संगमनेरात 26 ग्रामपंचायती आ.थोरातांकडे तर 9 ना. विखेंकडे, अकोल्यात 8 डॉ. लहामटेंकडे तर 2 पिचडांकडे.! थोरातांचा स्वत:चा जोर्वे गड आला पण सिंह गेला.!
- सुशांत पावसे
सार्वभौम (संगमनेर) :-
संगमनेर तालुक्यातील 37 ग्रामपंचायतींच्या निवडणूका जाहीर झाल्या आणि राजकीय आखाड्यात कोण बाजी मारते याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. यामध्ये दोन सरपंच बिनविरोध झाले होते तर 35 ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले होते. त्यात दहा ग्रामपंचायत ना. विखे विरुद्ध आ. थोरात अशी लढत पाहायला मिळाली. ना. विखेंच्या गटाने मागील ग्रामपंचायतींचा वचपा काढत बाजी मारली आहे. विखे गटाने दहा ग्रामपंचायती पैकी सहा ग्रामपंचायतींवर मुसंडी मारली आहे. तर निमगाव जाळीवर थोरात साहेबांनी वर्चस्व प्रस्थापित केले आहे. माजी महसुलमंत्री आ. बाळासाहेब थोरात साहेब व विद्यमान महसुल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात जोर्वे ग्रामपंचायत अगदी प्रतिष्ठेची बनली होती, याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. मात्र, जोर्वे ग्रामपंचायतवर ना. विखेंनी सरपंचपदाची बाजी मारून आ. थोरतांना मोठा धक्का दिला आहे. तर सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या घुलेवाडीवर सरपंच पदाला आ.थोरात गटाचा पराभव करून अपक्ष निर्मला राऊत यांनी बाजी मारली आहे. आता ही निवडणूक फक्त ग्रामपंचायतची नव्हती तर ती आ.थोरात व ना. विखेंच्या राजकीय अस्तित्वाची देखील असल्याचे बोलले जात होते. आता या निवडणुकीचा परिणाम येणाऱ्या जिल्हापरिषद पंचायत समितीवर होण्याची शक्यता आहे. भाजपाच्या आदेशाने सरपंच पद जनतेतुन आले तरी देखील भाजपचा संगमनेरात पराभव पहायला मिळाला. इतकेच काय ! भाजपाला दोन गावांमध्ये सरपंच पदासाठी उमेदवार देखील मिळाले नाही. तर संगमनेर मतदारसंघातील ग्रामपंचायतींमध्ये भाजपाला जनतेने नाकारले हे देखील विसरून चालणार नाही. त्यामुळे, स्थानिक भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी आत्मपरीक्षण गरजेचे आहे. संगमनेरात आ. थोरात यांचे 26 ग्रामपंचायतींवर निर्विवाद वर्चस्व मिळाल्याचे विश्लेषकांनी मत नोंदविले आहे.
