बकाले नको तेच बकले.! एलसीबी पीआयचे तडकाफडकी निलंबन, बडतर्फीची प्रक्रिया सुरु.! मराठा समाजाविषय अगदी गलिच्छ वक्तव्य.!
सार्वभौम (महाराष्ट्र) :-
जळगाव जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले याने मराठा समाजाविषयी अतिशय गलिच्छ भाषेचा वापर करुन संबंध मराठा समाजाच्या भावना दुखतील अशा प्रकारचे वक्तव्य केले. एका जबाबदार पदावर असताना त्यांच्याकडून अशा प्रकारचे वक्तव्य निघणे हे खरंतर पोलीस खात्यासाठी लाजिरवाणी बाब आहे. मात्र, यात पोलीस खात्याचा दोष नसून व्यक्ती आणि त्यांच्यातील प्रवृत्तीचा दोष आहे. त्यामुळे, जळगाव पोलीस अधिक्षक प्रविण मुंडे यांनी अगदी मोठ्या मनाने मीडियापुढे येऊन संबंध मराठा बांधवाशी संवाद साधून दिलगिरी व्यक्त केली आहे. एवढेच नव्हे.! बकाले प्रवृत्ती ठेचून काढण्यासाठी त्यांनी या पोलीस निरीक्षकाचे निलंबन देखील केले असून. क्लिप खरी की खोटी हे तपासून त्याच्या बडतर्फीसाठी कायदेशिर प्रक्रिया देखील सुरू केली आहे. जर त्यांच्यावर पोलीस प्रक्रियेनुसार कारवाई झाली तर त्यांना खात्यातून काढणे शक्य आहे. अन्यथा घाई-घाईने सरकारने निर्णय घेतला तर मात्र मॅट कोर्टातून त्यांना पुन्हा खात्यात येण्याची संधी राहू शकते. त्यामुळे, आता पोलीस खात्यावर विश्वास ठेऊन राज्यात कोणी पोलिसांवर दबाव अणू नये म्हणजे झाले. अन्यथा कागदांशिवाय झालेला निर्णय येणार्या काळात न्यायात्मक ठरणार नाही. त्यामुळे, मराठा बांधवांने आता संयमाने घेतले पाहिजे. आता दि. १६ सप्टेंबर २०२२ रोजी सकल मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते नगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांना भेटून वादग्रस्त विधान करणाऱ्या पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले याच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी. या मागणीसाठी राजेंद्र भोसले यांना निवेदन देऊन करण्यात येणार आहे.
सदर घटनेप्रकरणी विनोद पंजाबराव देशमुख (वय ४९, जात मराठा, व्यवसाय बांधकाम व्यवसाय, रा. १२, मधुवन, महाराष्ट्र बैंक कॉलनी, महाबळ, रिक्षा स्टॉपजवळ, जळगाव) यांनी पोलीस निरिक्षक किरणकुमार बकाले याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्यात म्हटले आहे. की, आरोपी यांनी सरकारी नौकर व जबाबदार पदावर असतांना आपल्या सहकारी अंमलदाराशी फोनवर बोलतांना मराठा समाजाबद्दल अतिशय घृणास्पद व आक्षेपार्ह वक्तव्य केले. यात फिर्यादी हे मराठा समाजाचे असल्याने मराठा समाजामध्ये द्वेषाच्या व दुष्टत्वाच्या भावना वाढविण्याचा प्रयत्न करुन सार्वजनिक शांतता बिघडविण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच कोणत्याही जात धर्मांचे स्त्रियांवर अश्लिल शब्दांचा उच्चार करुन त्यांना लज्जा उत्पन्न होईल असा उच्चार केला. म्हणुन गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यात बकाले यांच्यावर कलम १५३ (A), १५३ (B), १६६, २९४, ५०० व ५०९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
