आईहुन शिवी दिल्याने भावाने भावाची केली हत्या.! दसर्‍याच्या दिवशी अंगणात रक्ताचा सडा.! पत्नीचा टाहो.! सांगा ना पुरणपोळी कोण खाणार..!

 सार्वभौम (अकोले) :- 

 दसर्‍याच्या दिवशी चुलत भावाने आईहून शिवी दिल्याने दोघांमध्ये वाद झाल. राग अनावर झाल्याने एकाने दगड उचलुन तो आपल्या चुलत भावाच्या डोक्यात मारला. त्यामुळे, भावाचा जागीच मृत्यु झाला. अगदी सनासुदीच्या दिवशी हे विपरीत विघ्न गिर्‍हे कुटूंबावर कोसळल्याने तालुक्यात दु:खाचे वातावरण पसरले होते. ही घटना दि. ५ ऑक्टोबर २०२२ रोजी सायंकाळी ६:३० वाजण्याच्या सुमारास घडली अकोले तालुक्यातील देवठाण येथे घडली. यात बारकू दामु गिर्‍हे (रा. खडकेवाडी, देवठाण, ता. अकोले) हे मयत झाले असून यात काशिनाथ सोमनाथ गिर्‍हे (रा. देवठाण) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि. ५ ऑक्टोबर रोजी दसर्‍याचा सन असल्यामुळे बारकु आणि त्यांची सैभाग्यवती इंदुबाई ह्या कोठे कामाला न जाता घरीच होते. बारकु यांनी काही बाजार आणला होता. त्यामुळे, इंदुबाई यांनी पुरण पोळीच्या स्वयंपाकाचा घाट घातला होता. त्यावेळी बारकु हे तिला म्हणाले मी जरा देवठाण गावात जाऊन येतो. तु स्वयंपाक केला की आपण एकत्र जेवण करु. तेव्हा इंदुबाई यांना पतीस बाजवले होते सनासुदीच्या दिवशी लवकर घरी या. गावात गप्पाटप्पा मरत बसू नका. तेव्हा बारुकू यांनी लवकर येण्याचा शब्द दिला होता. त्यानुसार सायंकाळी ते घराकडे निघाले होते. इकडे इंदुबाई यांचा स्वयंपाक होऊन सगळी आवरासावर झाली होती. तर, जेवणासाठी त्या आपले पतीदेव बारकू यांची वाट पाहत ओट्यावर जाऊबाई आणि तिच्या मुलीशी गप्पा मारत बसल्या होत्या.

दरम्यान, ६:३० वाजण्याच्या सुमारास दिर काशिनाथ गिर्‍हे हा दारु पिवून घरी आला. त्याने इंदुबाई यांना विचारले. की, वहिनी बारकू दादा कोठे आहे? त्याने मला आईहून शिव्या दिल्या आहेत. आता काही झालं तरी मी त्याला जिवंत सोडणार नाही. यांची चर्चा चालु असताना तेव्हढ्यात बारकू गिर्‍हे हे तेथे आले. त्या दोघांमध्ये शाब्दीक बाचाबाची झाली. मात्र, ओट्यावर उभे असताना काशिनाथ गिर्‍हे याने बारकू यांना अचानक खाली पाडले आणि जवळच पडलेला मोठा दगड घेऊन बारकू यांच्या डोक्यात मारला. काशिनाथ हा दारु पिलेला असल्यामुळे त्याला भान राहिले नव्हते. त्यामुळे, त्याने दगड वारंवार डोक्यावर आणि तोंडावर मारुन भावास रक्तबंबाळ केले. बारुकू हे तेव्हाच बेशुद्ध पडल्याने त्यांनी फार काही प्रतिकार केला नाही. त्यामुळे, काशिनाथ यांचे वार अधिक होत गेले आणि अखेर बारुकू यांना जाग्यावर श्‍वास बंद केला.

दरम्यान, हा सर्व प्रकार पाहिल्यानंतर महिला प्रचंड घाबरुन गेल्या होत्या. त्यांनी आरडाओरड केली तेव्हा अजुबाजुचे लोक जमा झाले. त्यानी काशिनाथ याला बाजुला करुन बारुकू यांना हलवून पाहिले. मात्र, त्याच्याकडून कोणताही प्रतिक्रिया आली नाही. तर, एकाने तत्काळ ऍम्ब्युलन्स बोलविली आणि जखमी व्यक्तीस अकोले ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर डॉक्टरांनी बारकू यांना मयत घोषीत केले. दरम्यान, मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर इंदुबाई यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार काशिनाथ सोमनाथ गिर्‍हे (रा. देवठाण) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या असून सदर घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे करीत आहेत.