खरंतर, शिर्डी विधानसभेला जोडल्या जाणाऱ्या दहा ग्रामपंचायतींची निवडणुक होती तिथे ना. विखेंना सहा तर आ. थोरतांचे चार ग्रामपंचायतींवर वर्चस्व आहे. साकुरमध्ये ज्येष्ठ नेते बाजीराव पाटील खेमनर यांच्या मुलाने विखेगटाकडे हात मिळवणी करून साकुर ग्रामपंचायत प्रतिष्टेची बनवली खरी. पण, थोरात गटाचे नेते इंद्रजीत खेमनर व शंकर खेमनर यांच्यापुढे विखे गटाचा ठाव ठिकाणा लागला नाही. त्यांचा अवघा एकच सदस्य निवडून आला, बाकी सरपंचासह सर्व आ. थोरात गटाचे वर्चस्व अबाधित राहिले. मात्र, तळेगाव सारख्या मोठ्या ग्रामपंचायतवर ना. विखेंनी वर्चस्व मिळवल्याने सर्वांच्या भवया उंचावल्या आहे. तळेगावच्या जनतेने बिल्डर लॉबीला नाकारले आहे. तेथील जिल्हा परिषद सदस्य हे फक्त आ. थोरात साहेबांचा कार्यक्रम असला की, चेहरा दाखवतात इतरवेळेस गावातुन पाय काढतात असा आरोप होत होता. म्हणूनच हा पराभव झाल्याचे जाणकारांचे मत आहे. निमोणमध्ये ज्या संदिप देशमुखांचे सुप्रीम कोर्टापर्यंत तक्रारी करून त्यांचे सरपंच पद खारीज करूनही त्यांना आज पुन्हा जनतेने निवडुन दिले आहे. तेथे आ. थोरतांच्या कार्यकर्त्यांना पुन्हा अपयश आले आहे. निमोणमध्ये सांगळे, चकोर यांसारखे दिगग्ज नेते आ. थोरातांकडे आहे मग आपण कुठे कमी पडलो याचे आत्मपरीक्षण आ. थोरात गटाला करावा लागणार आहे. जिथे पुर्वी सदस्य नव्हता तिथे विखे गटाचे वर्चस्व आता पहायला मिळत आहे. मात्र, स्थानिक नेते थेट ना. विखेंच्या संपर्कात आहे. यामुळे हे सर्व शक्य झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे, याचे श्रेय भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना न जाता हे सर्व श्रेय ना. विखेंचे आहे असे राजकीय जाणकारांचे मत आहे. पण, भाजपाच्या 26 ग्रामपंचायतींमध्ये दारुण पराभव झाला हे देखील नाकारून चालणार नाही.
दरम्यान, जिल्हा नियोजन समितीचा निधी घेण्यासाठी संगमनेरात ना.विखेंच्या कार्यलयात आ. थोरात यांच्या सरपंचाची गर्दी होत आहे. गावातील ठराव घेऊन निधी मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळेच आजचा काही धक्कादायक निकाल असल्याचे बोलले जात आहे. असेच पुढे चालु राहिल्यास आ. थोरातांना जिल्हा परिषद व पंचायत समितीला धक्का बसु शकतो असे मत राजकीय जाणकारांचे आहे. ठेकेदार पद्धतीला बदलुन जनतेत राहणाऱ्या कार्यकर्त्याला संधी मिळावी अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगु लागली आहे. गब्बरसिंग ठेकेदारांना 765 कोटींचा दंड सामन्याचे मत परिवर्तन करून गेले आहे. कारण, सर्वाधिक खानपट्टे धारक याच भागातील असल्याने हे परिवर्तन झाल्याचे निदर्शनास आले आहे. तर शिंदेगट, राष्ट्रवादी, शिवसेना यांना एकाही ग्रामपंचायतीतील सरपंच पदावर साधे खाते ही उघडता आले नाही. हे पक्ष संगमनेरात औषधापुरते का होईना शिल्लक राहिल की नाही.? अशी चर्चा संगमनेरातील जनतेत रंगु लागली आहे.
