छी.! डॉ. इथापे याचे सातवीच्या विद्यार्थीनीशी अश्‍लिल वर्तन.! गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात मोठी खळबळ.!

सार्वभौम (संगमनेर) :-

संगमनेर शहरातील गोल्डीन सिटी परिसरात असणार्‍या एका वसतिगृहात डॉ. इथापे याने इयत्ता सातवीत शिकणार्‍या एका विद्यार्थीनीसमोर अश्‍लिल हावभाव करुन लज्जा उत्पन्न होईल असे वाक्य उच्चारले. पीडित मुलीस त्या शब्दांनी प्रचंड मानसिक त्रास झाला म्हणून तिने आपल्या पालकाशी संपर्क साधला आणि घडलेला प्रकार कथन केला. ही घटना दि. २९ नोव्हेंबर २०२२ रोजी रात्री ८:३० वाजण्याच्या सुमारास घडला. पालक हे अकोले तालुक्यातील सुगाव खु येथील रहिवाशी असून त्यांनी संगमनेर गाठले आणि मुलीसह संगमनेर पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र, पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली असता एकलव्य संघटना पीडितेच्या मदतीला धावून आली. त्यांनी पोलीस अधिक्षक राकेश ओला यांना फोन करुन घडलेला प्रकार कथन केला असता मुलीस न्याय मिळाला. आता डॉ. इथापे व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित मुलीच्या पालकांनी फिर्यादीत म्हटले आहे की, पीडित मुलगी ही सुगाव खुर्द येथे राहण्यासाठी होती. मात्र, ती इयत्ता पाचवीचे शिक्षण घेण्यासाठी अकोल्याला जात होती. त्यामुळे, अकोले तिला शिकण्याच्या दृष्टीकोणातून फार दुर होते. मुलगी हुशार असल्यामुळे तिला शिकण्याची फार इच्छा होती. तिचे शिक्षण थांबायला नको म्हणून तिच्या पालकांनी तिला संगमनेर शहरातील एका शाळेत शिक्षणासाठी टाकले होते. काही पालक हे राहाता येथे असून देखील तिच्याकडे लक्ष ठेऊन होते. शाळा झाल्यानंतर पीडित मुलगी ही संगमनेर शहरातील गोल्डीन सिटी परिसरात असणार्‍या एका वसतिगृहात राहत होती.

दरम्यान, दि. दि. २९ नोव्हेंबर २०२२ रोजी रात्री ८:३० वाजण्याच्या सुमारास डॉ. इथापे याला बाहेर जायचे होते. त्यामुळे, वसतिगृहात असणार्‍या एका मॅडमने पीडित मुलीस गेट खोलण्यासा सांगितले होते. मात्र, इथापे हा बराच वेळ फोनवर बोलत बसल्याने मुलगी गेटजवळ कंटाळून गेली. म्हणून तिने तिच्या आणखी एका मैत्रीणीला बोलावून घेतले. दोघी तेथे उभ्या असताना डॉ. इथापे हा तेथे आला आणि म्हणाला. की, तुम्ही बाथरुम मध्ये जाऊन काय करतात? लघवीला कसे बसतात? आतून काय कपडे घालतात? उद्या नवर्‍याच्या घरी गेल्यानंतर काय करणार? तू चल माझ्या गाडीत बस असे म्हणून विचित्र हावभाव करु लागला. तेव्हा पीडित मुलगी घाबरुन गेली. तिला फार लाज वाटली.

दरम्यान, घडला प्रकार हा पीडित तरुणीने तेथे उपस्थित असणार्‍या एका महिला मॅडमला सांगितला. मात्र, तिने याकडे दुर्लक्ष करण्यास सांगितले. तेव्हा मुलगी म्हणाली. की, मला माझ्या पालकांना फोन लावून द्या. तेव्हा मॅडम म्हणाली की तु जर येथे काय घडले ते तुझ्या घरच्यांना सांगणार असेल तर मी तुला फोन लावून देणार नाही. म्हणून पीडित तरुणीने पुन्हा दुसर्‍या मॅडमला विनंती केली आणि घडलेला प्रकार पालकांना कथन केला. मात्र, पहिल्या मॅडमने ही घटना दडपण्याचा प्रयत्न केल्याची लक्षात येते. डॉ. इथापे यास नकळत सहाय्य केल्याचे दिसून येते. त्यामुळे, हा प्रकार दडपण्याचा प्रयत्न करणार्‍या मॅडमला देखील या गुन्ह्यात ३४ प्रमाणे सहआरोपी करण्यात यावे अशी मागणी एकलव्य संघटनेनी केली आहे.

तर, जेव्हा पीडित तरुणीचे पालक हे मुलीस घेऊन पोलीस ठाण्यात गेलेे. तेव्हा बडा राजकीय व्यक्ती म्हणून पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेण्यास टाळाटाळ केली. मात्र, नंतर आदिवासी बांधव एकत्र आले. त्यात एकलव्य संघटनेने थेट पोलीस अधिक्षक राकेश ओला साहेब यांच्याशी संपर्क केला. त्यानंतर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेण्यास समर्थता दर्शविली. यात एकलव्य संघटनेचे प्रदेशाध्यक्ष योगेश सुर्यवंशी यांनी डॉ.अरुण इथापे असे नाव अधिक्षकांना सांगितले असून यास अटक होण्यासाठी आता प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आहे. सुर्यवंशी यांच्यासोबत प्रदेश कार्याध्यक्ष विकास डमाळे,दिपक रानशेवरे, सोमनाथ शिंदे, दिपक बर्डे, संध्याताई खरे, विकास शिंदे हे एकलव्य संघटनेचे कार्यकर्ते पोलीस ठाण्यात पीडित मुलीच्या पाठीशी ठाम उभे होते. तर, आदिवासी बांधवांनी आता अन्याय सहन न करता पुढे यावे असे आवाहन  सुर्यवंशी यांनी केले आहे.