प्रेयसिने प्रियकरावर ठोकला अत्याचाराचा गुन्हा.! तिचे मुलं त्याला पप्पा म्हणत नव्हते.! औषध देवून गर्भपात केला अन लग्न न करताच निघून गेला.!

 सार्वभौम (संगमनेर) :-

 नवर्‍याने टाकून दिलेल्या महिलेला दोन मुले असताना एका तरुणाने तिच्यावर वारंवार अत्याचार केले. तुझ्या दोन मुलांसह मी तुझा संभाळ करील असे म्हणून तो तिला घेऊन गेला. एका भाड्याच्या खोलीत ठेवले आणि तात्पुरता संसार थाटला. मात्र, जेव्हा, महिलेने लग्नाची मागणी केली. तेव्हा त्याने टाळाटाळ केली. तुझी मुले मला पप्पा का म्हणत नाही म्हणून तो तिघांना मारहाण करीत होता. तर, लग्न करायचे असेल तर तुझी दोन्ही मुली पहिल्या नवर्‍याकडे सोडून ये असे म्हणून तिचा छळ करीत होता. तर महिला पुन्हा गर्भवती राहिली असता या तरुणाने तिला कोणतेतरी औषध देऊन तिचा गर्भपात केला. ही घटना संगमनेर शहरातील घुलेवाडी परिसरात २०२१ ते २२ या दरम्यान वेळोवेळी घडली आहे. आता याप्रकरणी पीडित महिलेने संगमनेर शहर पोलीस ठाण्यात जाऊन आपली कैफीयत मांडली असून याप्रकरणी मयुर विकास जेधे (रा. जेधे कॉलनी, घुलेवाडी, संगमनेर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, घुलेवाडी परिसरात एक महिला आपल्या पहिल्या नवर्‍याशी पटत नसल्याने दोन मुलांसह वडिलांकडे राहत होती. तेव्हा तिची मयुर जेधे या तरुणाशी मैत्री झाली. दोघांमध्ये नजरानजर आणि नंतर फोनवर हायबाय सुरू झाले. सन २०२१ मध्ये यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि दोघांमध्ये नको तसे चाळे देखील पुढे येऊ लागले. या दरम्यान, दोघांची प्रेम कहाणी ही संपुर्ण परिसरात एक चर्चेचा विषय ठरला होता. मात्र, तु काळजी करु नको. मी तुझ्याशी लग्न करेल. तुझ्या दोन्ही मुलांचा संभाळ करेल असे म्हणून त्याने तिच्याशी कायम लगट ठेवली आणि तिच्यावर अत्याचार करीत राहिला. लग्न करणार म्हटल्यावर महिला देखील त्याच्याशी सहमत होती. मात्र, जेव्हा ती लग्नाचा विषय काढत होती. तेव्हा करु, पाहू असे म्हणून तो टाळाटाळ करीत होता.

दरम्यान, महिलेचा रेटा वाढल्यामुळे त्याने संगमनेर शहरातील गणेशनगर येथे एक रुम भाड्याने घेऊन ठेवले होते. त्यावेळी तिच्याकडे तब्बल ९० हजार रुपये होते. हेच पैसे मयुर याने घेऊन घरभाडे देणे, घरात बाजार आणणे सुरु केले. त्याच पैशावर हा त्या तिघांचा संभाळ करीत होता. तेव्हा देखील महिलेने त्याच्याकडे लग्नाची मागणी केली. मात्र, तिला समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यावेळी पीडित महिलेची इच्छा नसताना मयुरने तिच्यावर अत्याचार केले. तर, या दोन्ही मुलांनी मयुर जेधे याला पप्पा म्हणावं म्हणून तो दोन्ही मुलांसह त्याच्या आईला मारहाण करीत होता असे फिर्यादीत म्हटले आहे.

दरम्यान, लग्नाचा विषय निघाला तेव्हा मयुर तिला म्हणाला. की, तुझी मुले मला पप्पा म्हणत नाही. त्यामुळे, तु या दोघांना तुझ्या पहिल्या नवर्‍याकडे आणि यांच्या खर्‍या बापाकडे नेवून सोड. तेव्हाच आपण लग्न करु. मात्र, महिलेने त्यास नकार दिला. त्यामुळे, यांच्यात नेहमी वाद होता होता. तर, मयुर तिला मारहाण देखील करीत असे. त्यामुळे, पीडित महिलेने दोन वेळा पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल केली होती. मात्र, पोलिसांकडून त्याबाबत कोणतीही चौकशी झाली नाही. हा प्रकार अगदी २०२२ पर्यंत सुरूच होता. लग्नाचा विषय निघाला की वाद आणि मुलांमुळे भांडण निच्छित होते. मात्र, तरी देखील महिला लग्नावर ठाम होती. मात्र, या दरम्यान देखील तो महिलेच्या इच्छेविरुद्ध अत्याचार करीत होता. असे पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

दरम्यान, २०२२ मध्ये यांच्या प्रेमातून पीडित महिला गर्भवती राहिली. दोन महिने झाल्यानंतर तीने लग्न करण्याची मागणी केली. मी गर्भवती आहे. आता तरी लग्न कर म्हणजे पुढील मार्ग सुखकर जाईल. मात्र, तेव्हा मयुर याने कोणतेतरी औषध देऊन तिचा दोन महिन्यांचा गर्भपात केला. त्यानंतर मयुर हा महिलेला प्रचंड त्रास देत होता. घरात जे काही ९० हजार रुपये होते, ते त्याने संपवून टाकले होते. त्यामुळे, तो घरभाडे देखील भरत नव्हता आणि घरात भाजिपाला व किराणा देखील आणत नव्हता. त्यामुळे, महिला वैतागून गेली होती. यामुळे, तिने पोलीस ठाणे गाठले आणि आपल्या प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.