लग्नात मानपान आणि पाच लाख दिले नाही म्हणून छळ.! चार महिन्यात मुलीची आत्महत्या, पती व सासुवर गुन्हा.! न सांगता गर्भपात केला.!

     


सार्वभौम (अकोले) :-

        लग्नात सासुला मानपान दिला नाही आणि संगमनेरात घर बांधण्यासाठी पाच लाख आणले नाही. म्हणून अवघ्या चार महिन्यात नवरीला सळो का पळो करुन सोडले. मुलगी निट वागत नाही, ती तंबाखु खाते, व्यवस्थित रहात नाही अशा प्रकारे आरोप करुन तिला शारिरीक व मानसिक त्रास देण्यात आला. तर, अवघ्या महिनाभराचा गर्भपात करुन तिच्यावर योग्यते उपचार केले नाही. म्हणून मुलीने विहिरीत जीव देवून आपली जीवणयात्रा संपविली. ही घटना गुरूवार दि. 15 सप्टेंबर 2022 रोजी 4 वाजण्याच्या सुमारास घडली. यात सोनाली मयुर एखंडे (रा. टाहाकारी, ता. अकोले) असे मयत महिलेचे नाव आहे. तर, घटनेनंतर विजय एकनाथ आंबरे (रा. गणोरे, ता. अकोले) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मयुर हौशीराम एखंडे व सासु मंगल हौशिराम (रा. टाहाकारी, ता. अकोले) या दोघांना आरोपी करण्यात आले आहे. यात पोलिसांनी इजिनिअर असणाऱ्या मयुर यास अटक केली असून त्यास पाच दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, गणोरे येथे राहणारे शेतकरी विजय आंबरे यांनी त्यांची मुलगी सोनाली हिचा विवाह मयुर एखंडे याच्याशी दि. 20 मे 2022 रोजी लावून दिला होता. त्यानंतर 20 दिवस  होते कोठे नाही तोच एखंडे परिवाराने त्यांचे गुण दाखवायला सुरूवात केली. तुझ्या बापाने आमचा लग्नाच मानपान केला नाही, योग्यतो पाहुनचार केला नाही. म्हणून मानसिक त्रास देण्यास सुरूवात केली. हे सर्व मुलगी निमुटपणे एकूण घेत होती. कारण, सासु म्हणाली होती. घरातील वाद जर कोणाला सांगितले तर तुला मी नांदू देणार नाही अशी धमकी दिली. त्यानंतर चारदोन दिवसात मुलगी माहेरी आली असता तिने सासुचे बोल आपल्या आई वडिलांच्या कानी घातले. मात्र, त्यांनी देखील तिला समजून सांगितले. संसार आहे त्यामुळे हे सर्व चालुच राहणार आहे. तु त्याकडे दुर्लक्ष कर, हे नव्याचे नऊ दिवस आहे. येणार्‍या काळात सर्व काही निट होईल. त्यानंतर वडिलांनी तिला पुन्हा सासरी नेऊन घातले.

दरम्यान, सोनालीचा पती मयुर तिला म्हणाला. की, आपली संगमनेर येथे जागा आहे. आपण तेथे घर बांधु त्यामुळे तु तुझ्या वडिलांकडून पाच लाख रुपये घेऊन ये. मात्र, सोनालीने घराच्यांकडे अशा प्रकारची मागणी केली नाही. परंतु, पती आणि सासु यांनी पैशासाठी वारंवार तगादा लावला आणि मुलीस शारिरीक व मानसिक त्रास दिला. या सर्व गोष्टी मुलगी माहेरी सांगत होती. मात्र, आज उद्या सर्व व्यवस्थित होईल या आशेवर ते होते. त्यानंतर दि. 3 सप्टेंबर 2022 रोजी सोनालीला दिवस गेले होते. त्याची खात्री करण्यासाठी ती गणोरे येथे आली होती. तेथे एका डॉक्टरांकडे नेले असता ती गरोदर असल्याची खात्री झाली. जेव्हा तिला पुन्हा नेवून सोडले तेव्हा तिच्या सासुने सोनालीकडील मोबाईल काढून घेतला. आई बापाला फोन करु नये म्हणून तिला धमकी दिली. मात्र, तरी देखील मुलीने दि. 14 सप्टेंबर 2022 रोजी वडिलांना फोन केला. तेव्हा ती म्हणाली की, माझ्या पोटात दुखत आहे. मात्र, नवरा आणि सासु हे माझ्यावर उपचार करीत नाहीत. म्हणून वडिलांनी सासु व जावई यांना फोन करुन उपचार करण्यासाठी विनंती केली. त्यानंतर त्यांनी थोडाफार उपचार केला.

दरम्यान, दि. 15 सप्टेंबर 2022 रोजी विजय आंबरे यांनी मुलीस फोन केला होता. तेव्हा ती रडत होती. कारण, पती व सासु हे तिच्याकडे पाच लाख रुपये मागत होते. जोवर पैसे येत नाही तोवर तिला प्रचंड शारिरीक व मानसिक त्रास दिला जात होता. तर, सोनाली गरोदर असल्यामुळे तिला माहित न होता अ‍ॅबोरशन होण्याच्या गोळ्या दिल्या होत्या. त्यामुळे, तिला प्रचंड त्रास होत होता. जेव्हा, वडिलांनी सासुला फोन करुन विचारले की, मुलीवर उपचार करण्यासाठी तिला घेवून जातो. तेव्हा सासुने मुलावर लोटून दिले. जावयाचा फोन लागला नाही म्हणून यांनी थेट टहाकारीचा रस्ता धरला. मात्र, नागवाडी येथे असताना मुलगी आणि जावई यांची भेट झाली. त्यानंतर यांनी समशेरपूर येथे येऊन एका डॉक्टरकडे उपचार घेतले. तेव्हा तेथे सासु देखील होती. ती म्हणाली की, तुमची मुलगी व्यवस्थित रहात नाही. ती तंबाखु खाते, काम निट करीत नाही. तुम्हाला पाच लाख मागितले, ते देखील तुम्ही देत नाही. तेव्हा वडिल म्हणाले की मी माझ्या मुलीला घेऊन जातो. मात्र, तेव्हा ही दोघे म्हणाले की, आम्ही मुलीला माहेरी पाठविणार नाही.

दरम्यान, यांच्यातील आरोप प्रत्यारोपानंतर मुलीचे वडिल हातबल होऊन पुन्हा गणोरे येथे निघुन आले. त्यानंतर लागेच विजय आंबरे यांना त्यांची बहिनीचा फोन आला. त्या म्हणाल्या की, सोनालीच्या सासुचा फोन आला होता. त्या सोनाली बाबात फार वाईट-वाईट बोलत होती. आपल्या मुलीचे आत्ताच असे आहे. तर, पुढे काय होईल या चिंतेत बाप असताना त्यांना सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास पुतनीच्या सासर्‍यांचा फोन आला. त्यांनी सांगितले की सोनाली ही 4 वाजल्यापासून घरी नाही. तिचा शोध घेतला मात्र ती मिळून आली नाही. मात्र, तिच्या चपला एका विहिरीच्या कडेला पडलेल्या आहेत. तेव्हा आहे त्या परिस्थितीत वडिलांनी घाईघाईने थेट टहाकरी गाठली. तेव्हा त्यांना समजले की मुलीने विहिरीत जीव दिला आहे. त्यानंतर तिचा मृतदेह बाहेर काढला आणि त्याचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक मिथुन घुगे पुढील तपास करीत आहेत.