त्याचं जुनं प्रेम उफाळुन आलं.! तिच्या घरात घुसून त्याने गळ्याला चाकु लावला.! तिने त्याच्यावर गुन्हा ठोकला.!
सार्वभौम (संगमनेर) :-
कोणाला कधी कशाची व कोणाची आठवण येईल याचा काही नेम नाही. कारण, गेल्या कित्तेक दिवसांपुर्वी एका तरुणाचे आपल्याच नात्यातील एका मुलीवर प्रेम होते. मात्र, त्यांचे एकमेकांशी लग्न होऊ शकले नाही. कालांतराने या दोघांचे वेगवेगळ्या ठिकाणी लग्न झाले. मात्र, याची बायको नाही नांदली नाही. म्हणून याला आपल्या पहिल्या प्रेयसिची आठवण झाली आणि या बहादराने थेट तिचे घर गाठले. तु तुझा संसार सोडून माझ्यासोबत चल, माझ्याशी संबंध ठेव अशी गळ त्याने घातली असता तिने त्यास नकार दिला. तेव्हा याने घरातील चाकु घेतला आणि तिच्या गळ्याला लावून मारुन टाकण्याची धमकी दिली. ही घटना सोमवार दि. 12 सप्टेंबर 2022 सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास (रा. गुंजाळवाडी, राहणे माळा ता. संगमनेर) घडली. त्यानंतर पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यात संदिप गुलाब पारधी (रा. चिंचपूर, ता. संगमनेर) असे आरोपीचे नाव आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, आरोपी हा चिंचपुरला असताना त्याचे पीडित महिला विवाहीत नव्हती तेव्हा प्रेम जडले होते. तेव्हा त्यांच्यात सगळ्या गोष्टी अगदी सहमतीने होत होत्या. मात्र, नाजुक कारणामुळे त्यांचे एकमेकांशी लग्न झाले नाही. हिचे लग्न झाल्यानंतर ती सासरी गेली तर नंतर याचे देखील कालांतराने लग्न झाले. मात्र, त्याच्या मनात लग्नाची खंत राहुन गेली. नंतर पीडित महिलेस एक मुलगी झाली. याचा देखील संसार चांगला सुरू होता. मात्र, यांच्यात वारंवार वाद होऊ लागल्याने त्याची पत्नी निघुन गेली त्यामुळे याला एकटेपणा वाटू लागला. मग आता काय करायचे? म्हणून याचे जुने प्रेम उफाळुन आले आणि त्याने थेट जुण्या आठवणी घेऊन आपल्या प्रेयसिच्या दारात गेला.
त्या दिवशी प्रेयसिचा पती गाडीवर बाहेर गेला होता. तर, मुलगी एका पाहुण्यांकडे वाढदिवसासाठी गेली होती. घरात कोणी नाही हे लक्षात येताच याने त्याचे प्रपोजल तिच्यासमोर ठेवले. माझी बायको नांदत नाही, तुझा नवरा व मुलगी सोडून दे आणि माझ्यासोबत घरी रहायला चल. तेव्हा तिने उत्तर दिले. की, आता हे शक्य नाही. जे झाले आहे ते सोडून दे, विसरुन जा आणि माझ्या आयुष्यात ढवळाढवळ करु नको. तेव्हा, आरोपी तथा प्रियकर म्हणाला की, तुला माझ्यासोबत यावे लागेल. तेव्हा यांच्यात शाब्दीक चकमक झाली आणि आरोपी संदिप गुलाब पारधी याने आपल्या प्रेयसिला तिच्याच घरात मारहाण करण्यास सुरूवात केली.
दरम्यान, यांच्यात घरात वाद सुरू असताना याने पीडित महिलेकडे नको नको त्या मागण्या केल्या. मात्र, याच्या मनात भुतकाळ असला तरी ती वर्तमानात जगत असल्याने तिने त्यास नकार दिला. तेव्हा आरोपी संदिप पारधी याने घरातील चाकू घेतला आणि तिच्यावर उगारला. तु माझ्यासोबत संसार थाटला नाही. किवा माझ्याशी संबंध ठेवले नाही. तर जे आपल्यात पुर्वी प्रेमसंबंध होते. त्याबाबत सर्व माहिती मी तुझ्या पतीला सांगेल. मग कशी संसार करते ते पहातो. तेव्हा पारधी याने तिला मारहाण करुन शिविगाळ दमदाटी करत ठार मारण्याची धमकी दिली. पुर्वी जे झाले ते झाले. आता असला प्रकार खपवून न घेता महिलेने थेट पोलीस ठाणे गाठले आणि आपल्याच जुन्या प्रियकरावर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास पोलीस नाईक महाले करीत आहेत.