असुरक्षित संगमनेर.! एकाच रात्रीत 12 ठिकाणी दरोडे.! एटीएम फोडले, पंचायत सं.कॉर्टर धुवून नेली. बाप्पाच्या येण्यापुर्वीच चोरट्यांनी संसार उध्वस्त केले.!
सार्वभौम (संगमनेर) :-
संगमनेर शहराने केवळ संस्कार आणि सुसंस्कृत पणाचा बुरखा परिधान केला आहे. मात्र, येथील हाय प्रोफाईल गुन्हेगारी, महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेले मांस आणि गांजा. यासह नको-नको ते कारभार अगदी खुलेआम चालतात. मात्र, पोलीस काय करतात? तर, अर्थपुर्ण तडजोडी करुन मलिदे गोळा करण्यात आणि नेत्यांच्या पाया पडून आपल्या वर्दीला सरेंडर करतात. त्यामुळे, पोलीस उपाधिक्षक असो वा अधिकारी किंवा कर्मचारी यांच्याकडून आजवर जनतेला समाधानकारण काम झाल्याचे पहायला मिळत नाही. सणासुदीच्या दिवशी महिला बाहेर पडल्या की त्यांच्या गळ्यावर डल्ला मारला जातो, तरुणी शाळेत निघाल्या की भर रस्त्यात त्यांची छेडछाड केली जाते. शहरभर अवैध धंदे बोकाळले आहेत, शहरातील बेशिस्त गर्दी तर जैशी थे आहे. विशेष म्हणजे एका रात्रीतून 10 ते 25 ठिकाणी चोर्या दरोडे होतात. मग पोलीस नेमकी करतात तरी काय? केवळ गुन्हे दाखल करायचे आणि ते कायम तपासावर ठेवायचे. आहो.! चोर्या-दरोडे पडले तर पोलीस साधे पंचनामा करायला येत नाहीत. संगमनेरात पंचमाना करण्यासाठी पोलीस अधिक्षक यांना विनंती करावी लागते. तेव्हा पंचनामा होता. त्यामुळे, पोलिसांनी बाकी, भल्याभल्यांच्या इज्जतीचा पंचनामा केल्याचे पहायला मिळाले आहे. त्यामुळे, गेल्या आठवड्यात पीआय देशमुख यांची बदली झाली खरी. मात्र, संगमनेरात जरा देखील बदल झाला नाही. उलट, गुन्हेगारी दुप्पट नव्हे.! तिप्पट वाढली आहे. आता येथे पीआय देण्यासाठी एसपी साहेबांना मुहूर्त निघेल की नाही देव जाणे.! पण विखे पाटलांनी बदली केली तर सक्षम बदली माणूस देखील दिला पाहिजे. असे मत संगमनेरकरांनी व्यक्त केले आहे.
नगर जिल्ह्यातील सर्वात विकसित शहर म्हणून संगमनेरकडे पाहिले जाते. परंतु, जसा या शहराचा भौगोलिक विकास झाला त्याच प्रमाणे गुन्हेगारी विश्वाला देखील खतपाणी मिळाल्याचे पहायला मिळाले. युपी, एमपी, बिहार अशा अन्य राज्यातून लोक आले आणि त्यांनी येथील महिलांवर अन्याय अत्याचार केले. एव्हाना अनेकांच्या फसवणुका आणि हत्या देखील केल्या. असे अनेक गुन्हे पोलीस ठाण्यात दाखल आहेत. मात्र, परस्पर आरोपी निघुन गेले मात्र पोलिसांच्या ताब्यात सापडले नाहीत. गेल्या कित्तेक दिवसांपासून बाहेर जिल्ह्यातून आरोपी येतात आणि चेन स्नेचिंग करुन जातात. खरंतर पोलीस ठाण्यातील कर्मचारी आणि त्यांचे काम याबाबत प्रश्न उपस्थित केला तर जनतेचा पगार घेणारे नेमकी काय करतात? हा प्रश्न सहज उपस्थित होतो. खरंतर, पोलीस ठाणे आणि डेप्युटी यांच्या पथकात काही कर्मचारी नसते तर संगमनेरात चोरटे आणि गुन्हेगार यांच्यामुळे अराजकता माजली असती. त्यांनी आजवर काही ठिकाणी चांगले काम केले म्हणून कोठेतरी अजून संगमनेरकरांना अपेक्षा आहे. की, पोलीस संरक्षण करु शकतात. अन्यथा आजकाल चोर्या, घरफोड्या आणि दरोडे पडतात. तरी देखील काही लोक गुन्हे दाखल करत नाहीत. का? तर आजकाल वर्दीवर लोकांचा विश्वास राहिलेला दिसत नाही. अशा प्रकारच्या प्रतिक्रीया सोशल मीडियावर उमटू लागल्या आहेत.
