नवरा बायकोच्या वादात मित्र झाला गुन्हेगार.! मित्राने वहिनीला कवळी मारली.! चुकून अशा फंद्यात पडू नका.!!



सार्वभौम (अकोले) :-

नवरा बायकोचा वाद झाला, बायको निघुन आली. पण, बापाचा जीव मुलात अडकला होता. त्यामुळे, त्याने कोणताही विचार न करता आपल्या मित्राला घेतले आणि थेट अकोल्यातील सासरवाडी गाठली. पत्नीला भेटून तो म्हणाला, तुला इकडे रहायचे तर रहा. पण, माझ्या मुलापासून मला तोडू नको! मात्र, तिच्याकडे देखील मातृत्वाच्या भावना होत्या. आपल्या पोटच्या गोळ्याला ती कशी दुर जाऊ देऊ शकते. परिणामी दोघांमध्ये वाद झाला. मुलगा तुझ्याकडे की माझ्याकडे असा वाद सुरू असताना त्यांच्यात ओडाताण सुरू झाली. मात्र, मित्राला मित्राचे वडिलप्रेम पहावले नाही. त्याने वहिनी साहेबांच्या काखेत असणार्‍या बाळाला ओढण्याचा प्रयत्न केला आणि नकळत तेथे विनयभंग झाला. अर्थात या दोघांनी मुलास घेऊन नाशिक गाठले. मात्र, रागराग वहिनी साहेबांनी देखील थेट अकोले पोलीस ठाणे गाठले आणि नवर्‍यासह त्याच्या मित्रावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. मग काय.! कायद्याच्या कचाट्यात अडकल्यानंतर पोलिसांचा फोन गेला आणि पुन्हा मुलगा आईच्या ताब्यात सामोपचाराने देण्यात आला. यात निखील वसंत दोंदे (रा. देवळाली, नाशिक) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, देवठाण येथील एका तरुणीचा विवाह सिन्नर तालुक्यातील वडगाव लोणारी येथे झाला होता. त्यांचा संसार काही काळ चांगला चालला होता. मात्र, कौटुंबिक कारणाने त्यात विघ्न येऊ लागले. त्यांना एक मुलगा देखील झाला होता. तो लहाण असल्यामुळे, आई आणि वडिल या दोघांचे प्रेम त्याला मिळत होते. मात्र, या दोघांमध्ये फारसे काही जमत नव्हते. असे असले तरी लेकरावर दोघांची माया आणि जिव्हाळा फार होता. एकदा त्यांच्यावर वाद झाले आणि मुलगी देवठाण येथे निघुण आली होती. मात्र, तिकडे मुलाशिवाय बाप देखील अस्वस्थ जगत होता.

दरम्यान, त्याने दि. २० नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ११ वाजता थेट देवठाण गाठले. तुला येथे रहायचे तर खुशाल रहा. पण, माझा मुलगा माझ्याकडे दे.! ती देखील मुलाची आई असल्यामुळे तिने मुलास घट्ट पकडले. त्यावेळी नवरा आणि बायको यांच्यात प्रचंड वाद झाले. नवर्‍याने तिला शिविगाळ, दमदाटी केली. तिच्याकडून मुलास हिसकवून स्वत:कडे घेण्याचा प्रयत्न केला. ती म्हणत होती, मी मुलास देऊ शकत नाही, तर हा म्हणत होता. तुला मुलगा हवा असेल तर कोर्टात जाऊन केस लढ आणि खुशाल घेऊन जा.! मात्र, नऊ महिने नऊ दिवस काय कोर्ट होते का? अगदी फुलासारखे लेकरु पोटात वाढविल्याने आई त्याचा ताबा देण्यास तयार नव्हती.

आता या दोघांच्या झकडपकडीत मुलाचे देखील हाल होत होते. तर, हा सर्व प्रकार मित्र देखील पहात होता. त्याने आपल्या मित्राची बाजु घेत पुढे होऊन वहिनींकडून मुलास हिसकविले. त्यावेळी, काही अनावश्यक कृत्य त्याच्याकडून झाल्याचा आरोप पीडित महिलेने केला. त्यांनी मुलास नेले, तर जाताना सांगितले. की, तुला मुलगा हवा असेल तर कोर्टात केस टाक आणि मग तुला तो मिळेल. एका आईच्या काखेतून मुलगा हिसकावून नेला. त्यामुळे, तिला नक्कीच वाईट वाटले. एकीकडे हिरकणीने लेकरासाठी रायगड उतरला होता असे इतिहास सांगतो. तर, राजा हिंदुस्तानी चित्रपटात मुलासाठी अमिरखान आणि करिष्मा कपूर यांची कहानी सर्वांना माहित आहे. अर्थात हा फिल्मी प्रकार वाटत असला तरी तो सत्यातला असून आई आणि वडिल यांच्या वादात त्यांचे लेकरू प्रेम असल्याचे प्रथमदर्शनीय दिसते आहे. त्यानंतर मात्र, संबंधित महिलेने पोलीस ठाणे गाठले आणि आपले पती व त्याच्या मित्रावर गुन्हा दाखल केला आहे.

फुकटचा कटू सल्ला.! 

दरम्यान, आई आणि वडिल यांचे जे मुलांवर प्रेम असते. त्याची तुलना कशात होऊ शकत नाही. मुलगा आईकडे की वडिलांकडे हा प्रश्‍न तत्कालिन परिस्थिती पाहून कोर्ट ठरवत असते. मात्र, त्या मुलाला देखील भावना असतात. त्याला कोणा एकाचेच नको तर आई आणि वडिल दोघांचे प्रेम हवे असते. त्यामुळे, वाद करताना किमान दोघांनी विचार केला पाहिजे. जितके मातृत्व आईत असते, तितक्या भावना बापाच्या देखील मुलात असतात. त्यामुळे, दोघांनी सामंजस्याने यावर तोडगा काढला पाहिजे. तर, नवरा आणि बायको यांचे वाद हे काही जागतीक युद्ध नसते. त्यामुळे,  दोन्हीकडचे सासु-सासरे, जावा, ननंद, दिर यांनी त्यांच्यात जास्त काही हस्तक्षेप करण्याची काही गरज नसावी. त्यात मित्र आणि शेजारी यांनी तर मध्ये पडूच नये. कारण, हे उद्या गोड होतात आणि गुन्हेगार आपण होतो. त्यामुळे, सावधान.!!!!