आल्याचे बोलले जात आहे. तसेच काही पार्लरमध्ये देखील काय उद्योग चालतात याची चौकशी पोलिसांनी करणे गरजेचे आहे.

तर काल हैदराबाद पोलिसांनी धडक कारवाई करत सेक्स रॅकेट चालविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे या आरोपींनी आतापर्यंत जवळपास 14 हजाराच्या वर महिला आणि मुलींना या व्यवसायात आणले होते. अटक करण्यात आलेल्या आरोपींविरोधात सायबराबाद आणि हैदराबादच्या हद्दीत ३९ वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. हैदराबाद पोलिसांनी १८ आरोपींना वेगवेगळ्या राज्यांतून अटक केली आहे. आरोपींनी आंध्रप्रदेश, तेलंगाणा, कर्नाटक, दिल्ली, मुंबई, कोलकाता, आसाम या राज्यांसह बांगलादेश, नेपाळ, थायलंड, उझबेकिस्तान, रशिया या देशांमधूनही मुली, महिलांची तस्करी केली आहे. आरोपी महिलांची वेबसाईटच्या माध्यमातून जाहिरात करायचे. तसेच कॉल सेंटर, व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून ते ग्राहकांशी संपर्क साधायचे. हैदराबाद आणि सायबराबाद या भागातील तस्करीच्या जवळपास ७० टक्के गुन्ह्यांत अटक करण्यात आलेले आरोपी सामील आहेत, असा पोलिसांचा अंदाज आहे. महिलांना देहविक्री व्यवसायात ढकलण्यासाठी आरोपी दिल्ली, बंगळुरू, हैदरबाद येथून एक कॉल सेंटरही चालवायचे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या आरोपींनी आतापर्यंत १४ हजार १९० महिला आणि तरुणींची तस्करी करून त्यांना देहविक्री व्यवसायात ढकलले आहे. त्यासाठी महिलांना आलिशान जीवनशैली, सहज मिळणारे पैसे, नोकरी यांचे आमिष दाखवले जायचे. पोलीस या प्रकरणात अटक केलेल्या १८ आरोपींची चौकशी करत आहेत.