थोरात, तांबे नंतर आ.अमोल खताळांकडूनही घराणेशाही सुरु, भावजईचा अर्ज दाखल, महायुती फिसकली.! अनेक डमी उमेदवार.!


सार्वभौम (संगमनेर) : -

                        संगमनेर नगरपालिका निवडणूकीची आज अर्ज भरण्याची अंतीम तारीख होती.  संगमनेर सेवा समितीकडुन आ. सत्यजीत तांबे यांच्या पत्नी मैथिली ताई तांबे तर आ. अमोल खताळ यांचे भावजय सुवर्णा ताई खताळ यांचा अर्ज दाखल झाल्याने दोन्ही आमदारांची प्रतिष्ठापणाला लागली आहे. थोरात तांबे घरण्यावर घराणेशाहीचे नेहमी आरोप झाले. आता आ. अमोल खताळ यांच्या भावजय यांना उमेदवारी दिल्याने एकाच वर्षात घराणेशाही सुरू केली का? अशी टीका आता होऊ लागली आहे. खरंतर, भाजप सेना हा चळवळीतुन आलेला पक्ष आहे. येथे अनेक महिला पदाधिकारी यांनी निडर होऊन काम केले आहे. मात्र, सर्वांना डावलून नगराध्यक्ष पदासाठी सुवर्णा ताई खताळ यांना उमेदवारी दिल्याने आ. खताळ हे घराणेशाहीत अडकले असल्याची चर्चा होत असुन महायुतीतील कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर नगरपालिकेतुन यावेळी पंजा हटणार असल्याचा आता शिक्कामोर्तब झाला आहे. आता या दोघांच्या घराणेशाहीच्या चुरशीत कोण बाजी मारते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.    

दरम्यान, अहिल्यानगर जिल्हा सोयरे-धायरे एकमेकांचे नातेवाईक घराणेशाही याने महाराष्ट्रातील राजकारणात प्रसिद्ध आहे. असे असले तरी नव्याने आलेले शिवसेनेचे आ.अमोल खताळ हे देखील मागे राहिले नाही. त्यांनी देखील घराणेशाहीचा अजेंडा चालवल्याचे उघडपणे आता दिसुन आले आहे. त्यांनी संगमनेर नगरपालिकेत आपल्या भावजयी सुवर्णाताई खताळ यांचा उमेदवारी अर्ज भाजप शिवसेना युतीत भरला आहे. महायुतीतील अनेक महिला पदाधिकारी यांना संगमनेर नगरपालिकेचे डोहाळे लागले होते. यासाठी ते पायाला भिंगरी लावुन शहरातील काना कोपऱ्यापर्यंत पोहोचले होते. सार्वजनिक कार्यक्रम गणपती उत्सव, नवरात्री, दहीहंडी यांमधून ते जनतेपर्यंत पोहचत होते. मात्र, अचानकपणे सुवर्णा ताई खताळ यांचे नाव समोर आले. आणि राजकीय वर्तुळात सर्वांच्या भुवया उंचावल्या. यामुळे भाजप महिला पदाधिकारी यांच्यामध्ये नाराजीचा सुर असल्याचे पाहायला मिळत असुन तशा भाजपच्या सोशल मिडीया मधुन प्रतिक्रीया देखील उमटत आहे. खरंतर, आ. अमोल खताळ यांच्या पत्नी निवडणुकीच्या रिंगणात असत्या तर शिवसेनेला नक्कीच फायदा झाला असता. ते सर्वांच्या सुख दुःखात असुन जनतेच्या समस्या सोडवताना दिसुन येत होत्या. निलम ताई खताळ यांनी शहरातील लोकाभिमुख कामे व सामाजिक कार्यामधुन आपली छाप सोडली होती. मात्र, सुवर्णा ताई खताळ यांचा उमेदवारी अर्ज भरल्याने नगरपालिकेच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट आला आहे.

         खरंतर, चाळीस वर्षानंतर विधानसभेला परिवर्तन झाले. आ. अमोल खताळ हे निवडून आले. माजी महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर वर्षानुवर्षे घराणेशाहीचा आरोप करून त्यांचा पराभव केला. त्यामध्ये सेना बिजेपीच्या कार्यकर्त्यांनी मोठे यश मिळवले. आता निष्ठावंत सेना बिजेपीच्या कार्यकर्त्यांना संधी मिळणार असे सर्वांना वाटु लागले. परंतु, झाले काय.! पुन्हा थोरात तांबे यांची घराणेशाही बरोबर खताळशाही सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. थोरात तांबे कुटुंबाचे निष्ठावंत राहिलेल्या कार्यकर्त्यांना देखील महायुतीकडुन संधी दिली गेली. आणि निष्ठावंतांना वंचित ठेवले गेले. तर संगमनेर सेवा समिती कडून वारंवार एकच उमेदवारांना संधी दिल्याने नाराजी सुर उमटल्याचे पाहायला मिळाले. संगमनेर सेवा समितीकडुन ज्यांना डावले गेले त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. मात्र, हे निवडणुकीच्या शेवट पर्यंत अर्ज ठेऊन स्वतःची ताकत दाखवतात की, अर्ज माघारी घेतात हे देखील पाहणे आता उत्सुकतेचे ठरले आहे.

 महायुतीत बिघाडी, राष्ट्रवादी निवडणुकीच्या रिंगणात

महायुतीकडुन एकास एक उमेदवार मिळतील असे वाटत असताना राष्ट्रवादीने आपले चौदा उमेदवारांचा अर्ज भरून नगराध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज देखील भरला आहे. जिल्हाअध्यक्ष कपिल पवार यांच्या पत्नी सौ.रुपाली पवार यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यांनी ओबीसी, मुस्लिम, मागासवर्गीय या सर्व समाजातील घटकांना संधी देऊन आपले नशीब आजमावत आहे. आता हे देखील शेवट पर्यंत अर्ज माघार घेणार नाही. की, महायुतीसोबत जातील हा येणारा काळच ठरवेल. मात्र, वारंवार महायुतीकडुन बैठका घेऊन देखील महायुतीत बिघाडी झाल्याचे पाहायला मिळाले. याचा फटका मतात कोणाला बसतो. हे देखील पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.