बाबो.! सौराटमधील आर्चीचा भाऊ प्रिसने, संगमनेरात बनावट कागदपत्रे व राजमुद्रा तयार केली.? मंत्रालयात नोकरीचे अमिष, दोघांना अटक.!
सार्वभौम (संगमनेर) :-
मंत्रालयात सामाजिक न्याय विभागात सहायक कक्षाधिकारी म्हणून दोन जागा रिक्त झाल्या आहेत. तेथील अधिकारी हे कोरोना काळात मयत झाले असून त्या जागा भरणे आहे. असे सांगून श्रीरंग कुलकर्णी म्हणून एका व्यक्तीने फोन केला आणि नेवासा तालुक्यातील महेश बाळकृष्ण वाघडकर (रा.भेंडा) याच्याकडे पाच लाख रुपयांची मागणी केली. त्यातील दोन लाख रुपये याने दिले आणि ऑर्डर हाती आल्यानंतर तीन लाख देणे ठरले होते. मात्र, हा सर्व कारभार संगमनेर येथून घडल्याचे उघड होऊ लागले आहे. इतकेच काय.! तर, यात चक्क सैराट चित्रपटातील आर्चीचा भाऊ प्रिंन्स याच्यापर्यंत धागेदोरे गेल्याची माहिती हाती आली असून राहुरी पोलिसांनी त्याबाबत प्रचंड गोपनियता पाळली आहे. तर, याबाबत मुद्दाम माहिती देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे, आता यात नेमकी पोलीस काय लपवत आहेत? की काही अर्थपुर्ण तडजोड होत आहेत अशा उलटसुलट चर्चा रंगु लागल्या आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, महेश बाळकृष्ण वाघडकर (रा.भेंडा, ता. नेवासा,जि.अ.नगर) याला दि. 3 सप्टेंबर 2022 रोजी एक फोन आला होता. समोरचा व्यक्ती म्हणाला. की, मी श्रीरंग कुलकर्णी सामाजिक न्याय विभाग मंत्रालयातून बोलत आहे. आमच्या विभागात कोरोनामुळे दोन जणांचा मृत्यु झाला आहे. त्यांच्या सहायक कक्षाधिकारी म्हणून जागा खाली असून त्या भरायच्या आहेत. तेथे तुम्ही इच्छुक असाल तर तुम्हाला पाच लाख रुपये द्यावे लागतील. काम होण्यापुर्वी दोन लाख आणि जेव्हा तुमच्या हातात ऑर्डर तयार होईल. तेव्हा तीन लाख रुपये द्या. त्यामुळे, रोजगाराचा प्रश्न असल्याने वाघडकर यांनी पैसे देण्यास सहमती दर्शविली. तर, ठरल्याप्रमाणे दि. 4 सप्टेंबर 2022 रोजी राहुरी बस स्थानकावर दोघांमध्ये शाब्दीक करारनामा झाला आणि पहिल्या टप्प्यात त्याने आरोपीस दोन लाख रुपये दिले. तर उरलेली रक्कम 3 लाख रुपये ही नियुक्तीपत्र आल्यानंतर देण्याचे ठरले होते.
दरम्यान 2 दोन दिवसानंतर तुमचे नियुक्तीपत्र हे राहुरी विद्यापीठ येथे घेऊन येऊ असे सांगितले. त्यानंतर दि. 9 सप्टेंबर 2022 रोजी आरोपी तथा तोतया श्रीरंग कुलकर्णी याने विद्यापीठ येथे येणार असल्याचे सांगितल्याने फिर्यादी वाघडकर हे देखील तेथे गेले. त्यांनी सोबत तीन लाख रुपये देखील नेले होते. जेव्हा तोतया श्रीरंग कुलकर्णी हा तेथे आला तेव्हा तो राहुरी विद्यापीठाच्या व्हीआयपी गेस्ट हाऊस येथे थांबला होता. त्याच्याकडे काही बनावट कार्ड असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र जेव्हा आरोपी आणि फिर्यादी हे तेथे भेटले तेव्हा आरोपीच्या काही गोष्टींचा वाघडकर यांना संशय आला. त्यांनी सदर घटनेची माहिती घेतली होती. तर, तेथे गेल्यानंतर त्यांनी मंत्रालयात देखील चौकशी केली. तोतया श्रीरंग कुलकर्णी याने आपली फसवणुक केली आहे असे लक्षात येताच पैसे देण्याचे टाळले. तर, आरोपीच्या विरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी चौकशी केली असता लक्षात आले. की, श्रीरंग कुलकर्णी हा कोणी व्यक्ती मंत्रालयात नसून तो व्यक्ती म्हणजे दत्तात्रय आरुण क्षिरसागर (रा. दत्तनगर, मालेगाव बस स्टॅप नाशिक) हा आहे. त्यानंतर पोलिसांनी त्यास बेड्या ठोकल्या आहेत.
