लग्नाला गेलेल्या मामा-भाच्यांचा अपघात होरपळून मृत्यु, बसच्या धडकेत टाकीचा स्पोट, व्हिडिओ पाहुन तुमचे काळीच धडकेल.!
सार्वभौम (अकोले) :-
अकोले तालुक्यातील समशेरपूर येथील मामा-भाचे दुचाकीवर नाशिक येथे लग्नाला गेले होते. तिकडून परतत असताना शिंदे पळसे परिसरात त्यांना एका बसने मागून धडक दिली. दोन्ही बसच्यामध्ये यांची गाडी सापडल्याने पेट्रोलमुळे टाकीचा स्पोट झाला आणि गाडी बसखाली गुतली. शेकडो लोकांच्या डोळ्यादेखत दोघे तरुण जिवंत जळत होते. मात्र, लोकांनी मोबाईलवर व्हिडिओ काढणे पसंत केले. परंतु कोणी मदत करण्याचा प्रयत्न केला नाही. ही सर्व काळीज हेलावून टाकणारी घटना अनेकांच्या मोबाईल कॅमेरॉत कैद झाली. तर, काही सीसीटीव्हीत देखील स्पष्ट दिसत असून बस चालकाच्या बेजबाबदारपणामुळे दोघांना जीव गमवावा लागला आहे. ही घटना आज दि. ८डिसेंबर २०२२ रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली. यात मदन दिनकर साबळे (वय ४०) व रविंद्र सोमनाथ विसे (वय ३२, दोघे रा. समशेरपूर, ता. अकोले, जि. अ.नगर) ही दोघे मयत झाले आहेत. त्यामुळे, आता संबंधित वाहन चालकावर कलम ३०४ नुसार सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन मयत कुटुंबियांना सरकारने अर्थसहाय्य करावे अशी मागणी समशेरपुरचे सरपंच एकनाथ मेंगाळ, सचिन दराडे, सुनिल दराडे, समाजसेवक शंकरभाऊ चोखंडे यांनी केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मदन आणि रवी ही दोघे समशेरपूर येथील रहिवाशी आहेत. या दोघांना औरंगाबाद रोड नाशिक येथे एका मित्राच्या साखरपुड्याला आणि पाथर्डी फाटा नाशिक येथे लग्नाला जायचे होते. त्यामुळे, सकाळीच दोघांनी आपली एम.एच.१५ जी.एच ९२०१ ही दुचाकी घेऊन नाशिकला निघाले होते. दोन्ही कार्यक्रम आटोपल्यानंतर ते आपल्या गावाकडे निघाले असता शिंदे पळसे परिसरात असताना पुढे एक आरामदायी बसगाडी चालली होती. तिच्या मागे ही दोघे हळुहळु चालले होते. पुढील कोणत्याही गाड्यांना वेग नव्हता. मात्र, वाहतुक कोंडी झाल्यामुळे पुढील वाहने संथ गतीने सुरू होती.
दरम्यान, मदन आणि रवी या दोघांना काही कळण्याच्या आत एक लाल परी ही बस मागून भरधाव वेगात आली आणि तिने दोघांना जोरात धडक देऊन पुढील आरामदायी गाडीला सुद्धा उडवून दिले. हा प्रकार तेथील एका सीसीटीव्हीत कैद झाला खरा. मात्र, दोन्ही गाड्यांच्या मधोमध यांची दुचाकी चेंबली गेली. त्यामुळे, गाडीच्या टाकीत पेट्रोल असल्यामुळे घर्षणामुळे पेट्रोलने पेट घेतला. ही ज्वाला इतकी भयानक होती. की, काही क्षणात बसच्या इंजिनने देखील पेट घेतला. त्यावेळी, बसमध्ये ६० ते ७० प्रवाशी होते. वाहन चालकाने कोणत्याही प्रकारचे प्रसंगावधान न राखता खाली उतरुन बाजुला होऊन घेतला. त्यावेळी, प्रवाशांनी गाडीच्या काचा फोडून आणि संकटकालीन मार्गाने गाडीतून बाहेर येण्याचा प्रयत्न केला. तोवर गाडीला बर्यापैकी आग लागली होती. मात्र, लहान मुलांना काहींनी खिडक्यांमधून बाहेर टाकल्याने अन्य अनर्थ टळाला.
दुर्दैवाने, एक व्यक्ती जीवंत बसच्या खाली आडकला होता. तो अन्य लोकांची मदत मागत होता. मात्र, टाकीचा स्टोट होतो की काय या भितीने कोणी पुढे गेले नाही. मात्र, प्रत्येकाने आपापले मोबाईल काढले आणि तो कसा मरतो आहे. जिवंतपणी कसा मरतो आहे हे आपल्या कॅमेरॉत घेणे पसंत केले. गाडीखाली असणारा व्यक्ती मदत मागत होता. मात्र, तो गाडीखाली आडकल्याने तो बाहेर येऊ शकला नाही. उपस्थित सगळ्यांनी मिळून जर बस पुढे ढकलली असती. तर, कदाचित त्याचा जीव वाचला असता. मात्र, मदतीचा हात कोणी देऊ शकले नाही. हे राज्यभर व्हायरल झालेल्या मेसेजने लक्षात आले. आता मात्र, संबंधित वाहन चालकावर कलम ३०४ नुसार सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन मयत कुटुंबियांना सरकारने अर्थसहाय्य करावे अशी मागणी होऊ लागली आहे.
दरम्यान, हा सर्व प्रकार व्हायरल होत असताना शिंदे पळसे हा टोलनाका मात्र, सर्वात चर्चेचा विषय ठरला. या टोलनाक्यामुळे प्रचंड अपघात होतात. हे एक लुटीचे आणि पठाणी वसुली करणारे केंद्र असून तो एक मृत्युनाका असल्याचे मेसेच व्हायरल होताना दिसले. आम्ही खड्ड्यात जाऊ, आमच्या गाड्या खड्ड्यात जाऊद्या.! पण, शिंदे पळसे टोलनाका बंद करा. कारण, तेथे मुद्दाम महिलांना कामावर ठेवले असून त्यांच्याकडून प्रवाशांना असभ्यतेची वागणुक मिळत आहे. खड्डे बुजवा म्हटलं तरी विनयभंग दाखल करु का अशा धमक्या दिल्या जात आहे. त्यामुळे वैतागलेल्या प्रवाशांनी शिंदे सरकार तथा मुख्यमंत्र्यांना या घटनेनंतर विनंती केली आहे. की, आमचे वाटोळे झाले तरी चालेल. परंतु, हा टोलनाका बंद करण्यात यावा. त्यावर मुख्यमंत्री विचार करतील अशा प्रकारची पोष्ट व्हायरल होताना दिसत होती.