37 ग्रामपंचायतींचे सरपंच
वाघापूर - स्मिता नानासाहेब शिंदे (थोरात गट)
खराडी- ज्योती बाळासाहेब पवार (थोरात गट)
चिंचोली गुरव - विलास रामराव सोनवणे (थोरात गट)
जांभूळवाडी - शांताबाई अण्णासाहेब कुदनर (थोरात गट)
रणखांब- बाबाजी मल्हारी गुळवे (थोरात गट)
दरेवाडी - आनंदा रावसाहेब दुर्गुडे(थोरात गट)
सायखिंडी - निलम अमोल पारधी(थोरात गट)
जांबूत बुद्रूक - सोनाली रमेश शेटे (थोरात गट)
कर्जुले पठार - रोहिणी वाल्मीक भागवत (थोरात गट)
डोळासने- मंगल बाळासाहेब काकड (बिनविरोध) (थोरात गट)
पिंपरणे - नारायण सीताराम मरभळ (थोरात गट)
कोल्हेवाडी - सुवर्णा राहुल दिघे (विखे गट)
अंभोरे - सुरेखा भाऊसाहेब खेमनर (थोरात गट)
कोळवाडे - पुष्पा योगेश गुंजाळ (थोरात गट)
निंभाळे - भागीरथीबाई माधव काठे (विखे गट)
जोर्वे - प्रीती गोकुळ दिघे (विखे गट)
वडझरी बु!- संध्या संदीप गोर्डे (थोरात गट)
वडझरी खु!- पांडुरंग कारभारी सुपेकर (थोरात गट)
निमोन - संदीप भास्कर देशमुख (विखे गट)
करुले - बाळासाहेब रावसाहेब आहेर (थोरात गट)
निळवंडे - शशिकला शिवाजी पवार (अपक्ष)
हांगेवाडी - कमल राजेंद्र कांगणे (थोरात गट)
कणकापुर - ज्योती अंकुश पचपिंड ( विखे गट)
ओझर खु! - गिरिजा अण्णासाहेब साबळे (थोरात गट)
सादतपुर - नारायण निवृत्ती गुंजाळ (विखे गट)
रहिमपुर - सविता लक्ष्मण शिंदे (विखे गट)
उंबरी बाळापूर - अर्चना सुभाष भुसाळ (थोरात गट)
निमगाव जाळी - प्रतिभा सोमनाथ जोंधळे (थोरात गट)
चिकणी - गायत्री सुरेश माळी (थोरात गट)
धांदरफळ खु!- लता भास्कर खताळ (थोरात गट)
धांदरफळ बु! - उज्वला नवनाथ देशमाने (थोरात गट)
तळेगाव दिघे - उषा रमेश दिघे (विखे गट)
साकुर - सचिन दिनकर सोनवणे (थोरात गट)
निमगाव भोजापुर - ज्योती मछिंद्र कडलग (थोरात गट)
घुलेवाडी - निर्मला कैलास राऊत (अपक्ष)
पोखरी हवेली - सुदाम खैरे (थोरात गट)
मालुंजे - सुवर्णा संदीप घुगे (विखे गट)
""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
- शंकर संगारे
अकोले तालुका निवडणुक...
अकोले तालुक्यातील ११ ग्रामपंचायतीच्या ११ सरपंच व ५० ग्रा.प.सदस निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. यात :- वाकी :- राजाराम भगवंता झडे (सरपंच) २८८ मते, ग्रा.प. सदस्य:- रोहिदास रघुनाथ हिलम ९३मते, सुशीला श्रावणा झोले.१११मते, रंजना रामनाथ वैराळ, (बिनविरोध), जनार्धन अशोक भोजने १११, राम सखाराम सगभोर १३२, सीमा राम सगभोर १४७, सोमलवाडी :- सरपंच- पार्वताबाई कोंडीराम गंभीरे (बिनविरोध) बिनविरोध सदस्य :- कृष्णा तुकाराम सारुक्ते, हिराबाई सखाराम सारुक्ते, चंद्रभागा रुपाजी कचरे, अंकुश निवृत्ती गोडे, फसाबाई सुनील गंभीरे, रामदास विठ्ठल गंभीरे, मीरा किसन गंभीरे, शिळवंडी :- सरपंच- उमाबाई ज्ञानेश्वर साबळे (बिनविरोध) बिनविरोध सदस्य- दीपक दशरथ साबळे, द्रोपदा कुंडलिक साबळे,मोहना धोंडीबा साबळे, रेश्मा गुलाब साबळे, सुमित्रा विजेंद्र साबळे, संतोष मारुती साबळे, अनिता उत्तम साबळे.
