विद्यार्थीनीचे गुप्तांग जाळले, वारंवार सू करते म्हणून, की अत्याचार प्रयत्न.! उपचार सुरु, मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल, संगमनेरातील घाणेरडा प्रकार.!"
संगमनेर तालुक्यातील एका मुकबधीर मुलींच्या शाळात फार धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अवघ्या सात वर्षाची मुलगी वारंवर लघवी करते म्हणून तिच्या गुप्तांगावर काहीतरी ज्वलनशिल द्वव टाकून त्यास विजा होईल असे कृत्य करण्यात आले आहे. ही घटना दि. ३ ऑक्टोबर २०२२ रोजी घडला असून तो मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी लपून ठेवला होता. जेव्हा, ह्या जखमा वाढत गेल्या तेव्हा पालकांना फोन करुन त्याबाबत माहिती दिली. मात्र, जेव्हा पालकांनी या घटनेबाबत मुख्याध्यापक यांना विचारले की, ह्या जखमा कशानेतरी भाजल्याच्या आहेत. मुलीशी कोणीतरी वाईट कृत्य केले आहे. तेव्हा मुख्याध्यापक महोदयांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. तुम्हा संताप करु नका. आपण सर्व प्रकरण शांततेत मिटवून घेऊ असे म्हणून जबाबदारी टाळली. त्यामुळे, पीडित मुलीच्या पालकांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मुख्याध्यापक चांगदेव खेमनर (रा.ओझर, ता. संगमनेर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, राहुरी तालुक्यातील वडनेर शिवारात राहणार्या माऊलीच्या पोटी एक मुकबधिर मुलगी जन्माला आली होती. त्यांचा त्यांना आनंद होताच पण ती मुकबधिर असली म्हणून तिला कोंडवाड्यासारखे जगणे न देता तिला शाळा शिकविण्याचा निर्णय पालकांनी घेतला होता. तेव्हा जून २०२२ मध्ये त्यांनी तिला संगमनेर तालुक्यातील एका मुकबधिर शाळेत दाखल केलेे. मोठ्या आनंदाने ही मुलगी शिकत होती तर त्याच ठिकाणी होस्टेलवर वास्तव्य करीत होती. खरंतर, मुलीचे व्यंग, त्यात बोलता येत नाही, त्यात आर्स वडिलांपासून बाजुला राहायचे, त्यामुळे अवघ्या ७ वर्षाच्या मुलीला कधीकचे काय समजणार होते. मात्र, तरी देखील ती शिक्षणासाठी थांबली होती. मात्र, तिच्या हतबलतेचा फायदा घेणारे कोणीतरी नराधम होतेच..!
दरम्यान, त्या दिवशी मुलीचे पालक त्यांचे दैवत असणार्या एका देवीच्या पाया पडण्यासाठी गेले होते. तेव्हा मुकबधिर शाळेतून एक फोन आला, समोरून एक मॅडम बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, तुमच्या मुलीला जरा एका ठिकाणी जखमी झाल्या आहेत. त्यामुळे ती फार रडत आहे. तुम्ही येऊन तिच्याशी बोला आणि तिला घेऊन जा. त्यानंतर पालकांनी तत्काळ मुकबधिर शाळा गाठली आणि मुलीची भेट घेतली. जेव्हा ते मॅडम सोबत बोलले तेव्हा त्या म्हणाल्या. की, तिच्या गुप्तांगाला जखमा झाल्या आहेत. आम्ही तीन चार दिवसांपासून त्यावर उपचार करीत आहोत मात्र, काही फरक पडला नाही. त्या जखमा अधिक वाढत चालल्या आहेत. त्यामुळेे, हिला चांगल्या दवाखान्यात दाखवा. मात्र, ह्या जखमा झाल्या कशा? याबाबत विचारणा केली असता त्यांच्याकडून सांगण्यात टाळाटाळ करण्यात आली.
त्यानंतर पालकांनी मुलीस घेतले आणि सोनेगाव येथील एका डॉक्टरांना दाखविले. त्यांनी गोळ्या औषधे दिली. मात्र, काही फरक पडला नाही. म्हणून पुढील उपचारासाठी लोणी येथील दवाखान्यात नेले असता तेथे डॉक्टरांनी तपासले असता त्यांनी सांगितले. ह्या जखमा नैसर्गीक नाही तर त्या काहीतरी कारणास्तव करण्यात आल्या आहेत. कोणीतरी मुलीच्या गुप्तांगाशी छेडछाड करण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही पोलीस ठाण्यात जाऊन गुन्हा दाखल करा, अन्यथा आम्हला पोलिसांना सांगावे लागेल. त्यानंतर पालकांनी दि. ४ ऑक्टोबर रोजी पहिली मुकबधिर शाळा गाठली. तेव्हा तेथे मुख्याध्यापक चांगदेव खेमनर होते. त्यांना संबंधित जखमांबाबत जाब विचारला असता ते म्हणाले. तुमची मुलगी वारंवार अंथुरणात लघवी करते. त्यामुळे, त्या जखमा झाल्या असतील. तुम्ही काय हे प्रकरण वाढवू नका, आपण बसून हे प्रकरण मिटवून घेऊ. त्यांनी कोणत्याही प्रकारची माहिती दिली नाही. मात्र, वैद्यकीय अहवालानुसार ह्या जखमी कशानेतरी भाजल्याचे असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे, ही घटना फार गंभिर असून यात आद्याप मुख्य आरोपी कोण? हे उघड झाले नाही. त्याचा तपास आता पोलीस करीत आहे.