चोरा,एकदा पोलिसांच्या घरी जा.!
चोरी झाल्यानंतर एका महिलेला आपला कंठ दाटून आला. पै-पै जमा केला पैसा आणि मनी-मनी जमा केलेलं मंगळसुत्र या सगळ्यांवर चोरांनी डल्ला मारला. पोलिसांना फोन करून देखील कोणी लवकर आले नाही. इतकेच काय.! पाच-सहा जणांचा मिळून एक गुन्हा दाखल केला. त्यात पुढे काय झाले याबाबत पोलिसांंना विचारून देखील तपास चालु आहे, पुन्हा फोन करु नका आम्ही बसून नाही. अशा प्रकारची उत्तरे आली. त्यामुळे, रड-रड रडून देखील तळतळ सोडून हाती काहीच आले नाही. त्यामुळे, अखेर महिला म्हणाली. चोरा..!! एकदा तरी पोलिसाच्या घरी जाय, म्हणजे दु:ख काय असते. चोरी काय असते, त्याच्या वेदना काय असतात. तळमळ आणि तगतग काय असतेे. हे लक्षात येईल. कारण, स्वत:वर प्रसंग आल्याशिवाय त्याची तिव्रता कळत नाही. आतातरी पोलिसांनी चोर्या घरफोड्यांना गांभिर्याने घेणे गरजेचे आहे. तर, जे वाळुस्करांच्या मागे फिरत होते. त्यांना विखे पाटील यांना कठोर भूमिका घेतल्यामुळे तिकडून सुट्टी मिळाली आहे. त्यांनी मलिदा गोळा करण्यापेक्षा थोडं जनतेच्या आक्रोषाकडे लक्ष दिले पाहिजे असे मत फिर्यादीने व्यक्त केले आहे.
पंचायत समिती धुवून नेली..!!
पंचायत समिती संगमनेर येथे एकाच वेळी पाच ठिकाणी घरफोड्या झाल्या. तर, दोन ठिकाणी प्रयत्न झाले. गेल्या दोन महिन्यापुर्वी याच पंचायत समितीत चार घरफोड्या झाल्या होत्या. मात्र, पोलिसांनी साधा पंचनामा देखील केला नव्हता. पाच दिवसांच्या मुहूर्तानंतर पोलिसांनी भेट दिली तोवर घरभर पसारा पडलेला होता. प्रत्येक घरातून 1 लाख 50 हजार रुपये इतकी रक्कम गेली होती. म्हणजे, मुळ ती रक्कम 3 लाखाच्या आसपास असते. मात्र, पोलीस जुनी खरेदीची आकडेवरी लावतात. का? तर केवळ मोठी रक्कम दिसून आपली मान शरमेने खाली जाऊ नये म्हणून.!! अन्यथा सरासरी संगमनेरातून प्रतिदिन 10 ते 15 लाख रुपयांचा ऐवज चोरीला जात असेल. एकाच घरांमध्ये महिन्या-दोन महिन्यात चोर्या होत असतील तर संगमनेर शहर किती सुरक्षित आहे, हे लक्षात येते. विशेष बाब म्हणजे लाखभर रुपयांचे सोने चोरी जाऊन सुद्ध कोणी गुन्हा दाखल करण्यास जात नाही. का? तर पहिल्याच गुन्ह्याचा तपास नाही. पुन्हा कोणी डोकून सुद्धा पहात नाही. एकवेळी पुन्हा घरी चोर येतात, पण पोलीस येत नाहीत. त्यामुळे, फिर्याद देणे म्हणजे रिकाम्या उचापती. अशा प्रकारची धारणा जनतेची झाली आहे. त्यामुळे, संगमनेरकडे मलिदा पोलीस ठाणे म्हणून पाहणारा अधिकारी नको.! तर ज्याला खरोखर काम करण्याची जिद्द आहे. समाजभान आहे. नव्याने पोलीस निरीक्षक झालेले तरुण आहे आणि विशेष म्हणजे कोणाच्या ताटाखालचे मांजर होण्याची चिड आहे. अशा व्यक्तीला संधी देणे गरजेचे आहे. अन्यथा अशाच चोर्या वाढल्या तर लोक संगमनेरला वैतागून हे शहर सोडण्यास देखील मागेपुढे पाहणार नाही.