बाबो.! संगमनेरात पोलीस अधिकार्‍याकडून शिक्षकाकडे दोन लाखांची मागणी.! खोट्या गुन्ह्यात अडकविल्याने शिक्षकाचा लढा सुरू.!

    


सार्वभौम (संगमनेर) :-

        एका शिक्षकावर अपहाराचा गुन्हा दाखल झाला आणि तेव्हापासून त्याच्या आयुष्याची फरपट सुरू झाली. त्यांचा काहीच दोष नसताना लाखो रुपये त्यांच्या नावे दाखविले आणि एका संस्थाचालकाने आर्थिक व राजकीय आकसापोटी शिक्षकाला जगणे मुश्लिल केले. आता हा त्यांचा वैयक्तीक वाद आपण समजू शकतो. मात्र, याच गुन्ह्यात एक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी देखील शिक्षकाचे लोचके तोडण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. तुम्ही शिक्षक आहात, तुमच्या नोकरीचा प्रश्न आहे, समोरचे फिर्यादी आम्हला चार-पाच लाख रुपये देत आहेत, तुम्ही दोन लाख रुपये द्या. अशा प्रकारची लाच वर्दीतल्या अधिकार्‍यांनी मागितल्याचे तक्रारीत म्हटले आहे. आता अधिकारीच लाच मागत असतील तर यांच्याकडे न्याय मागावा तरी कसा? विशेष म्हणजे, गुन्हा दाखल होऊन आठ महिने होवून गेले. तरी गुन्ह्याचे दोषारोपपत्र दाखल नाही. तुमचे भविष्य आमच्या हाती आहे असे म्हणत वर्दीतले भ्रष्टाचारी रात्री अपरात्री शिक्षकाच्या घरी जातात आणि पैशासाठी तगादा लावतात. आता हा सर्व प्रकार एका सीसीटीव्ही कॅमेरॉत कैद झाला आहे. हे खुद्द "ठाकरे" सरकारच्या काळातील करामती आहेत. त्यामुळे, शिक्षकाने पोलीस अधिक्षक यांच्याकडे तक्रार केली होती. आता पुन्हा पोलीस महानिरीक्षक आणि लाचलुचपत विभाग यांच्याकडे तक्रार केली आहे. त्यामुळे, माझ्यावर अन्याय झाला आहे. जर मी दोषी असेल तर मला भर चौकात फाशी द्या.! पण, एखाद्याला उध्वस्त करण्यासाठी अशा प्रकारचे षडयंत्र रचून संपवू नका. अशा प्रकारची भावना भरल्या डोळ्यांनी एका पीडित व्यक्तीने सार्वभौम समोर मांडली. तर, न्यायासाठी अॅड. शिवाजी आण्णा कराळे पाटील यांच्या मदतीने त्यांनी कोर्टाचे दरवाचे ठोठावले आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, गेल्या आठ महिन्यांपुर्वी संगमनेर तालुक्यातील कोळवाडी परिसरात एक अपहाराची घटना घडली होती. दुर्दैवाने खोटे गुन्हे दाखल इतके तत्काळ दाखल होतात. की, खर्‍याला आपली बाजू देखील मांडू दिली जात नाही. या गुन्ह्यात देखील एका राजकीय व्यक्तीने हस्तक्षेप केला आणि शिक्षकाच्या सामाजिक आयुष्याला काळीमा लावण्याचे भाग्य काहींनी आपल्या भाळी लावले. मागासवर्गीय कुटूंबातून विशेषत: होस्टेलवर शिकून स्वत:ला सिद्ध करणार्‍या व्यक्तीने एक सामाजिक काम होती घेतले आणि त्यात अगदी नियोजनपुर्वक त्यांना फसविण्यात आले. एका संस्थेचे बेकायदेशिर ऑडीट आणि नियुक्त्या करुन लाखो रुपयांचा खर्च या शिक्षकाच्या माथी मारला. जो शिक्षकाने खर्च केला, त्याचा पै ना पै त्यांनी कोर्टासमोर मांडला आहे. त्यामुळे, त्यांच्यावर आता नेमकी काय आरोप करायचा असा प्रश्न पोलिसांना आहे. मात्र, गुन्हा दाखल झाला आणि शिक्षकाला प्रचंड मानसिक त्रास झाला.

दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना काळ्या कोटाकडून चुकीचे मार्गदर्शन लाभले आणि त्यांनी स्वत:ला बंधीस्त करुन घेतले. पण, जर मी काही केलेच नाही. जे आरोप केले आहे त्याचे कागदोपत्री पुरावे आहेत. जो खर्च झाला आहे तो यांनी संस्थेपेक्षा पहिले स्वत: खर्च केला आहे. तसे पुरावे देखील आहेत. असे असताना गुन्हा दाखल होणे, किंवा स्वत:चे मत मांडण्याची संधी देखील न मिळणे हा खर्‍या अर्थाने त्यांना अन्याय वाटला आणि ते स्वत: पोलिसांना शरण आले. आता हे महाशय शिक्षक त्यामुळे, वर्दीला चालुन बकरा आला होता. त्यांनी वारांवर यांना त्रास द्यायला सुरुवात केली. नको-नको त्या धमक्या आणि कायद्याची भिती. त्यामुळे, जगावं की मरावं? इतकी हतबलता शिक्षकाच्या मनात नांदत होती. आपण मेलो तर लोक गुन्हेगार म्हणतील त्यामुळे मरण्यापेक्षा स्वत:ला सिद्ध करू असे त्यांनी ठरविले आणि संघर्ष सुरु केला. 

विशेष म्हणजे शिक्षक महोयदय यांनी एका पुढार्‍यासाठी दिवसरात्र काम केले. मात्र, न्याय मागण्याची वेळ आली तर बेशक हात वर झाले. उलट गुन्हा दाखल करुन धडा शिकविण्यासाठी हातभार लागला. अर्थात हे असले कुभांड मांडणारे दुसरे तिसरे कोणी नव्हते. आपलेच होते जवळचे. त्यामुळे, हाक ना बोंब निमुटपणे स्वत:ला सिद्ध करण्यापलिकडे मार्ग नव्हता. पाच दिवस पोलीस कोठडी मिळाली आणि नंतर बाहेर आल्यानंतर आपला समाज कसा आहे? प्रशासन कसे आहे? आपण आपले म्हणतो ते कसे आहेत? हे काही नव्याने सांगण्याची गरज नाही. त्यामुळे, हे सर्व अपमान सोसत या शिक्षकाने आता कायदेशिर लढाई सुरू केली आहे. स्वत:ला सिद्ध करणे हाच त्यांच्या आयुष्यातील हेतू शिल्लक राहिला आहे. मात्र, असे खोटेनाटे गुन्हे घडत राहिले तर लोकांचा समाजसेवेकडे बघण्याचा दृष्टीकोण बदलुन जाईल. कारण, रस्त्यावर बेवारस पडलेल्यांना स्वत:च्या आश्रमात नेवून त्यांना नवं आयुष्य बहाल करणार्‍या अक्षय बोर्‍होडे यांना देखील प्रचंड त्रास दिला गेला आणि त्यांनी आपल्या कामाला पुर्णविरोम दिला होता. असेच होत राहिले तर प्रेम, भावना, सहकार्य हे या भारतीय संस्कृतीतून हद्दपार होईल याचे भान खोटारड्या मानसांनी ठेवले पाहिजे. तरी देखील येथे केले ते येथेच फेडायचे आहे. अशा प्रकारच्या भावना शिक्षकांने व्यक्त केल्या.

यात दु:ख या गोष्टीचे आहे. की, ज्याच्यावर अन्याय झाला त्याने न्याय मागितला तर त्याला लाखो रुपये मोजावे लागतात. हे चित्र संगमनेरात उघड होऊ लागले आहे. शिक्षकाने हातबल होऊन पोलीस अधिक्षक, पोलीस महानिरीक्षक, लाचलुचपत विभागाला तक्रार केली आहे. की, संगमनेर तालुक्यातील एक अधिकारी हे प्रचंड त्रास देत आहेत. त्यांच्यासोबत आणखी एका पोलीस कर्मचार्‍याने देखील जगणे मुश्किल केले आहे. रात्री अपरात्री आमच्या घरी येणे आणि आमच्या चहापाण्याचे बघा म्हणून पैशांची मागणी करणे. तुम्ही नोकरीला आहात नाहीतर आम्ही आमच्या पद्धतीने दोषारोप पत्र तयार करून तुमचे बांधकाम पक्के करु. तुमच्या विरोधातील लोक आम्हाला चार ते पाच लाख रुपये देत आहेत. तुम्ही किती देता? तुम्ही 2 लाख रुपये द्या नाहीतर तुमची आख्खी पॉपर्टी जप्त करु तो अधिकार पोलिसांना आहे. तुमच्या नोकरीचा प्रश्न आहे अशा प्रकारे दमदाटी करतात, धमकवितात, रात्री अपरात्री घरी येतात 10 ते 11 वाजता दरवाजे वाजवितात. हे सर्व प्रकार मनाचे नव्हे.! तर, सीसीटीव्हीत देखील कैद आहेत. त्यामुळे, मी संपण्यापुर्वी हे हा सर्व त्रास संपावा अशी माझी विनंती आहे. याबाबत संबंधित शिक्षकाने न्यायालयीन व प्रशासकीय पातळीवर लढा उभा केला आहे. त्यांना यश येईल यात शंका नाही.!