गुहिरे :- सरपंच- गजानन त्रिंबक कातडे २३१. ग्रा.प. सदस्य बिनविरोध -- सुनील महादू सारुक्ते, मंगल सुनील सारुक्ते, बारसाबाई अनिल सारुक्ते, कैलास हिरामण सोनवणे, वनिता काळू सोनवणे, छगन पोपट सोनवणे, चंद्राबाई एकनाथ सोनवणे. लहित खु :- सरपंच. अनिता किशोर गोडसे. ६६३ मते,ग्रा.प. सदस्य- राहुल रमेश गोडसे २६१, अनिता लक्ष्मण गोडसे २६२, सुरेखा कैलास गोडसे २५५, लालू दत्तू पिंपळे २०५, अर्जुन दत्तू गावडे २१४, लिलाबाई विश्वनाथ गोडसे २१५, भरत जगन्नाथ गोडसे २५०, इंद्रा विठ्ठल गावडे २३७, मीना अशोक गोडसे २४६, मुरशेत :- सरपंच- सखाराम मनोहर अस्वले २०२, ग्रा.प. सदस्य:- सोनू संतोष असवले ११८, स्वाती दीपक शिंदे (बिनविरोध), बारकाबाई तुळशीराम डगळे १०३, राजाराम देवजी अस्वले १२२, मीना अशोक डोळस १०१, संजय अशोक उभे (बिनविरोध), संगीता राजू बांगर (बिनविरोध)।
आभोळ :- सरपंच- सुशीला जिजाराम खोकले ९०० मते, ग्रा.प. सदस्य:- सिताराम सावळेराम लोकरे. ३७१, सुनील नाना साबळे ३७८, संगीता सखाराम मेमाणे (बिनविरोध), पांडुरंग त्रिंबक साबळे.३३३, सुनिता होनाजी वाजे (बिनविरोध), सविता भाऊ चौधरी (बिनविरोध), बाळू नामदेव भोजने २९३, आशा शरद भवारी (बिनविरोध), सुनिता रमेश साबळे (बिनविरोध), भंडारदरा :-सरपंच -- अनिता विनायक खाडे ३७० मते, ग्रा.प.सदस्य - योगेश किसन खाडे १०४, द्वारकाबाई वसन खाडे १३०, मीना हनुमंता खाडे १२४, गंगाराम भागा इदे १५७, बोराबाई गणपत खाडे .१४७ , सुगंधा विठ्ठल खाडे १४१, दीपक श्रावणा खाडे १४९, पोपट शंकर खाडे (बिनविरोध), कल्पना जैन खाडे १५३.
चास - सरपंच- सुरेखा रामदास शेळके ८३४, ग्रा.प. स्यदस- बाबुराव ज्ञानदेव वाडेकर ३२८, सुवर्णा मोहन पवार ३३५, सुनंदा गणपत शेळके ३८०, नंदा अंकुश खैरे २५५, सचिन मारुती शेळके २३६, इंद्रायणी किरण वाळके २२३, सुनील बबन शेळके ३०१, नंदिनी वैभव जाधव २९०, सविता संदीप शेळके ३००, डोगरगाव :- सरपंच - दशरथ माधव उगले.१२१६मते, ग्रा.प. सदस्य : हरिभाऊ निवृत्ती उगले १७४, उषा अविनाश चिकने. १८९, प्रतीक शंकर उगले ४५२, दशरथ दामोदर उगले.३८६, मनीषा सुरेश उगले ५०५, सुभाष सोमा पोपेरे ३१५, स्वाती माधव उगले ३६४, प्रीती बाळासाहेब शेळके ३५७, अमोल रंगनाथ उगले २४७, कांताबाई सुदाम माळी (बिनविरोध), आरती विशाल ओगले २७२ मते आहेत. यात वाकी आणि गुहिरे या दोनच ग्रामपंचायतींवर भाजपाचे सरपंच निवडून आले असून आठ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा झेंडा फडकला आहे.