सावध रहा.! पिचड आता तुमच्यात फुट पाडतील, तुम्ही एकोप्याने रहा.! तर कारखान्याचा तोटा विधानसभेवर होईल.! शेतकर्यांची निराशा करू नका.!
- सागर शिंदे
सार्वभौम (अकोले) :-
तुम्ही सर्वजण एक आले म्हणून, माजी मंत्री मधुकर पिचड यांचे चारपाच ठिकाणी पराभव झाले. त्यामुळे, आता तुम्ही सावध रहा.! कारण, पिचड साहेब तुमच्यात फुट पाडण्याचा प्रयत्न करतील. मी अगस्ति कारखान्याकडे विशेष लक्ष देईल. व्ही.एस.आयची एक टिम तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी देईल. आता तरी काटकसरीने कारखाना चालवा. हा आमच्या नात्यातला आणि तो पाहुणा म्हणून असे म्हणून अनावश्यक भरत्या टाळा, कमीत कमी कामगारांमध्ये जास्तीत जास्त काम कसे करता येईल ते पहा. तुम्हाला अधुनिक तंत्रज्ञानासाठी माझी टिम मदत करेल. अकोले तालुक्यातील जनतेने जो इतका मोठा विश्वास तुमच्यावर टाकला आहे. तो सार्थ ठरविण्यासाठी एकसंघ राहुन काम करा. येणार्या काळात कोण चेअरमन आणि कोण व्हा-चेअरमन हे मी सांगेल. पदांसाठी काम करु नका तर शेतकर्यांच्या हितासाठी काम करा. अशा प्रकारचे मार्गदर्शन महा. राज्याचे विरोधीपक्षनेते अजित दादा पवार यांनी शेतकरी समृद्धी मंडळाला केले. सर्व पॅनल निवडून आल्यानंतर २१ संचालकांनी पुण्यात दादांची भेट घेतली, तेव्हा ते बोलत होते.
सत्तेसाठी गायकर टार्गेट केले.!!
दादा म्हणाले की, सत्ता मिळविण्यासाठी काही लोक कोणताही थराला जाऊ शकतात. तर द्वेष काढण्यासाठी देखील काहीही चौकशा देखील लावू शकतात. सिताराम पाटील गायकर यांच्याबाबत फार आकस बुद्धीने कारवाई चालु आहे. कधी बँकेच्या चौकशा तर कधी त्यांच्या पदाच्या चौकशा, कधी पतसंस्थांच्या चौकशा तर कधी कारखान्याच्या चौकशा, ही गोष्ट काही योग्य नाही. गायकर यांच्याभोवती राजकारण फिरत असल्यामुळे त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न चालु होता. हे मी अकोल्यात आलो होतो तेव्हा पाहिले आहे. मात्र, आता झाले गेले विसरुन जा. ज्यांना टिका करायची त्यांना करूद्या, ज्यांना चौकशा करायच्या त्यांना करुद्या. अशा वागण्यामुळे उलट जनतेमध्ये चुकीचा संदेश जातो. तुम्ही कामाला लागा, चांगले आणि पारदर्शी काम करा. जनतेने फार मतांना तुम्हाला निवडून दिले आहे त्यामुळे, त्यांच्या अपेक्षा देखील फार आहेत.
कोण होणार चेअरमन, व्हा-चेअरमन.!
अगस्ति साखर कारखान्यात चेअरमन आणि व्हा.चेअरमन पदावर कोण विराजमान होणार? हा प्रश्न अनेकांना पडला आहे. मात्र, बहुजन नेतृत्व म्हणून सिताराम पा. गायकर साहेब यांचा शंभर टक्के दावा राहणार आहे. त्यांना कोणाचा विरोध देखील नसेल. मात्र, व्हा-चेअरमन पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? हा फार क्रिटीकल विषय होऊन बसला आहे. संचालक मंडळात सर्वच मातब्बर उमेदवार असून कोणाला संधी द्यायची हा फार जिकरीचा प्रश्न आहे. त्यामुळे, अजित दादा यांनी यात स्वत: लक्ष घातले आहे. कारण, आदिवासी बांधवांनी देखील फार मोठ्या आशेने पॅनल टू पॅनल मतदान केले आहे. त्यामुळे, त्यांचा देखील विचार करावा लागणार असल्याचे दादांनी नमुद केले. तर, समद्धी विकास मंडळात फार जुने जाणते व प्रतिष्ठीत नेते असल्यामुळे ही निवड वाटते तितकी सोपी होणार नाही. तरी देखील आमदार डॉ. लहामटे, सिताराम पा. गायकर आणि अशोकराव भांगरे यांनी एकमेकांना विश्वासात घेऊन निवडी कराव्यात, तुम्हाला आडचणी आल्या तर मी आहेच. असे दादांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे. मात्र, दादांपर्यंत ह्या गोष्टी न जाता येथेच प्रत्येकजण सलोख्याने प्रश्न सोडवतील असा विश्वास संचालकांनी दिला आहे.