मोबाईल आणि त्यातून निघणार्या व्हिडिओ-ऑडिओ क्लिप ह्या काही आपल्याला नव्या नाहीत. दुर्दैवाने अशा घटना वारंवार घडून देखील कोणी तोंडावर आवर घालण्यास तयार नाही. त्यामुळेच आता किरणकुमार बकाले हे देखील क्लिपच्या गळाला लागले आहेत. काही झाले तरी त्यांच्या असल्या घाणेरड्या शब्दाचे कोणीच समर्थन करू शकत नाही. त्यांच्या बोलण्यामागिल भावना ही श्रेय्यवादाची असली तरी त्याला जे काही उदाहरण प्रमाण म्हणून दिले. त्याचे समर्थन कोणीच करु शकत नाही. मात्र, आता पोलीस अधिक्षक यांनी याबाबत खंत व्यक्त केली आहे. तर, बकाले यांना निलंबित देखील केले आहे. त्यामुळे, राज्यभर मराठा बांधवांनी जे काही आंदोलन सुरू केले आहे. पोलीस खात्याबाबत जी काही नाराजी व्यक्त केली आहे. ती सहाजिक असली तरी कोणी कायदा व सुव्यस्था हाती घ्यावा आणि सामाजिक विपक्ष परिस्थिती निर्माण व्हावी हे पोलीस खात्याला तथा प्रशासनाला अभिप्रेत नाही. त्यामुळे, त्यांनी आता निलंबन केले असून पहिली प्राथमिक चौकशी (पीई), नंतर विभागीय चौकशी (डीई), त्यानंतर पोलीस अधिक्षक हे आयजी महोदयांना अहवाल पाठवतील. तो नंतर गृहविभाग तथा सरकारला प्राप्त होईल आणि त्यानंतर किरणकुमार बकाले यांचे म्हणणे ऐकूण घेतल्यावर त्यांच्यावर खात्यातून काढून टाकणे तथा बडतर्फीची कारवाई होईल. दरम्यान, या सगळ्या प्रक्रियेतून जर कायदेशिर व कागदोपत्री गेले. तर मात्र बकाले यांना पुन्हा खात्यात येण्याचे चान्सेस नाही. अन्यथा आहेत मॅट कोर्ट आणि नंतर पुन्हा हजर. त्यामुळे, कारवाईसाठी कोणी कायदा हाती घेऊन पोलिसांवर दबाव आणला नाही. तर, अशा प्रकारे जातीवर जाणारे अधिकारी पुन्हा खाक्या वर्दीत दिसणार नाहीत. ह्या कायदेशिर बाबी लक्षात घेतल्या पाहिजे.
नेमकी काय झाले होते.?
खरंतर किरणकुमार बकाले यांच्या काळात जळगावमधील मोठमोठे गुन्हे उघडकीला आले होते. एकंदर कार्यकिर्द चांगली होती. जेव्हा मुक्ताईनगर येथे एक खून झाला होता. त्या गुन्हाची उकल करण्यात स्थानिक पोलिस अधिकार्यांना यश आले नव्हते. मात्र, जेव्हा तेथे बकाले यांचे (एलसीबी) पथक गेले. तेव्हा त्यांनी या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला पकडून स्थानिक पोलिसांच्या ताब्यात दिले. अर्थात अशा प्रकारच्या कारवाया ह्या संयुक्त दाखविल्या जातात. मात्र, मुक्ताईनगर येथून ज्या काही बातम्या छापून आल्या. त्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला फारसे महत्व दिले गेले नाही. त्यामुळे, एका व्यक्तीने बाकले यांना फोन केला आणि आपल्या तुम्ही केलेल्या कारवाईला त्यांनी स्वत:च्या नावे दाखविल्याचे पटवून देण्याचा प्रयत्न केला. तेव्हा, या दोघांच्या संभाषणात चर्चा ही थेट जातीय गोष्टीवर गेली आणि बकाले हे मराठा समाजाबाबत नको ते बकले. फोन करणारा देखील हो सर..., हो सर... म्हणत त्यांच्या सुरात सुर मिळवत गेला आणि बकाले बकत गेले. अखेर संबंधित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आणि बोलबोल करता संबंध मराठा समाज बकालेच्या विरोधात पेटून उठला. अर्थात ही घटना केवळ श्रेय्यवादाची होती. मात्र, बोलता बोलता विषय कोठून कोठे गेला आणि त्याने राज्य पेटले.
