अकोल्यात नगरसेवकाकडून वृद्ध दाम्पत्यास लोखंडी रॉडने बेदम मारहाण, तिघांवर गंभीर गुन्हा दाखल.!

 


सार्वभौम (अकोले) :- 

भाडेकरू हा सार्वजानिक नळाचे पाणी जास्त वाया घालतो म्हणून एका आजोबाने त्यास विचारणा केली. मात्र, त्या भैय्याचा इगो हर्ट झाला आणि त्याने रुम मालक तथा माजी नगरसेवक परसराम शेळके याला बोलाविले. याच्यात बाचाबाची झाली आणि शेळके याच्यासह तिघांनी ६६ वर्षे वय असणार्‍या एक वृद्ध  दाम्पत्यास लोखंडी रॉडने मारहाण केली. ही घटना अकोले शहरालगत असणार्‍या पानसरवाडी येथे आज शनिवार दि. ५ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली. यात पंढरीनाथ रेवजी पानसरे व शांताबाई पानसरे(दोघे रा. पनसरवाडी) ही दोघे जखमी झाले आहेत. पंढरीनाथ यांना जबरी मार लागला असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या जबाबानुसार परसराम बाळचंद शेळके, सौरभ शेळके आणि भैय्या अशा तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पंढरीनाथ आणि त्यांची पत्नी शांताबाई हे नगरपंचायत हाद्दीत पानसरवाडी येथे राहतात. त्यांची मुले पुण्यात नोकरीनिमित्त स्थायिक झाले असून गावात एक छोटेसे किराणा दुकान चालवून हे वृद्ध दाम्पत्य आपला उदरनिर्वाह करते. शनिवार दि. ५ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास सकाळी परसराम शेळके यांच्या खोल्यांमध्ये असणार्‍या एका भाडेकरुने नगरपंचायतीच्या नळाला आलेले पाणी खाली जास्त सांडविले. तेव्हा पंढरीनाथ यांनी त्यास विचारणा केली तेव्हा त्यास जास्त राग आला. या भैय्याने परसराम शेळके यास फोन करुन बोलावून घेतले. शेळके आल्यानंतर त्याने वृद्ध दाम्पत्यास शिविगाळ दामदाटी सुरू केली.

दरम्यान, यांच्यातील शाब्दीक वाद वाढत गेला. शेळके याने आजोबांच्या घरात घुसून पंढरीनाथ पानसरे यांच्या डाव्या हाताच्या बोटावर लोखंडी रॉड मारला. त्यांनी विरोध केला मात्र, तरी देखील दुसरा घाव डोक्यात टाकला. त्यामुळे, काही वेळात आजोबा रक्तबंबाळ झाले. हा प्रकार जेव्हा त्यांच्या पत्नीने पाहिला तेव्हा त्या पतीला सोडविण्यासाठी मध्ये गेल्या. मात्र, त्यांना देखील सौरभ परसराम पानसरे याने शिविगाळ, दमदाटी केली. तर तुम्ही दोघे जर आमच्या नादी लागल्यास तुम्हाला जीवंत सोडणार नाही असे म्हणून मारहाण केली असे फिर्यादीत म्हटले आहे. तर, पंढरीनाथ यांना तेथे उपस्थित असणारा भैय्या याने देखील लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच त्याच्या किराणा दुकानात असणारे सर्व साहित्य उधळुन दिल्याचे गुन्हात नमुद केले आहे.

दरम्यान, हा प्रकार घडल्यानंतर पंढरीनाथ यांना काही काळानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या बोटाला आणि डोक्याला गंभीर मार लागला आहे. त्यामुळे, या गुन्ह्यात वाढव कमल लागून गंभीर स्वरुपाचा गुन्हा होणार आहे. कारण, वैद्यकीय अहवालानुवार पंढरीनाथ यांना गंभीर स्वरुपाची जखम झाली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, शेळके आणि वाद हे एक नवे समिकरण होऊन बसले आहे. नगरपंचायतीच्या निवडणुकादरम्यान त्यांच्यावर दोन गुन्हे दाखल झाले होते. त्यापुर्वी आणि नंतर देखील तोच पाढा कायम राहिला आहे. त्यामुळे, एकतर हा पनसरावाडीचे एकुण वाद एकत्र बसून मिटवुन घेणे आवश्यक आहे. अन्यथा येणार्‍या काळात मोठा अनर्थ घडू शकतो. किंवा शेळके यांनी तरी थोडी सामोपचाराची आणि संयमाची भुमिका घेणे गरजेचे आहे. कारण, आज थोड्याहून गोष्ट गेली अन्यथा हा राग त्यांना नको त्या ठिकाणी घेऊन जाऊ शकतो.