धनंजय मुंडे यांची जिरविण्यासाठी करुणा मुंडे यांनी माझी 40 लाख रुपयांची फसवणुक केली.! तोंड पाहूण पोलिसांनी अन्याय केला.!
सार्वभौम (संगमनेर) :-
माझे पती मंत्री आहेत. त्यामुळे, मला त्यांच्या विरोधात नवा पक्ष काढायचा आहे. त्यामुळे, तुम्ही सामाजिक कामात आग्रेसर आहात. आपण राज्यभर पक्ष उभा करु असे म्हणून मा. मंत्री धनंजय मुंडे यांची पत्नी करूणा मुंडे यांनी भारत संभाजी भोसले (रा. कोंंची. ता. संगमनेर, जि. अ.नगर) यांना विश्वासात घेतले. तर पक्ष बांधणीसाठी पैसा हवा आहे. माझे बँक खाते सिल केले आहे त्यामुळे, तुर्तास काही करुन थोडेफार पैसे उपलब्ध करुन द्या. पक्षनोंदणी झाल्यानंतर मी नंतर तुमचे पै-पै परत करेल. असे म्हणून मुंडे यांनी तब्बल 40 लाख रुपये घेतले. मात्र, जेव्हा फार काळ उलटला तरी देखील पैसे मिळेना म्हणून मुंडे यांच्याकडे पैशाची मागणी केली असता त्यांनी सांगितले. की, माझे व साहेब धनंजय मुंडे यांच्यात वाद झाले आहे. त्यामुळे, मी पैसे देऊ शकत नाही. माझ्याकडे परत मागू नका. तुम्ही जर माझ्या विरोधात तक्रार केली तर तुम्हाला उध्वस्त करेल. असे म्हणून धमकी दिली. अशा प्रकारची तक्रार भारत संभाजी भोसले यांनी पोलीस ठाण्यात केली आहे. मात्र, पोलिसांनी गुन्हा दाखल केला नसून मुंडे यांचा रातोरात गुन्हा दाखल केल्याने आमच्यावर अन्याय झाल्याची भावना भोसले यांनी व्यक्त केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि. 14 डिसेंबर 2021 रोजी भोसले यांना करुणा मुंडे यांनी मुंबई येथील सांताकृज येथे बोलावून घेतले होते. तेव्हा, त्या भोसले यांना म्हणाल्या की, आपण नवीन पक्ष काढू. माझे पती मंत्री आहेत. त्यामुळे, मला त्यांच्या विरोधात पक्ष उभा करायचा आहे. तुम्ही सामाजिक कामात आग्रेसर आहात. मी तुमची सर्व माहिती घेतली आहे. जेव्हा भोसले म्हणाले. की, मला पक्षिय राजकारण समजत नाही. तेव्हा, त्या म्हणाल्या. की, कोणी बालपणात कोणी राजकारण शिकत नाही. एखाद्या घटनेमुळे माणूस राजकारणात येत असतो असे म्हणून भासले यांना मुंडे यांनी प्रवृत्त केले. तर, तुम्ही पक्ष बांधणीसाठी माझ्यासोबत महाराष्ट्रभर फिरा आपण साहेबांच्या विरोधात पक्ष उभा करु अशा प्रकारची चर्चा केली.
दरम्यान, पक्ष उभा करण्याचे ठरले असता मुंडे म्हणाल्या. की, माझे बँक खाते सिल केले आहे. त्यामुळे, पक्षाउभा करण्यासाठी थोड्या पैशांची गरज आहे. त्यामुळे, सध्या 4 लाख रुपये मला द्या. माझे खाते चालु झाले. की, मी तुमचा पैसा परत करेल. तेव्हा भोसले यांनी हातऊसणे म्हणून 4 लाख रुपये दिले. मात्र, त्यानंतर मुंडे यांनी 36 लाख रुपयांची मागणी केली. मात्र, तेव्हा भोसले म्हणाले. की, इतकी मोठी रक्कम आमच्यासारख्या सर्वसामान्य मानसांकडून कोठून येणार. त्यामुळे, इतके पैसे शक्य नाही. तेव्हा मुंडे ताई म्हणाल्या की, पैसे नसेल तर सोने पहा. आपण त्यावर लोन करुन पैसा उपलब्ध करु. त्यांनी परतीचा विश्वास दिला असता भोसले यांनी त्यांच्याकडील सोने दि. 7 जानेवारी 2022 रोजी आयसीसी बँक येथे ठेवले तर मित्र बालमभाई शेख यांच्याकडील सोने दि. 17 जानेवारी 2022 रोजी याच बँकेत ठेवून दि. 11 ते 25 फेब्रुवारी या दरम्यान वेगवेगळ्या तारखांना मिळून 34 लाख 45 हजार रुपये रक्कम दिली. (त्याचे खाते नंबर, आयडी क्रमांक, दिनांक, रक्कम हे सर्व पुरावे अर्जात नमुद केले आहेत.)
