अकोल्यात वाळुतस्करांमध्ये शस्त्रास्त्र राडा, वाळुवॉर प्रकरणात १५ जणांवर गुन्हे दाखल.!
सार्वभौम (अकोले) :-
रात्री अपरात्री वाळुच्या गाड्यांची वाहतुक सुरू असताना एकमेकांच्या काड्या करण्याच्या कारणाहून दोन गटात तुफान राडा झाला. यात एक व्यक्ती गंभीर जखमी झाला असून त्याला ९ जणांनी लोखंडी रॉड, चाकु आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ही घटना अकोले तालुक्यातील ढोकरी फाटा येथे दि. २९ नोव्हेंबर रोजी सकाळी १०:३० घडली. यात ऋषिकेश उत्तम देशमुख (रा. सुगाव बु ता. अकोले), सचिन किसन सदगिर (रा. पिंपळगाव नाकविंदा), अनिल बाळासाहेब पवार (रा. सुगाव खु), सागर देशमुख (रा. इंदोरी), राहुल जाधव (रा. चितळवेढे), जगन वसंत देशमुख (रा. इंदोरी), जावेद जहागिरदार (रा. अकोले), अजित येवले (रा. मेहेंदुरी फाटा) व रवी आहेर (रा. पिंपळगाव कोंझीरे, ता. संगमनेर) हे नऊ जण आणि आणखी ६ जण अशा १५ जणांना आरोपी करण्यात आले आहे. तर, पुंडे याची हवी तशी फिर्याद घेतली नाही म्हणून तो पोलीस अधिक्षक राकेश ओला यांना भेटणार असल्याची माहिती मिळाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि. २९ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ऋषिकेश देशमुख याने सुहास पुंडे (रा. ढोकरी, ता.अकोले) याला फोन केले होता. माझे तुझ्याकडे काम आहे, त्यामुळे, तू ढोकरी फाट्यावर ये असे म्हणून त्याने फोन ठेवला. त्यानंतर १०:३० वाजण्याच्या सुमारास सुहास हा ढोकरी फाट्यावर आला असता तेथे १० ते १५ जण उभे होते. त्यावेळी सागर देशमुख हा त्याला म्हणाला. की, आमचे नाईट क्रेशर चालु आहे. तु कशाला आमच्या काड्या करतो? तेव्हा या दोघांमध्ये शब्दीक चकमक सुरू झाली. त्यावर पुंडे म्हणाला. की, मी कशाला तुमच्या काड्या करु? तेव्हा ऋषिकेश देशमुख याने पुंडे याचा गचांडी धरुन थेट मारहाण सुरू केली.
दरम्यान, हा वाद टोकाला गेला असता तेथे उपस्थित असणार्या राहुल जाधव याने त्याच्या हातातील लोखंडे कडे हातात धरुन ते पुंडे याच्या डोळ्यावर मारले. त्या बुक्कीने तो अधिक जखमी झाला. त्यावेळी तेथे उपस्थित असणार्या सचिन सदगिर याने त्याच्या हातातील टामीने पुंडे याच्या मानेवर वार केला. तर, हाताच्या तळहातावर आणि पाठीवर देखील टामीने मारहाण केली. तर अनिल पवार याने लोखंडी चाकुसारख्या हत्याराने उजव्या हाताच्या तळहातावर वार केले. तर, जगन देशमुख, जावेद जाहागिरदार, अजित येवले. रवी आहेर, यांनी पुंडे यास लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तर, काही व्यक्ती हे एम.एच ०४ एच एक्स ९६०८ व एम.एच १७ एझेड ५७२ या गाडीत येऊन सर्वांनी मारहाण केली. तु आमच्या नादी लागला तर तुझी सुपारी देऊन तुला मारुन टाकू असे म्हणून मारहाण करुन शिविगाळ दमदाटी केली. असे पुंडे याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान, अकोले तालुक्यात वाळुतस्करांचा राडा हा अकोले तालुक्यात माजलेली मक्तेदारी दर्शवितो. यांना नेमकी कोणाचे अभय आहे? यांच्याकडून कोण-कोण हाप्तेखोरी करते? रात्रीचे वाळुतस्कर कोणाच्या आशिर्वादाने हे काम करतात? असे अनेक प्रश्न आता पुढे येऊ लागले आहेत. आता यात वेगवेगळी दोन गुन्हे दाखल होणार. त्यात पोलिसांनी व्यक्ती पाहून कोणावर अन्याय केला नाही म्हणजे बरे.! अन्यथा एकाच घटनेते आर्म ऍक्ट, ऍट्रॉसिटी, हाफ मर्डर आणि नको नको ती कलमे लागली तर काही विशेष वाटायला नको. कारण, अकोले तालुक्यात तशा पद्धतीची राजकीय आणि अवैध धंद्यांची मक्तेदारी आहे. हे आपण यापुर्वी पाहिले आहे. मात्र, मिथुन घुगे साहेब हे अशा पद्धतीने कारभार करतील की नाही? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.