अकोल्याच्या वाळुयुद्धात पुन्हा 7 जणांवर गुन्हे दाखल.! परस्पर विरोधी २२ जण आरोपी, पोलिसांकडून समान न्याय.!
वाळु आणि खडी विक्री करणार्या गाड्या आडवून त्यांचे फोटो काढायचे आणि व्हायरल करायचे. त्यामुळे, वाळुवाल्यांच्या दोन गटात दि. २९ नोव्हेंबर रोजी सकाळी ०८:३० वाजण्याच्या सुमारास तुंबळ हाणामार्या झाल्या होत्या. यात टोळीने पिस्तुलचा दावा केला होता. तर, दुसर्या गटाने देखील शस्त्रस्त्रे वापरल्याची टूम सोडली होती. मात्र, दोन्ही गटांचे म्हणजे ऐकल्यानंतर पोलिसांनी जे काही खरे घडले ती हकीकत घेऊन ३२४ प्रमाणे गुन्हे दाखल केले आहेत. पहिल्या गुन्ह्यात नऊ ओळखीचे आणि सहा अनोळखी असे १५ जण आहेत. तर, आता सागर विजय देशमुख (रा. इंदोरी, ता. अकोले) याच्या फिर्यादीनुसार मुख्य आरोपी सुहास पुडे याच्यासह सात जणांना आरोपी करण्यात आले आहे. त्यामुळे, दोन्ही गटाच्या २२ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
याप्रकरणी सागर देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. की, माझा खडीक्रेशर व्यावसाय असून माझ्या स्वत:च्या १२ गाड्या आहेत. संबंधित गाड्यांवर वेगवेगळे चालक असून ते माल पोहच करण्याचे काम करतात. दि. २९ नोव्हेंबर रोजी सकाळी ०८:३० वाजण्याच्या सुमारास एका गाडीवरील चालक गोकुळ उत्तम पिचड (रा. उंचखडक, खु) याला सुहास भाऊसाहेब पुंडे (रा. ढोकरी) याने ढोकरी फाट्यावर आडविले होते. त्याला माल हवा असल्यामुळे, तो शिविगाळ, दमदाटी करीत असल्याची माहिती पिचड याने जगन वसंत देशमुख यांना दिली होती. त्यानंतर एकमेकांचे फोन फिरले आणि ढोकरी फाटा हा वाळुवॉरचा स्पॅट बनला होता.
कारण, त्या दिवशी फिर्यादीत म्हटल्याप्रमाणे सुहास पुंडे, सागर भाऊसाहेब पुंडे, भाऊसाहेब पुंडे, (रा. ढोकरी, ता. अकोले), कमलेश डेरे (रा. डेरेवाडी, ता. संगमनेर), शुभम चव्हाण (रा. गुरवझाप, ता. अकोले), अतुल बाळासाहेब देशमुख (रा. सुगाव बु, ता. अकोले), आण्णासाहेब सुधाकर वाकचौरे (रा. कळस, ता. अकोले) या सर्वांनी मिळून पिचड यास शिविगाळ, दमदाटी करुन चापटीने मारहाण केली. असे चालक पिचड याने सागर देशमुख यास फोनवर सांगितले. त्यानंतर देशमुख याचेसह अन्य चौघेजण ढोकरी फाटा येथे गेले असता तेथे वरिल सातजण पिचड या चालकास मारत होते. तेव्हा आम्ही संबंधित व्यक्तींना समजून सांगून चालकास सोडविण्याचा प्रयत्न केला असे फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान, तरी देखील हा वाद मिटला नाही. त्यानंतर सात जणांनी चालक पिचड आणि सागर देशमुख यास बेदम मारहाण केली. तुम्ही व्यावसाय कसे करता हेच पाहुन घेतो असे म्हणून ठार मारण्याची धमकी दिली. तर, तेथे उपस्थित असणार्या एम. एच. १७ बी.एक्स ७७६० या बोलेरोमधून लोखंडी गज, कोयते व लाकडी काठ्या काढून तुम्हाला आता जीवंत सोडणार नाही असे म्हणून धावून आले. त्यामुळे, त्यांच्यापासून वाचण्यासाठी देशमुख याचेसह अन्य उपस्थित असणार्या सर्वांनी तेथू पळ काढला. त्यानंतर घडला प्रकार थेट पोलीस ठाण्यात येऊन कथन केला असता पोलिसांनी सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पहिली फिर्याद.!
दरम्यान, यापुर्वी परस्पर विरोधी गुन्ह्यात सुहास पुंडे याने फिर्याद दिली असून त्यात ऋषिकेश उत्तम देशमुख (रा. सुगाव बु ता. अकोले), सचिन किसन सदगिर (रा. पिंपळगाव नाकविंदा), अनिल बाळासाहेब पवार (रा. सुगाव खु), सागर देशमुख (रा. इंदोरी), राहुल जाधव (रा. चितळवेढे), जगन वसंत देशमुख (रा. इंदोरी), जावेद जहागिरदार (रा. अकोले), अजित येवले (रा. मेहेंदुरी फाटा) व रवी आहेर (रा. पिंपळगाव कोंझीरे, ता. संगमनेर) हे नऊ जण आणि अनोळखी ६ जण अशा १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, यावेळी जगन देशमुख हे घटनास्थळी नव्हते असे त्यांना स्पष्ठ केले असून हवंतर पोलिसांशी चौकशी करावी अशी विनंती त्यांनी केली आहे. तर, या घटनेत पिस्तुलचा देखील वापर करण्यात आलेला नाही असे स्पष्ट शब्दात सहा. पोलीस निरीक्षक घुगे यांना सांगितले आहे. तसेच अतिशयोक्ती गुन्हे दाखल होणार नाही याची घुगे यांनी काळजी घेतली असून दोन्ही गटाच्या समाधानकारक फिर्यादी घेतल्याने खोट्या गुन्ह्यांचा धोका टळल्याचे मत सुज्ञ व्यक्तींनी व्यक्त केले आहे.
दरम्यान, संगमनेरात औषधाला देखील वाळु मिळत नाही. तर अन्य गौणखनिजावर देखील निर्बंध आहेत. त्यामुळे, जे काही चालु आहे. ते चढ्या भावाने आणि रात्रीस खेळ चालतो. त्यामुळे, आता वाळुतस्करांमध्येच युद्ध पेटले आहे. कारण, जो तो ज्याच्या-त्याच्या रिलेशन आणि तगड्या अर्थपुर्ण तडजोडीतून करीत असताना यांच्यात प्रशासनाला खबरी देण्याचे काम सुरू झाले आहे. तर, प्रशासन देखील मलिद्यापुढे करणार काय? त्यामुळे, सोशल मीडियावर व्हायरल करुन आडकाठी करण्याचे काम केले जात आहे. मात्र, अशा त्या ठिकाणी कोणी का असेना.! शेवगाव, श्रीगोंदा आणि नेवाशा प्रमाणे येथे वाळुस्करीच्या नादात एकमेकांचे खुन पडायला नको म्हणजे देव पावला.!