पठारभागाचे युवानेतृत्व गौरव डोंगरे.! असे तरुण राजकारणात आले पाहिजे.! पठार नव्हे.! स्मार्ट पठार भागाचे धेय्य.!
सार्वभौम विशेष :-
सामाजिक व राजकीय चळवळ ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे, मात्र ह्या प्रक्रियेत नितळ, निर्मळ आणि संवेदनशील माणसे तशी फार कमी मिळतात. तसेही आजची राजकीय अराजकता पाहता सामाजिक शहानपण आणि समाजशील व्यक्तीमत्व शोधून सापडत नाही. पुरोगामी महाराष्ट्रात शरदचंद्रजी पवार साहेब, आ. बाळासाहेब थोरात साहेब यांच्यासारखी अगदी बोटावर मोजणारी मानसे राजकारणातील राजहंस म्हणून निवडून पडतील. परंतु, यापलिकडे विचार या देशाची लोकशाही बळकट करायची असेल, पुरोगामी संस्कृती टिकवायची असेल तर तरुणांनी विशेषत: शिकलेल्या मुलांनी राजकारणात ऐन्ट्री केली पाहिजे. म्हणून आमच्या डोळ्यासमोर पहिले नाव येते, ते म्हणजे पठार भागाचा अभिमान गौरव डोंगरे.! कारण, समाजाप्रती आत्मियता, सामान्य मानसांना आपला वाटणारा तरुण, प्रत्येकाच्या सुख दु:खात आश्रु ढाळणारे एक संवेदनशील नेतृत्व होय.! गेल्या कित्तेक दिवसांपासून आमची संगती आहे. आ. थोरात साहेब व सत्यजीत दादा यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक कार्यात स्वत:ला वाहुन घेणार हा तरुण म्हणजे एक दिलखुलास मित्र होय. आज त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी जरा भावनांना वाट मोकळी करुन देत व्यक्त होण्याचा प्रयत्न केला आहे.
संगमनेर तालुक्यातील पठार भाग म्हणजे जिद्दी, स्वावलंबी आणि स्वाभिमानी स्वभावाच्या लोकांचा भाग होय. निसर्गाने उपजतच स्वभावाची माणसं तिथं निर्माण केली असावीत असे तिथल्या विविध क्षेत्रात योगदान देणार्या व्यक्तिमत्वांकडे पाहून वाटतं. मात्र, गौरव हा त्याहीपेक्षा वेगळा आहे. जिद्दी, स्वाभिमानी, कष्टाळु आणि अगदी शांत, संयमी स्वभावाला एक कर्तुत्वाची झालर.! वागण्यात नम्रपणा आणि बोलण्यात प्रेमाचा गोडवा.! त्याहुन महत्वाचे म्हणजे स्वयंप्रकाशीत म्हणावे लागेल. राजकारणी म्हणून अगदी कमी वयात एवढं परिपक्व होणं आणि त्याहीपेक्षा चांगलं माणूस म्हणून जगणं हे गौरव डोंगरे यांचे वेगळेपण आजवर सहज अनेकांना भावले आहे. आजकाल स्वतःच्या समृद्धतेच्या चौकटीतून बाहेर पडून लोकांसाठी काही करायला मिळावे यासाठी कोणी फारसं पुढे येत नाही. मात्र, कोणाच्याही सुख दुःखात सढळ हाताने मदत उभी करणारा गौरव हा पठार भागाचेच नव्हे तर तालुक्यातील युवकांना प्रेरणादायी आहे.
त्यांच्या इतिहासाची पाणे चाळली तर ते अगदी आधीपासूनच संवेदनाशील आणि समाजशील असलेल्या पहायला मिळते. आईचे संस्कार, शेतकरी कुटुंबाचा वसा आणि आजोळाकडून आलेला राजकीय वारसा असे त्यांच्या जडणघडणीचे अनेक पैलु आहेत. खरंतर वडील शासकीय अधिकारी असल्याने त्यांचा यंत्रणेत असलेला वावर ह्या गोष्टी त्यांना वारंवार साद घालत होत्या.! मात्र, प्रशासन आणि राजकारण यातील द्वंद्व इयत्ता दहावीत असताना संपुष्टात आले. कारण, त्याच वेळी जिल्हा परिषद सदस्य सत्यजीत दादा तांबे यांचे वक्तृत्व व नेतृत्वाची यांची डोंगरे यांच्यावर भुरळ पडली. तेव्हाच ठरलं.! स्वत:च्या पायावर उभ रहायचं आणि थेट राजकीय पाढे गिरवायचे. कालांतराने सत्यजीत तांबे यांनी नेता बनो अभियान राबविले आणि गौरवची छाती रुंदावली. विद्यार्थी चळवळीच्या माध्यमातून कॉंग्रेस पक्षाला नेतृत्व देण्याची उज्वल परंपरा असलेल्या एन.एस.यु.आयचा सदस्य होऊन गौरव डोंगरे यांनी आपल्या सामाजिक कार्याला सुरुवात केली. पुढे बाळासाहेब थोरात साहेब व डॉ. सुधीरजी तांबे साहेब यांच्या नेतृत्वात गौरव डोंगरे यांच्या राजकीय जडण-घडणीला सुरूवात झाली.