पाहुणे आहे म्हणून लटकवू नका.!
अगस्ति कारखान्यात अनेक कर्मचारी असे आहेत. जे कारखान्यात काम करीत नाहीत. तर, फुकटचा पगार घेऊन अन्यथा कामे करीत आहे. त्यामुळे, शेतकर्यांच्या कष्टाला कातरी लागली आहे. कर्मचारी झाले जास्त अन काम होतय कमी. त्यामुळे, अजित दादा पवार यांनी सगळ्यांना एक सुचना केली आहे. की, पाहुणे आहे म्हणून कारखान्यात लटकवू नका. त्यामुळे कारखाना आणखी तोट्यात जाण्याची शक्यता आहे. तर, जे कर्मचारी काही कामाचे नाहीत. येत नाहीत, काम करीत नाहीत. त्यांचा देखील बंदोबस्त करण्याच्या सुचना दादांनी दिल्या आहेत. त्यामुळे, जो कारखान्यात आहे. त्याला कारखान्यातच काम करावे लागणार आहे. येणार्या काळात जितकी काटकसर करता येईल तितकी काटकसर अशाच पद्धतीने करावी लागेल. त्यामुळे, संचालक मंडळाला आता तरी नातेगोते आणि पुढारपण बाजुला ठेऊन कठोर भुमिका घ्यावी लागणार आहे.
व्ही.एस.आय टिम देणार.!!
राज्यातील प्रत्येक साखर कारखान्यांना एक मार्गदर्शन करण्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टीट्युट (व्ही.एस.आय) ची स्थापना करण्यात आली आहे. तेथे प्रत्येक विषयात तज्ञ व्यक्ती आहेत. नविन बेने, त्याच्या जाती, टेक्निकल गोष्टी, मॅनेफॅक्चीरिंग, कारखाना नफ्यात आणण्यासाठी काय केले पाहिजे, काय नाही. इथेनॉल प्रकल्प कसा चालवायचा, त्यासाठी लागणारे रॉ मटेरिअल, बगॅज, कामगारांचे व्यावस्थापन, शेतकर्यांना मार्गदर्शन अशा अनेक गोष्टींची सुसूत्र घडी बसविण्यासाठी अजित दादा पवार स्वत: लक्ष घालणार असून विशेष टिम अकोल्यासाठी देणार आहे. त्यामुळे, अगस्ति कारखान्यावर जे काही कर्ज झाले आहे. ते कमी काळात कसे दुर होईल आणि पुन्हा सहज कर्ज मिळण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही याकडे लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. तर, आत्ता मिळालेले ८७ कोटी रुपये अगस्ति कारखान्याला कसे प्राप्त करुन दिले, किती अडचणी आल्या हे फक्त सिताराम गायकर आणि मलाच माहित आहे. याची देखील आठवण दादांनी करुन दिली.
पिचड साहेब आणि विधानसभा..!
पिचड साहेबांच्या हातून विधानसभा, ग्रामपंचायत, जिल्हा बँक आणि आता कारखाना देखील गेला आहे. त्यामुळे, ते कोणत्याही स्थितीत संचालक मंडळाला आडचणीत आणण्याचा प्रयत्न करतील. जर, तुम्ही आडचणीत आलात तर उद्या कारखान्याचे काही झाले तर त्याचा तोटा विधानसभा निवडणुकीत होईल. त्यामुळे, प्रत्येकाने एकोप्याने काम करा. सगळ्यांना सोबत घेऊन चला. अगस्तिला नगर जिल्ह्यात फार स्पर्धक आहेत. तुम्हाला त्यांच्या तुलनेत टिकून राहण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. तर, त्यासाठी कारखान्यात काटकसर आणि पारदर्शी कारभार करणे गरजेचे आहे. पिचड साहेबांकडे सत्ता नाही. त्यामुळे, ते तुम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतील. तुमच्यात फुट पाडण्याचा प्रयत्न करतील. मी तुमच्या सोबत आहे, मात्र तरी देखील एकमेकांना सोबत घेऊन काम करा.