नववीत शिकणार्‍या विद्यार्थीनिवर अत्याचार.! ज्याला निवारा दिला, त्याने घात केला.! दिल्लीला चालली पण मध्येच पकडली.!

सार्वभौम (अकोले) :- 

 निळवंडे कॅनॉलच्या कामासाठी आलेल्या एका परराज्यातील तरूणान इयत्ता नववीत शिकणार्‍या मुलीवर अत्याचार केल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. हा तरुण े सुगाव खुर्द येथे कामावर असताना त्याने तिला लग्नाचे अमिष दाखवून एक मोबाईल गिफ्ट केला आणि तिला नको ती अश्‍वासने दिली. ही घटना ऑगस्ट २०२२ मध्ये सुगाव खुर्द येथे घडली असून मुलगी पळुन जात असताना तिच्या पालकांनी तिला पकडले आणि घडला प्रकार समोर आला. त्यानंतर तिने सांगितले की, मला दिवस गेले असून मला आता त्याच्यासोबतच लग्न करायचे आहे. मात्र, मुलगी अल्पवयीन असल्यामुळे पालकांनी थेट अकोले पोलीस ठाणे गाठले आणि आरोपी रामशरण मुन्नीलाल सरोज (रा. मध्यप्रदेश) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सुगाव खुर्द येथून निळवंडे धरणाचा कॅनॉल जात असल्याने तेथे युद्धपातळीवर काम सुरू आहे. तेथे महाराष्ट्रच्या बाहेरुन कामगार आणण्यात आले असून ते सुगाव खुर्द परिसरात वास्तव्यास आहेत. ते जेथे राहतात तेथे एक आदिवासी बांधवांची वस्ती असून त्यात इयत्ता नववीत शिकणारी मुलगी आहे. आरोपी याने तिच्याशी लगट केली आणि तो हिंदीतून गोडगोड बोलु लागला. मै तुजसे शादी करुंगा, तुझे मैं दिल्ली ले जाऊंगा, तुझे सबसे जादा खुश रखुंगा.! अशा प्रकारे मुलीस फुस लावून तिला रेडे परिसरात असणार्‍या खंडोबा मंदिराच्या जवळ असणार्‍या शेडमध्ये नेवून बळजबरी अत्याचार केला.

दरम्यान, पीडित विद्यार्थीनीला प्रचंड त्रास होऊ लागल्यामुळे, तिने शाळेत जाणे बंद केले. मळमळ आणि उलट्या यामुळे तिला प्रचंड त्रास होत होता. मात्र, तिने घरी कोणाला सांगितले नाही. मात्र, जेव्हा महिन्यापासून शाळेत जात नाही म्हणून आई वडिलांनी विचारणा केली. तेव्हा तिने तब्बेत बरी नाही असे म्हणून टाळाटाळ केली, उडवाऊडविची उत्तरे दिली. त्यानंतर रामशरण याने तिला एक सॅमसंग कंपनीचा मोबाईल देखील घेऊन दिला होता. त्यावर हे दोघे व्हिडिओ कॉल करणे, चॅटींग करणे, मेसेज पाठविणे आणि घरच्यांच्या विरहित बोलणे असे प्रकार राजरोस सुरू होते. मात्र, तरी देखील घडणारे प्रकार कोणाला माहित झाले नाही.

तर, पीडित मुलीस जो त्रास होत होता त्याबाबत तिने आपला प्रियकर रामशरण यास माहिती दिली होती. तेव्हा त्याने सांगितले. की, तुम टेन्शन मत लो.! हम दिल्ली जाऐंगे और वह शादी करेंगे. बाद मे सब ठिक हो जाऐंगा.! त्यामुळे दिल्लीला पळून जाण्याची तयारी देखील यांनी केली होती. तर, काही कामानिमित्त आरोपी रामशरण हा औरंगाबाद येथे गेले होता. त्याने तिकडे जाऊन २१ तारखेला दिल्लीला जाण्याचे नियोजन देखील केले होते. सप्टेंबर महिन्यात हे दिल्लीला जाण्यासाठी निघणार म्हणून आरोपी रामशरण याने तिला सांगितले होते. की, मी येतो आहे. तु सकाळी ६ वाजता घरातून निघ आणि अकोले बस स्थानकावर जाऊन थांब. त्याच्या म्हणण्यानुसार पीडित मुलगी घरातून बाहेर पडली आणि अकोल्याकडे चालती झाली.

दरम्यान, घरात मुलगी नाही म्हणून आई वडिलांनी तिचा शोध सुरू केला. तेव्हा सुगाव खुर्द गावातील काही व्यक्ती यांनी अकोल्याच्या रोडवर तिचा शोध सुरू केला असता ती रेडे परिसरात मिळून आली. जेव्हा पालकांनी विचारणा केली तेव्हा ती म्हणाली. की, माझे रामशरण याच्यावर प्रेम आहे. आम्ही एकमेकांशी संबंध ठेवले आहेत. त्यामुळे, त्याचेपासून मला दिवस गेले असून आम्ही दिल्लीला जाऊन लग्न करणार आहोत. तो अकोल्यात मला घेण्यासाठी येणार आहे. त्यामुळे मी जात आहे. त्यानंतर तिच्या पालकांनी आणि गावातील काही व्यक्तींनी समजून सांगितले असता मुलीने जे काही घडले ते सविस्तर कथन केले. त्यानंतर तिची मनस्थिती झाली असता स्वत: पोलीस ठाण्यात येऊन प्रियकर रामशरण याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तर, मुलगी गरोदर नसल्याचे नंतर वैद्यकीय अहवालात निष्पण्ण झाले आहे.