२०११ साली एन.एस.यु.आयचा सदस्य व नंतर २०१४ साली त्याच संघटनेचे शहर उपाध्यक्ष व सध्या तालुकाध्यक्ष पद भूषवणार्या गौरव डोंगरे यांनी विद्यार्थी हितासाठी अनेक जनआंदोलन केले. कॉंग्रेस पक्षाच्या अनेक उपक्रमात हिरीरीने सहभागी होऊन थोरात साहेब व सत्यजीत दादा यांच्या नेतृत्वात त्यांनी नेटाने काम केले. सातत्याने विद्यार्थी चळवळीत काम केल्याने संगमनेर व अकोले तालुक्यासोबतच नगर जिल्ह्यात कार्यकर्ते, विद्यार्थी, युवक यांच्यासोबत प्रस्थापित झालेले संबंध हे गौरवची पहिली स्वकमाई ठरली. महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी संवाद, मेळावे, करिअर मार्गदर्शन शिबीरे आयोजित करण्यात त्यांनी सुरुवात केली. परीक्षा फि वाढी विरोधात आणि एसटी बसेस संदर्भात विद्यार्थी समस्या आंदोलने तसेच विविध क्रीडा आणि सांस्कृतिक उपक्रम गौरव यांनी यशस्वीरित्या पार पाडले.
पुढे युवा स्वाभिमान संस्थेची स्थापना करून त्यांनी युवकांना विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद देण्याच्या संकल्पना राबवल्या. रास दांडिया कार्यक्रमामुळे गौरवचे नाव तालुक्यात पोहचले. पुढे युवक कॉंग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकित गौरव डोंगरे यांनी सदस्य नोंदणीची मोठी भूमिका पार पाडली. मराठा आरक्षण मोर्चा, संगमनेर जिल्हा मागणी या संदर्भात संगमनेर, नगर, मुंबई येथे झालेल्या मोर्चात त्यांनी थेट सहभाग घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. गौरवला आपला पठार भाग हा नगर जिल्ह्यात स्मार्ट व्हिलेज म्हणून पुढे न्यायचा मानस आहे. कृषी, औद्योगिक, पर्यटन आणि धार्मिक दृष्ट्या मोठी संधी असतांना देखील, केवळ सद्यस्थितीत असणारी राजकीय उदासीनता असल्याने फार मोठे बदल घडू शकले नाही याचे शल्यही त्यांच्या मनात आहे. तरी देखील संमस्यांपुढे कोणतीही हार न मानता भविष्यात संधी मिळालीच तरी मात्र समृद्ध पठार भाग, स्मार्ट पठार भाग ही संकल्पना राबवन्याचे स्वप्न देखील त्यांनी उराशी बाळगले आहे.
राजकारण करावे, निवडणुका देखील व्हाव्यात. मात्र, त्याला विकासात्मक दृष्टी असावी. म्हणून संगमनेर तालुक्यातील भोजदरी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यात गौरवने फार मोठी भूमिका पार पाडली होती. पठारावरील कोठे बुद्रुक येथील श्री.खंडोबा देवस्थान प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात मंदिरावर हेलीकॉप्टर मधून पुष्पवृष्टी असेल, अकलापूर येथील श्री.दत्तात्रय देवस्थान वर्ग वाढीचा आणि पर्यटन क्षेत्राचा दर्जा मिळावा हा प्रस्ताव असेल, गौरव डोंगरे यांनी नेहमीच धार्मिक व अध्यात्मिक क्षेत्रात सर्वतोपरी योगदान दिले आहे. घारगाव येथील नागरिकांच्या समस्या, पठारावरील वीज वितरण संदर्भात समस्या इत्यादी मागण्यासाठी पठार भागातील नागरिकांसमवेत प्रशासना विरोधात संघर्ष करण्यात देखील गौरव अग्रभागी राहिले आहेत.
सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर, व्यावसायिक क्षेत्रात देखील मोठा कार्यभार त्यांचा गौरवास्पद आहे. विविध शासकीय बांधकामे, प्रकल्प पूर्ण करण्यात सचोटीने त्यांनी काम केले आहे. तसेच मुबलक पैसा आणि सुख सुविधा असतांना देखील गौरवने अध्यात्मिक व धार्मिक निष्ठा ऐवढ्या पाळल्या आहेत. की, कुठल्याही व्यसनाच्या आहारी ते गेले नाहीत. वय कमी असले तरीही राजकीय व सामाजिक प्रगल्भता, संस्कार, सुस्वभाव आणि स्पष्टवक्तेपणा फार वाख्यान्याजोगा आहे. सतत लोकांमध्ये असणारा लोकांना हवाहवासा वाटणारा गौरव अल्पावधीतच पठार भागातील लोकांना सहज आपलासा वाटतो. सर्वांना सामावून घेऊन राजकीय व सामाजिक क्षेत्रात योगदान देणार्या गौरव डोंगरे यांना पक्षनेतृत्व लवकरच मोठी संधी देईल यात आम्हाला तिळमात्र शंका नाही. व्यापक दृष्टी, झोकून देऊन काम करण्याची वृत्ती, ना.बाळासाहेब थोरात व सत्यजित दादा तांबे यांच्याशी असलेली निष्ठा आणि पठार भागाच्या उन्नती विषयी उराशी बाळगलेले स्वप्न नक्कीच गौरवला त्यांच्या आयुष्यात सर्वोच्च स्थान प्राप्त करून देईल यात दुमतच नाही.
- शेखर सोसे
(कार्याध्यक्ष,संगमनेर शहर एन.एस.यु.आय.)