दरम्यान, तक्रारीत म्हटल्यानुसार 40 लाख रुपये करुणा मुंडे यांना दिले असून विद्या संतोष आभंग यांच्या मालकीचा घुलेवाडी येथील बंगला दि. 7 जानेवारी 2022 रोजी नोंदवून घेतला आहेत. कारण, हा बंगला म्हणजे पक्षाचे कार्यालय असेल असे दाखविण्यासाठी नोंद करुन फसवणुक केल्याचे म्हणले आहे. त्यानंतर संगमनेर येथे दि. 7 जानेवारी 2022 रोजी करुणा मुंडे यांनी विद्या आभंग यांना 20 लाख इतकी रक्कम उसनवार पावती दस्ताने आदा केली असे लिहून घेतले. त्या बदल्यात आयसीसी बँकेचे दोन कोरे चेक घेतले. त्यानंतर सर्वांनी मुंडे यांच्याकडे पैशाची मागणी केली. तेव्हा त्या म्हणाल्या की, इतक्या लवकर पक्षाची नोंदणी होत नाही. माझ्या साहेबांचे (धनंजय मुंडे) माझ्यासोबत वाद झाले आहे. त्यामुळे, मी पैसे देऊ शकत नाही. त्यामुळे, पैसा विसरुण जा. जर माझ्या विरोधात तक्रार दिल्यास सर्वांना उध्वस्त करुन टाकेल अशा प्रकारची धमकी दिली. त्यामुळे, मुंडे यांनी आमची फसवणुक केली आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन योग्य ती कारवाई करावी. अशी तक्रार भोसले यांनी पोलीस ठाण्यात तसेच वरिष्ठ अधिकार्यांकडे दाखल केली आहे.
धन्य ते संगमनेर पोलीस.!
करुणाताई मुंडे यांनी भोसले यांच्यासह तिघांवर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्या पोलीस ठाण्यात रातोरात आल्या आणि फिर्याद दाखल करुन निघुन देखील गेल्या. मात्र, त्यांनी फिर्याद देण्यापुर्वी भोसले यांनी पुराव्यासह पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तेव्हा, तत्कालिन पोलीस निरीक्षक मुकूंद देशमुख यांनी सांगितले होते. की, हा गुन्हा पोलीस ठाण्यात दाखल होणार नाही. तुम्हाला कोर्टात जावे लागेल. त्यानंतर त्यावर कायदेशिर कारवाई करता येईल. तेव्हा भोसले याचे म्हणणे ऐकूण घेतले नाही. मात्र, त्यांच्या बदलीनंतर मुंडेताई आल्या आणि तिघांवर गुन्हा ठोकून निघुन गेल्या. त्यामुळे, संगमनेर पोलीस ठाण्यात चेहरे पाहून न्याय मिळतो का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर, जो गुन्हा दाखल झाला आहे. त्याची चौकशी करुन दोषी पोलीस आणि दुटप्पी भुमिका घेणार्या वर्दीच्या विरोधात तक्रारदाराने गृहविभागात धाव घेतली आहे. मात्र, या निमित्ताने संगमनेर पोलिसांचा मनमानी कारभार आणि दुतोंडी भुमिका पुन्हा चव्हाट्यावर आली आहे. मात्र, यांची असली हुशारी हे चोर्या, दरोडे, चेन स्नेचिंग आणि अवैध धंदे बंद करण्यासाठी का वापरत नाही? असा प्रश्न सामाजिक संघटनांनी उपस्थित केला आहे.