ही सर्व घटना लक्षात आल्यानंतर संबंधित ऑर्डर बनविणे, बनावट ओळखपत्र बनविणे यासाठी शिक्के आणि अन्य कागदपत्रे आवश्यक असतात. ते कोठे तयार केले? याबाबत आरोपी याने खुलासा केला. त्यानंतर त्यात आकाश विष्णु शिंदे (रा. संगमनेर) याचे नाव पुढे आले. म्हणून पोलिसांनी पुढे तपास सुरू केला. त्यात ओमकार नंदकुमार तरटे (रा. उपासनी गल्ली, ता. संगमनेर) या तरुणाच्या दुकानावर पोलिसांनी छापा टाकला. तो रबरी शिक्के तयार करण्याचे काम करतो. पोलिसांनी त्यास काल दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेतले आणि 4 वाजता संगमनेर शहर पोलीस ठाण्यात नोंद करुन ते राहुरी पोलीस ठाण्यात रावाना झाले. त्यानंतर त्याच्याकडून फार काही माहिती उघड झाली आहे. त्याचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचे लक्षात येताच त्याला सायंकाळी अटक दाखवून त्यास न्यायालयात हजर केले होते. गुन्ह्यातील प्रोग्रेस लक्षात घेता न्यायालयाने त्यास पोलीस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, नागराज मंजुळे यांनी अनेक व्यक्तींना रातोरात हिरो करुन टाकले. त्यात काहीजण पुढे आणखी स्टर झाले तर काहींनी अवैध प्रकारे पैसा मिळविण्याचे धंदे सुरू केले आहे की काय? असा प्रश्न आता पुढे येऊ लागला आहे. कारण, सैराट चित्रपटात ज्याने आर्चीचा भाऊ म्हणजे प्रिंन्स म्हणून काम केले. तो देखील संगमनेरात आला होता. त्याने बनावट शिक्के तयार करणार्याला भेटून मित्रांसोबत ते काम फत्य देखील केले. अशा प्रकारची माहिती आरोपींनी दिली आहे. मात्र, आता पोलीस यात काय भुमिका घेतात हे पहाणे महत्वाचे आहेे. विशेष म्हणजे आरोपींनी भारताच्या राजमुद्रा बनावट करुन त्याचा गौरवापर केला आहे. म्हणजे हा एक प्रकारे देशद्रोहासारखा गुन्हा मानला जातो. परंतु, पोलिसांनी याबाबत माहिती देण्यास टाळाटाळ केली आहे. जेव्हा पोलिसांना एका पत्रकाराने फोन केला. तेव्हा त्यांना याबाबत दुजोरा दिला. तर, दुसर्या व्यक्तीने विचारणा केली असता टोलवाटोलवीची उत्तरे दिली. त्यामुळे, राहुरी पोलीस निरीक्षक प्रतापराव दराडे आणि तपासी अधिकारी यांच्यात काम सुरू आहे. हे अनेकांना संदिग्ध वाटले आहे. मात्र, याबाबत पोलीस उपाधिक्षक संदिप मिटके यांनी या प्रकरणात स्वत: लक्ष घालुन कोणालाही अभय मिळणार नाही. असे सांगितले आहे. त्यामुळे, प्रिन्स (राजपुत्र) लोकांना अभय मिळतो का? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.