३२० रुपये बील न दिल्याने ग्राहकाला नंगा करुन घरी पाठविले, माणुसकी हरवलेले संगमनेर.! हतबल होऊन तो रस्त्याने चालत गेला.! व्हिडिओ पहा

 

सार्वभौम (संगमनेर) :-

     आपल्या देशात ग्राहक देवो भव: असे म्हटले जाते. मात्र, अवघे ३२० रुपये दिले नाही. म्हणून ग्राहकाचे कपडे काढून त्यास मारहाण करण्यात आली. तर, फक्त अंडरवेअरवर त्यास हॉटेलबाहेर काढण्यात आले. चांगला व्यक्ती अशा पद्धतीने अर्धनग्न परिस्थितीत का चालला आहे. याचे अनेकांना कोडे उलगडले नाही. मात्र, अधिकची चौकशी केली असता. ही घटना गेल्या काही दिवसांची असून बारमधील शुल्लक बिलाहून त्याच्यावर ही वेळ ओढावली आहे. मात्र, एखाद्याचे कपडे काढून घेणे, त्यास मारहाण करणे कितपत योग्य आहे? हे हॉटेल कोणाचे आहे? अशा पद्धतीचा बरताव करणे योग्य आहे का? संबंधित व्यक्तीवर कारवाई होईल का? अशा प्रकारचे अनेक प्रश्‍न आता उपस्थित होऊ लागले आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, शनिवार दि. १७ डिसेंबर म्हणजे संगमनेर तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या मतदानाच्या आदल्या दिवशी कोल्हेवाडी परिसरात एक तरुण एका हॉटेलात गेला होता. तेथे गेल्यानंतर त्याने कदाचित मद्य घेतल्याचे बोलले जाते. तर थोडेफार जेवण देखील केले. मात्र, आपल्याकडे पैसे नाहीत किंवा पॉकीट विसरले असे काहीसे कारण होते. मात्र, जेवण केलं आणि दारुही डोसली. त्यामुळे, जे काही ३२० रुपये बील झाले आहे. ते अदा केल्याशिवाय येथून जाऊ देणार नाही. अशा प्रकारची भूमिका हॉटेलच्या मॅनेजरने घेतली होती. मात्र, पैसे नसल्यामुळे आता कोणताही पर्याय शिल्लक राहिला नव्हता.

दरम्यान, संबंधित तरुणाने मॅनेजरकडे विनंती केली. मात्र, दोघांमध्ये तेथेच चकमक झाली. त्यानंतर त्यास मारहाण करण्यात आली व पैसे नाही तर दारु पितो कशाला आणि जेवतो कशाला? अशा पद्धतीचे वाकयुद्ध झाले. मात्र, या दरम्यान झटापटी झाल्या आणि हॉटेल वाल्यांनी ग्राहकाचा शर्ट काढून घेतला. तेव्हा संबंधित तरुणाने काऊंटरवर जाऊन त्यांना विनंती केली. माझे बील मी आणून देतो, मात्र शर्ट द्या. परंतु, एखाद्याच्या इज्जतीपेक्षा आजकाल पैसा प्यारा झाल्यामुळे त्यास शर्ट मिळाले नाही. त्यानंतर त्यांच्यात पुन्हा बाचाबाची झाली आणि त्याची पॅन्ट देखील काढून घेण्यात आली. आता मात्र ३२० रुपयांची किंमत फार झाली होती.


दरम्यान शर्ट नाही, पॅन्ट नाही, विनंती करुन देखील ती मिळत नाही. जवळ ३२० रुपये नाही. मग करणार काय? या तरुणांने थेट हॉटेलमधून काढता पाय घेतला. कारण, तेथे पाहणारे अनेकजण होते. त्यामुळे, आता इज्जत तर गेलीच आहे. मग, रोषापोटी त्याने थेट रस्ता गाठला आणि भर रस्त्याने तो चालता झाला. ना वेडा, ना कपडे त्यामुळे हा काय प्रकार आहे. हे अनेकांच्या लक्षात आले नाही. मात्र, पडद्याआड हेच सत्य होते. की, अवघ्या ३२० रुपयांच्या बिलासाठी या तरुणाचे संपुर्ण कपडे काढून घेतले होते. दारु पिल्यानंतर अनेकांना भान रहात नाही हे सत्यच असल्याची प्रचिती संगमनेरकरांना पहायला मिळाली.

खरंतर अनेकांना प्रश्‍न पडला आहे. की, खरोखर एखाद्या व्यक्तीसोबत फक्त ३२० रुपयांसाठी असे करावे का? किंवा एखाद्या व्यक्तीने स्वत:चे चारित्र्य हनन होईल अशा हॉटेलांमध्ये जावे का? किंवा झालेच असे काही. तर, अवघ्या रुपयांसाठी कोणालातरी बोलावून हा प्रश्‍न तेथे संपविता आला असता. यासाठी स्वत: शुद्धीत असणार्‍या हॉटेलवाल्यांनी पुढाकार घेणे गरजेचे होते. मात्र, आपण ज्या ग्राहकाला देव मानतो. तो भर रस्त्याने अर्धनग्न पाठविण्याची मानसिकता झाली तरी काशी? त्यामुळे, या व्यक्तीच्या बाबत जे काही झाले ते चुकीचे झाले असून त्यावर आता प्रशासनाने चौकशी करुन संबंधीत हॉटेलमध्ये जे कोणी दोषी असतील. त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी मानव अधिकार संघटनेने केली आहे.