पोलिसांना नावे ठेवणे चुकीचे.!
खरंतर खाकी वर्दी हा एक परिवार आहे. त्यात जात, धर्माला स्थान नाही. मात्र, दुर्दैवाने येथे पोष्टींग असेल, बदल्या असतील यात जातीयतेचा वास आल्याचे अनेकदा आरोप झाले आहेत. मात्र, हे वर्दीच्या संस्कारलाच नव्हे भारतीय संस्कृतीला कलंक आहे. अर्थात व्यक्ती तितक्या प्रवृत्ती. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत असे आपण शाळेत असल्यापासून प्रार्थना म्हणतो. मात्र, तसे वागतो का? तर मुळीच नाही. तसेच पोलीस खात्याचे आहे. प्रत्येकजण वर्दीशी प्रामाणिक राहतोच असे नाही. प्रत्येकजण धर्मनिर्पेक्ष असतो असे नाही. प्रत्येकजण सद्रक्षणाय खलनिग्रहणाय अंगिकारतो असे नाही. परंतु, जर शंभर पोलीसांमध्ये 5 व्यक्ती नालायक असतील तर 95 लोकांवर चिखलफेक करणे चुक आहे. त्या पाच लोकांच्या चुकीवर बोट ठेवताना 95 पोलिसांनी जी चांगली कामे केली. ती देखील आठवली पाहिजे. त्यामुळे, एकट्या बकले यांच्या चुकीमुळेे आपण कोणत्या सामाजाला नावे ठेऊ नये किंवा वर्दीला तुच्छ लेखु नये. मात्र, बकाले यांना अधिकाचे काय शासन करता येईल. त्यांना निलंबनाच्या व्यतिरिक्त बडतर्फ कसे करता येईल, अधिक कठोर कारवाई कशी करता येइल याकडे लक्ष दिले पाहिजे. तर, कोणीही कायदा हातात न घेता जे कायदा शिकवितात, त्याची अंमलबजावणी करतात त्यांना देखील त्याच कायद्याने उत्तर दिले पाहिजे. ना की पोलीस वर्दीला नावे ठेऊन एकामुळे सगळ्यांना दोषी धरले पाहिजे हे चुकीचे ठरेल.
पोलिसांना शहाणपण कधी येणार.!
गेल्या कित्तेक वर्षापासून मोबाईल रेकॉर्डीगमुळे कधी हाप्तेखोरी उघड होत आहे तर कधी दोघांमधील खाजगी संभाषण व्हायरल होते आहे. त्यामुळे, अनेकांना बदली, बडतर्फी आणि निलंबनला सामोरे जावे लागले आहे. एव्हाना गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र, तरी देखील पोलीस असो वा सरकारी कर्मचारी हे फोनचा अतिरिक्त वापर टाळण्याचे नाव घेत नाही. विशेष म्हणजे मानवी प्रवृत्ती इतकी घातक आहे. की, जो काल जवळ होता. तो उद्या नाराज होतो आणि नंतर त्याच्याकडील पुरावे तो व्हायरल करतो. एव्हाना अनेक व्यक्ती ह्या अधिकार्यांना बदनाम आणि ब्लॅकमेल देखील करीत असतात. मात्र, तरी देखील पोलीस खात्याला फोनचा मोह आवरत नाही. अर्थात हे पोलिसांना सुचक विधान असले तरी जो कोणी जात, धर्म, परंपरा यांवर बोलत असेल तर त्यांचे असे हाल झालेच पाहिजे. परंतु जेव्हा आर्थिक देवाण घेवाणीचा प्रश्न येतो. तेव्हा कोणी भ्रष्टाचार संपविण्याचा ठेका घेतलेला नसतो. तर, तोच मुळाच आतृप्त आत्म असतो. मनाजोगे होत नाही म्हणून ते उचलेले पाऊल असते. त्यामुळे, अशा व्यक्तींपासून सावध राहणे आणि भ्रष्टाचारमुक्त जगण्याचे शहाणपण वर्दीला येवो.!!