बायको निघुन गेली, बापानं पोटच्या मुलीवर अत्याचार केला.! होय.! माझा लेक असला तरी त्याला जेलात घाला.! संगमनेरात गुन्हा दाखल.
संगमनेर शहरातील अकोले नाका परिसरात पुन्हा एकदा नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. आपल्या जन्मदात्या पित्याने १५ वर्षीय पोटच्या गोळ्यावर अनेकदा अत्याचार केल्याची धक्कादायक घटना दि. १० ऑक्टोबर २०२२ रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आली आहे. घरात कोणी नसताना आपल्या मुलीशी या नराधमाने अश्लिल चाळे केले आणि आपली वासना भागविली. मात्र, जेव्हा सहा महिन्यानंतर या बालिकेच्या पोटात दुखले. तेव्हा, तिच्या आजीने तिला दवाखान्यात नेले. तेव्हा घडला प्रसंग लक्षात आला. यावेळी ज्या आईने या नराधमाला जन्म दिला. त्याच मातेने कोणताही विचार न करता पोलीस ठाणे गाठले आणि आपल्या मुलाच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तर पोलिसांनी या नराधमाच्या मुसक्या आवळल्या आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, अकोले नाका परिसरात एक कुटूंब राहते. गेल्या दहा वर्षापुर्वी आरोपी याची पत्नी त्याचे घर सोडून निघून गेली आहे. त्यांना दोन मुले असून त्या आईने त्यांचा कोणताही विचार न करता ती मुले लहान असतानाच निघुन गेली आहे. मात्र, आजीने मोलमजुरी करून त्या नातवांचा संभाळ केला. तर, मुलास देखील भाकर्या घालत होती. कारण, हा काहीच काम करीत नाही. दरम्यान, १० ऑक्टोबर २०२२ रोजी दुपारच्या वेळी नात आजीला म्हणाली. की, माझ्या पोटात फारच दुखत आहे. काही किरकोळ गोळ्या खाऊन देखील काही बरे वाटले नाही. म्हणून आजीने १५ वर्षाच्या मुलीस घेतले आणि थेट सरकारी दवाखाना गाठला. तुर्तास तेथे देखील तपासणी करण्यात आली. मात्र, पोट दुखणे काही थांबले नाही.
त्या दिवशी घरी आल्यानंतर वारंवार पोट दुखत असल्याने आजीने मुलाला विश्वासात घेतले आणि नेमकी इतके पोट का दुखते आहे. कोणी त्रास दिला का? तु वेगळे काही खाल्ले का? कोणी मारहाण केली का? असे प्रश्न विचारले असता. मुलीने एकच हांबरडा फोडला. काय आणि कसे सांगावे? हे तिला कळत नव्हते. मात्र, तरी देखील एक आधार म्हणून आजी होती. तिने घाबरत घाबरत सांगितले. की, गेल्या सहा महिन्यापुर्वी घरात कोणी नव्हते. तेव्हा माझ्यावर बळजबरी अत्याचार करण्यात आला आहे. मला तेव्हापासून प्रचंड वेदना होत आहे. मात्र, मी कोणाला याबाबत काही एक सांगितले नाही. पण, तो व्यक्ती दुसरा तिसरा कोण नसून माझा बाप आहे.
पीडित मुलीने जबाब दिले आहे. की, सहा महिन्यापुर्वी घरी कोणी नसताना बापाने माझ्यावर अत्याचार केले आहेत. जर मी घडलेला प्रकार कोणाला सांगितला. तर, मला घरातून काढून देईल किंवा काहीतरी बरेवाईट करेल. त्यामुळे, हकलून दिले तर मी जायचे कोठे? म्हणून घडलेला प्रकार मी कोणाला सांगितला नाही. पण, हा प्रकार या नराधमाने एकदाच केला नाही. तर, जेव्हाजेव्हा त्याच्यातील वासना जागी झाली. तेव्हातेव्हा त्याने हे असले नराधमी कृत्य केला होते. त्यामुळे, भितीपोटी मुलगी काही बोलु शकली नाही. मात्र, फार अती झाले आणि मुलीच्या पोटात फारच दुखत असल्यामुळे, तिने घडला प्रकार आपल्या आजीला सांगितला आणि मला या नराधमापासून वाचवा अशी विनंती केली.
दरम्यान, जेव्हा हा प्रकार आजीला समजला तेव्हा तिने हा विचार देखील केला नाही. की, आरोपी हा माझा मुलगा आहे, त्याला मी जन्म दिला आहे, त्याला एकदा माफ केले पाहिजे. उलट आजीने तळतळ व्यक्त केली. काम धंदा नसताना याला का बाड कष्ट करुन आयती भाजी भाकर खाऊ घातली. मात्र, याने पोटच्या गोळ्यावर अशा पद्धतीने कृत्य केले. त्यामुळे, आजीने थेट संगमनेर शहर पोलीस ठाणे गाठले. घडलेली हाकीकत पोलिसांपुढे कथन केली. माझा लेक जरी असला तरी त्याच्या असल्या नराधमी कृत्यांना मी पाठीशी घालणार नाही. मी स्वत: जबाब देते. त्यानंतर पोलिसांनी आजीच्या फिर्यादीहुन व मुलीच्या जबाबानुसार बापावर गुन्हा दाखल केला आहे. तर, पोलिसांनी आरोपीस बेड्या ठोकल्या आहेत.
दरम्यान, गुन्हेगारीने आता नको ती हद्द पार केली आहे. जिल्हात नात्याला काळीमा फासणार्या घटना वारंवार घडत आहे. तर, जी कुटूंब संस्कृती होती. ती नाश पावली असून प्रत्येकाला स्वतंत्र्य चुल हवी आहे. मात्र, संसार जर टिकले तर अशा प्रकारच्या घटना घडणार नाही असे वाटते. त्यामुळे, कुटुंबसंस्था, स्लम भागातील जनजागृती, शिक्षण, सक्षमता आणि सामाजिक भान यांची जाणीव होणे फार गरजेचे आहे. कारण, अशा घटनांमुळे चक्क मानसांच्या काळजाचे पाणी-पाणी होते आणि वासनांध शक्तीपुढे सगळे कसे क्षम वाटते? खरोखर मुली आपल्या घरात देखील सुरक्षित आहेत का? या जगात विश्वास तरी कोणावर ठेवावा? असे अनेक प्रश्न अनुत्तरीत राहतात...!!!