आ.डॉ.लहामटेंकडे राज्यातील आदिवासींचे नेतृत्व.! भाजपाचे आमदार देखील संपर्कात.! तेव्हा कोठे जाते भाजपाची माणुसकी?

    


- सागर शिंदे

सार्वभौम (अकोले) :-

राज्यात नव्हे, देशात आजही आदिवासी बांधवांना न्यायापासून वंचित रहावे लागत आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी एसटी बांधवांना आरक्षणापासून ते ज्या-ज्या सेवा सुविधा दिल्या आहेत. त्यांची प्रॉपर अंमलबजावणी भाजपा सरकार करीत नाही. तर, आदिवासीच नव्हे, तर सगळ्यांच्या आरक्षणावर गंडांतर आणण्याचे काम मिंधे सरकार आणू पहात आहे. खरंतर, बोगस आदिवासी व्यक्तींच्या नोकर्‍या रद्द करून जे खरोखर आदिवासी आहेत, त्यांना नोकर्‍या देण्याचे आदेश न्यायालयाचे आहेत. मात्र, हे शिंदे फडणविस सरकार उलट बोगस आदिवासी व्यक्तींना पाठीशी घालत असून त्यांनाच नोकरीत कायम करीत आहे. का? तर म्हणजे आम्ही माणुसकी म्हणून विचार करत आहोत. मग, आजही आदिवासी भागात पिण्यासाठी पाणी नाही, आरोग्याच्या सेवा नाहीत, चांगले शिक्षण नाही. संविधानात हे सर्व अधिकार देऊन सुद्धा त्याची अंमलबजावणी होत नाही. मग तेव्हा तुमची माणुसकी जागी होत नाही का? असा थेट सवाल अकोले तालुक्याचे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी केला आहे. नुकतेच आमदार होऊन त्यांना तीन वर्षे झाली आहेत. मात्र, हिवाळी आधिवेशनात त्यांनी राज्यातील आदिवासी बांधवांचे नेतृत्व केल्याचे पहायला मिळाले. त्यामुळे, अकोले तालुक्यातील जनतेने आनंद व्यक्त केला आहे.


भारतीय संविधान निर्माण करताना जातीनिहाय प्रत्येक समाजाचा एक प्रतिनिधी असल्याचे आपल्या लक्षात येते. मात्र, संबंध दलित समाजाचे प्रतिनिधीत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले आणि सर्वात जास्त न्याय कोणाला दिला असेल तर तो आदिवासी बांधवांना दिला आहे. कारण, जंगलातून बाहेर पडून यांनी शिकावं, संघटीत व्हावं आणि न्यायी हक्कांसाठी यांनी संघर्ष करावा म्हणून आरक्षणाची पाहिली पायरी ही आदिवासी बांधवांची बांधली आहे. तेव्हाकोठे आज माझे उपेक्षित आदिवासी आज बर्‍यापैकी समाजाच्या मुळ प्रवाहात दिसत आहे. सुदैवाने बाबासाहेब होते म्हणून जगणे आणि मरणे सुद्धा सुलभ झाले. अन्यथा आज कायदा असून, सेवा सुविधा असून आणि जगण्याचा अधिकार असून सुद्धा सरकार आदिवासी बांधवांकडे लक्ष देत नाही. आम्ही देतो म्हणजे उपकार करतो अशा भावना व्यक्त करतात. म्हणून आम्हाला स्वातंत्र्य मिळाला खरे.! मात्र, येथील मानसांच्या मनातील गुलामी अद्याप कायम असल्याच्या भावान डॉ. लहामटे यांनी सार्वभौमशी बोलताना व्यक्त केल्या. 

वास्तवत: जे मुळ आदिवासी आहेत, त्यांना समाजाच्या मुळ प्रवाहात आणण्यासाठी संविधानात विविध तरतुदी आहेत. त्यांना शिक्षण देणे, हाताला काम देणे, आरोग्य संभाळणे, प्रतिनिधित्व देणे, त्यांच्या हक्कांचे संरक्षण करणे, त्यांना नोकरी देणे ही कामे करण्यापेक्षा हे शिंदे फडणविस सरकार बेकादेशीर दाखले जमा करुन बनावट आदिवासी बांधवांना संरक्षण देण्याचे काम करीत आहेत. बिगर आदिवासी लोकांना आदिवासींच्या जागी नोकरी देत आहेत. का? तर म्हणे आम्ही त्यांना नोकरीतून काढून टाकू शकत नाही. आम्ही त्यांच्याकडे मानवतेच्या दृष्टीकोणातून पाहतो आहे. खरंतर माणुसकी नक्की असावी. पण, खोटं नाटं करुन दुसर्‍याच्या जागा बळकावून एखाद्याला वंचित ठेऊन जर कोणी सरकार आणि शासनाची फसवणुक करीत असेल. तर, त्याच्याबाबत सहानुभूती कशासाठी? उलट यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजे. नोकरीसाठी जी काही रक्कम पगारापोटी घेतली आहे, ती वसुल केली पाहिजे. त्या नोकरीच्या जागेवर खर्‍या आदिवासी बांधवांना रोजगार दिला पाहिजे. तर खर्‍या अर्थाने आदिवासींचे संवर्धन होईल. अन्यथा बनावट मानसे उभी करून पहिल्यांदा आरक्षण नष्ट करण्याचा डाव सुरू आहे, आणि जंगलातले लोक जंगलातच राहिले पाहिजे, त्यांना कायम वंचित ठेवण्याचे हे षडयंत्र आहे. मात्र, हे आम्ही खपवून घेणार नाही.

भाजपा आमदारांचा आम्हाला पाठींबा.! 

आदिवासींच्या प्रश्‍नासाठी कोणत्याही प्रकारचा पक्षभेद नाही. हिवाळी आधिवेशनात अनेक प्रश्‍न आम्ही मांडले. त्यापुर्वी याच प्रश्‍नांच्या संदर्भात भाजपाचे काही आमदार आमच्या सोबत आहे.काही झालं तरी आदिवासी बांधवांच्या प्रश्‍नांना आमचा पाठींबा आहे. मात्र, सत्ताधिरी म्हणून काही बंधने येतात त्यामुळे, ते सोबत नसले तरी ते संपर्कत असल्याचे आ.लहामटे म्हणाले. वेळ पडली तर राज्यात नव्हे संसदेवर मोर्चा काढण्याची वेळ आली तर काढू. इतकेच काय.! आदिवासी बांधवांच्या न्यायी हक्कासाठी मला स्वत:ला राजिनामा देण्याची वेळ आली तरी मी तो हसत देईल. मात्र, आता माझ्यासारखे उच्च शिक्षित आमदार अन्याय सहन करुन घेणार नाही. खरंतर, शरदचंद्र पवार साहेबांनी आदिवासी समाजाला राज्यात फार मोठी संधी दिली होती. त्यांनी सामाजासाठी काय केले त्या खोलात मी जाणार नाही. मात्र, आता मला काम करण्याची संधी दिली आहे. तर, त्याचे सोने करुन दाखविल्याशिवाय राहणार नाही. मी केवळ अकोले तालुक्यातील आदिवासी बांधवांचा नव्हे.! तर संबंध राज्यातील आणि देशातील बांधवांचा विचार करतो आहे.

असा आमदार होणे नाही.! 

डॉ. किरण लहामटे यांच्यासारखा आमदार तालुक्याला लाभला हे आपले भाग्य आहे. २४ तास जनतेसाठी पळणारा आमदार आपण कधी पाहिला नाही. त्यांना आता राज्यातील आदिवासी नेत्यांनी नेतृत्व करण्याची संधी दिली ही अकोले तालुक्यासाठी भुषणाची गोष्ट आहे. येणार्‍या काळात राष्ट्रवादी पक्ष त्यांना अधिक बळ देऊन नवं नेतृत्व उभे करेल अशी तालुक्याला आशा आहे. खरंतर, डॉ. लहामटे साहेब यांची केवळ आदिवासी समाजातच नव्हे. तर, अन्य समाजात देखील क्रेझ वाढत चालली आहे. राज्यात सत्ता असताना त्यांनी पाचशे कोटी रुपयांचा निधी तालुक्यासाठी आणला आहे. तर, सत्ता नसताना देखील बाकी व्यक्तींप्रमाणे रडत न बसता कामे मंजुर करुन आणण्याची कसब त्यांच्यात आहे. त्यामुळे, असे कर्तुत्वान व कार्यक्षम नेतृत्व तालुक्याला लाभले याचा आनंद असला तरी आदिवासी बांधवांना जल, जंगल, जमीन मिळवून देत मुलभूत सेवा सुविधा मिळवून देण्यासाठी अशा आमदारांची गरज आहे.

- विकासराव शेटे (संचालक-अगस्ति कारखाना)